Monday 25 May 2020

मिझोरम सरकारने ‘क्रिडा’ क्षेत्राला ‘औद्योगिक’ हा दर्जा दिला

- क्रिडाविषयक क्रियाकलापांना अधिक चालना देण्याच्या उद्देशाने गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी मिझोरम सरकारने ‘क्रिडा’ क्षेत्राला ‘औद्योगिक’ हा दर्जा देण्याची घोषणा केली आहे. अशी घोषणा करणारे हे देशातले पहिले राज्य आहे.

- या निर्णयामुळे अनुदान, बँकिंग सुविधांसह सर्व औद्योगिक फायदे आता क्रिडाक्षेत्रासाठी वाढविण्यात येणार. त्यामुळे या क्षेत्रात रोजगार निर्मितीला चालना मिळणार.

- मिझोरम सरकार नवीन औद्योगिक धोरण आखत आहे, त्यानुसार क्रिडाक्षेत्रालाही बरेच फायदे मिळतील. राज्यातही क्रिडा धोरण चांगले आहे.

- ईशान्य भारतातल्या आठ राज्यांपैकी मिझोरमने अनेक खेळात वर्चस्व गाठले आहे. आज या राज्याचे नाव फुटबॉल, हॉकी, भारोत्तोलन अश्या विविध आघाडीच्या क्रिडाप्रकारांमध्ये समोर येते. मिझोरममध्ये फुटबॉल, हॉकी, कुस्ती, स्टिक फाइटिंग, इन्सुकनावरा, कलछेत काल, इनारपठई अशा अनेक देशी खेळ देखील आहेत.

▪️मिझोरम राज्य

- मिझोरम हे भारताच्या ईशान्य भागातले एक राज्य आहे. मिझोरमच्या उत्तरेस आसाम, ईशान्येस मणीपूर, पश्चिमेस त्रिपुरा ही राज्ये तर पूर्वेस व दक्षिणेस म्यानमार व पश्चिमेस बांगलादेश हे देश आहेत.

- मिझोरम राज्याची स्थापना 20 फेब्रुवारी 1987 रोजी आसाम राज्याला विभागून केली गेली. ऐझॉल ही मिझोरमची राजधानी आहे. मिझो व इंग्रजी या राज्यातल्या प्रमुख भाषा आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 22 एप्रिल 2024

◆ केकी मिस्ती यांची HDFC लाइफ इन्शुरन्स बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ 6 वर्षांच्या तक्षवी वाघानीने 25 मीटरपेक्षा कमी अ...