Wednesday 28 July 2021

अकरावीच्या सीईटीसाठी नोंदणीस मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार फॉर्म

 


🔰राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी (FYJC CET 2021) सुरू झाली आहे. मात्र, नोंदणी करताना विद्यार्थ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला होता. जवळपास तीन ते चार दिवस वेबसाईटच सुरु होत नसल्याने नोंदणी कशी करायची असा प्रश्न विद्यार्थ्यासमोर होता.


🔰दरम्यान, राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच पुरजन्य परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे अकरावी प्रवेशाच्या सीईटीसाठी नोंदणी करण्याची मुदत २ ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी अकरावी सीईटीसाठी नोंदणी करण्याची मुदत २६ जुलै पर्यंत होती.


🔰दहावी उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा द्यायची आहे ते विद्यार्थी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी करु शकणार आहेत. मात्र, अद्यापही वेबसाईट बंद असल्याचं समोर आलं आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नोंदणीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अकरावी प्रवेशाची सीईटी परीक्षा २१ ऑगस्ट रोजी होणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 15 एप्रिल 2024

◆ नवीन शिक्षण धोरणानुसार नव्या पद्धतीने शिक्षण देण्यासोबतच नवे नेतृत्व घडवण्यासाठी प्रेरणा उत्सवाची सुरुवात वडनगर गुजरात येथून करण्यात येणा...