Saturday 25 July 2020

मुकेश अंबानी जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती.

🔰उद्योजक मुकेश अंबानी यांच्यासाठी मात्र 2020 हे वर्ष खूपच चांगलं ठरताना दिसतंय. लॉकडाउनमध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये अनेक बड्या कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली.
त्यांच्या रिलायन्स जिओच्या व्यवसायातही वाढ झाली, आणि आता मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे.

🔰अब्जाधीश मुकेश अंबानी आता जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले  आहेत.प्रसिद्ध बिजनेस मॅगझीन फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार मुकेश अंबानी जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

🔰रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन असलेल्या मुकेश अंबानी यांनी फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीमध्ये अमेरिकी गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांना मागे टाकत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.फोर्ब्सच्या यादीनुसार मुकेश अंबानी यांची संपत्ती 75 अब्ज डॉलर झाली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...