Friday, 7 October 2022

देशाला मिळणार तिसरी ‘वंदे भारत ट्रेन’

 देशाला मिळणार तिसरी ‘वंदे भारत ट्रेन मिळणार आहेया वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

 ही ट्रेन गुजरातच्या गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यानही धावणार आहे.

 यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश उपस्थित राहणार आहेत.

 भारतातील पहिली स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ही असणार आहे.

ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुविधा पाहता अनेक बदल करण्यात आले आहेत. या ट्रेनमध्ये एकूण 1 हजार 128 प्रवासी बसण्याची क्षमता आहे.

या ट्रेन मध्ये काय सुविधा असणार आहेत?

 ही ट्रेन अवघ्या 52 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठते.ही ट्रेन पूर्णपणे एसीअसणार आहे.

 याशिवाय ट्रेनमध्ये जागोजागी चार्जिंग पॉईंट, स्लाईडिंग विंडो, व्यक्तिगत वाचनासाठी दिवा, अटेंडेंट कॉल बटन, स्वयंचलित दरवाजे, बायो-टॉयलेट, सीसीटीव्ही, या ट्रेनमध्ये असणार आहेत.

 ट्रेनमध्ये स्लाइडिंग फूटस्टेप्ससह स्वयंचलित प्लग दरवाजे तसेच टच फ्री स्लाइडिंग दरवाजे बसवले आहेत.

वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन :

1. पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन 15 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्ली-वाराणसी मार्गावर धावली.
2. त्याचवेळी दुसरी ट्रेन नवी दिल्ली ते श्री वैष्णोदेवी माता, कटरा मार्गावर चालवण्यात आली.
3. आज तिसरी वंदे भारत ट्रेन गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यानही धावणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

Daily Top 10 News : 21 March 2023

1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे ग्लोबल मिलेट्स (श्री अण्णा) परिषदेचे उद्घाटन केले. ते याप्रसंगी उपस्थितां...