Monday 25 May 2020

अमेरिकेने ‘ओपन स्कायज ट्रीटी’ मधून माघार घेतली

- रशियाने केलेल्या कराराच्या उल्लंघनाचा खुलासा करीत संयुक्त राज्ये अमेरिका या देशाने ‘ओपन स्कायज ट्रीटी’ या 34 देशांच्या करारामधून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत.

▪️कराराविषयी

- 1 जानेवारी 2002 रोजी ‘ओपन स्कायज ट्रीटी’ हा करार अस्तित्वात आला. या करारामुळे सहभागी देशांना निशस्त्र हवाई पाळत ठेवण्याची परवानगी मिळते.

- लष्करी कारवाया आणि त्यांच्याशी संबंधित इतर बाबींची हवाई मार्गाने घेतलेल्या छायाचित्रांद्वारे माहिती गोळा करण्याची परवानगी कराराच्या स्वाक्षरीकर्त्यांना देऊन परस्पर देशांमधला विश्वास वाढविण्याच्या उपाययोजना आणि परस्पर समन्वय आणि सहकार्यामध्ये सुधारणा करणे हा कराराचा मुख्य उद्देश आहे.

- लिथुयानिया, स्लोव्हाकिया, इटली, रशिया, स्लोव्हेनिया, क्रोएशिया, हंगेरी, डेन्मार्क (ग्रीनलँडसह), टर्की, झेक प्रजासत्ताक, रोमानिया, स्वीडन, लक्समबर्ग, बोस्निया आणि हर्जेगोविना, जर्मनी, बेल्जियम, कॅनडा, ग्रीस, नॉर्वे, आईसलँड, एस्टोनिया, फ्रान्स, ब्रिटन, जॉर्जिया, फिनलँड, लाटविया, बल्गेरिया, पोलंड, कझाकस्तान, बेलारूस, युक्रेन, स्पेन, नेदरलँड्स, पोर्तुगाल हे या कराराचे 34 सदस्य आहेत.

- किर्गिस्तानने या करारावर स्वाक्षरी केली आहे परंतु त्याला मंजूरी दिलेली नाही.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...