Wednesday 28 July 2021

काकतीया रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर: भारतातील 39 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ..🔰भारतामधील काकतीया रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर याचा UNESCO संस्थेच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. तेलंगणा राज्यातील वारंगळ मालुगू जिल्ह्यातील पालमपेठ येथे हे मंदिर आहे. यासह ते भारतातील 39 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ ठरले आहे.


🔰रामप्पा मंदिर हे तेराव्या शतकातील तंत्रज्ञानाची कमाल दाखवणारी एक अद्भुत वास्तुकला आहे.


🔴भारतातील जागतिक वारसा स्थळे...


🔰सयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली. ती वारसा स्थळे UNESCO जागतिक वारसा परिषदेत वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्त्वाची ठिकाणे असतात.


🔰आता, भारतात एकूण 39 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात 31 (जयपूर सहित) सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक ठिकाणे आणि एक मिश्रित ठिकाण आहे. सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 15 एप्रिल 2024

◆ नवीन शिक्षण धोरणानुसार नव्या पद्धतीने शिक्षण देण्यासोबतच नवे नेतृत्व घडवण्यासाठी प्रेरणा उत्सवाची सुरुवात वडनगर गुजरात येथून करण्यात येणा...