Thursday 6 October 2022

महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल


महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल : २०२१-२२ मध्ये अर्थव्यवस्थेत १२.१ टक्क्यांची वाढ अपेक्षित.

आज विधिमंडळात २०२१-२०२२ चा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत १२.१ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत ८.९ टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. राज्याच्या कृषी तसेच कृषीपुरक क्षेत्रातही ४.४ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.

करोना महामारीमुळे मागील दोन वर्षांपासून राज्याच्या विकासाची गती मंदावलेली आहे. मात्र करोनाचा प्रादुर्भाव कमी होताच उद्योग, सेवा, कृषी क्षेत्राने कात टाकली असून या क्षेत्रांना पुन्हा एकदा उभारी मिळत आहे.

२०२१-२२ च्या आर्थिक पाहणी अहवालात या सर्वच क्षेत्रांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा नोंदवण्यात आलीय. कृषी क्षेत्रासोबतच पशुसंवर्धन, वने व लाकूड तोडणी, मत्स्यव्यवसाय व मत्स्यशेती यांच्यातदेखील वाढ होण्याचे अपेक्षित असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात सांगण्यात आले आहे.

हे माहीत आहे का :-  नवी मुंबई १८ वर्षांवरील नागरिकांच १००% लसीकरण करणारं प्रथम शहर

१८ वर्षांवरच्या सर्व नागरिकांना कोविड लशींच्या दोन्ही मात्रा देणारं,  नवी मुंबई हे राज्यातलं पहिलं शहर ठरलं आहे.

शासनानं महानगरपालिकेला दिलेलं १८ वर्षावरच्या ११ लाख ७ हजार नागरिकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट नवी मुंबई महानगरपालिकेनं पार केलं असून, आतापर्यंत ११ लाख ७ हजार ४५४ नागरिकांना कोविड लशींच्या दोन्ही मात्रा दिल्या आहेत.

कोविड लशींच्या पहिल्या मात्रेचं १०० टक्के लसीकरण पूर्ण करणारीही नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका होती. तोच वेग कायम राखत नवी मुंबई महानगरपालिकेनं दुसऱ्या मात्रेचं लसीकरणही पूर्ण केलंय.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 23 एप्रिल 2024

◆ युनायटेड स्टेट्स 2023 मध्ये सर्वाधिक लष्करी खर्च करणारा देश बनला आहे. ◆ केरळमध्ये सर्वात मोठा मंदिर उत्सव ‘थ्रिसूर पूरम 2024’ साजरा करण्...