Wednesday 28 July 2021

संयुक्त राष्ट्रातील पी ५ गटात भारताने समतोल साधला- तिरूमूर्ती.🔰संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात स्वतंत्र परराष्ट्र धोरण असलेल्या भारताने समतोल साधण्याचा  प्रयत्न केला आहे. पाच स्थायी सदस्यांमधील मतभेद मिटवण्यात मोठे काम केले आहे, असे भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी राजदूत  तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे. भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाचे फिरते अध्यक्षपद १ ऑगस्टला मिळणार असून  २०२१-२२ या काळात हे पद भारताकडे राहणार आहे. सुरक्षा मंडळात एकूण पंधरा अस्थायी देश आहेत.


🔰भारताला सुरक्षा मंडळात अतिशय महत्त्वाच्या काळात पद मिळाले असून जग करोनात चाचपडत असताना व त्यावरून मतभेद व वादविवाद असताना सुरक्षा मंडळ व इतर पातळीवरही भारत सामूहिक कृतीसाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे भारताचे राजदूत टी.एस. तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, भारत सदस्य देशांमधील मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न करील. कारण सध्या अनेक प्रश्नांवरून सुरक्षा मंडळात वादविवाद आहेत.


🔰अनेक प्रश्नांवर भारताने ठोस भूमिका गेल्या सात महिन्यात घेतली आहे. कुठलीही जबाबदारी घेण्यात टाळाटाळ केलेली नाही. भारतासारख्या स्वतंत्र परराष्ट्र धोरण असलेल्या देशाचा संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा मंडळात महत्त्वाचे पद मिळाल्याने बहुमान होत आहे पण त्याचबरोबर पाच कायम सदस्य असलेल्या देशातील मतभेद टाळण्यास मदत होणार आहे. चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन व अमेरिका हे सुरक्षा मंडळाचे स्थायी सदस्य असलेले देश आहेत. सुरक्षा मंडळातील ध्रुवीकरण टाळण्याचा प्रयत्न करून विचारांती निर्णय घेण्यास भाग पाडू असे सांगून ते म्हणाले की, म्यानमार, अफगाणिस्तान यांसारख्या देशातील परिस्थितीवर चर्चा करण्याची गरज असून तेथील परिस्थितीबाबत संवेदनशीलता दाखवली पाहिजे.

No comments:

Post a Comment

Latest post

जागतिक वारसा दिन : 18 एप्रिल 2024

◆ दरवर्षी 18 एप्रिल हा आंतरराष्ट्रीय स्मारके आणि स्थळांचा दिवस (International Day For Mounments And Sites) म्हणून साजरा केला जातो. याला ...