Friday 8 May 2020

नौदलाचं ऑपरेशन ‘समुद्र सेतू’, INS जलाश्व मालदीवमध्ये दाखल

◾️करोना व्हायरसमुळे विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी नौदलाने ऑपरेशन ‘समुद्र सेतू’ लाँच केले आहे.

◾️ या ऑपरेशनतंर्गत भारतीयांना परत आणण्यासाठी नौदलाची ‘आयएनएस जलाश्व’ ही युद्धनौका मालदीवमध्ये पोहोचली आहे.

◾️ मालदीवची राजधानी मालेमध्ये ही युद्धनौका दाखल झाली आहे.

◾️आयएनएस जलाश्व 🛳बरोबर आयएनएस मगर 🛳ही युद्धनौका सुद्धा या मिशनमध्ये असणार आहे.

◾️पहिल्या टप्प्याच्या ऑपरेशनमध्ये मालदीवमधून १ हजार भारतीयांना परत आणण्यात येणार आहे.

◾️परराष्ट्र, संरक्षण, गृह, आरोग्य आणि अन्य मंत्रालयांशी समन्वय राखून ऑपरेशन समुद्र सेतू सुरु असल्याचे नौदलाकडून सांगण्यात आले.

◾️ भारताने आयएनएस शार्दुल 🛳 ही युद्धनौका संयुक्त अरब अमिरातीला पाठवली आहे.

◾️याशिवाय १२ देशांमध्ये अडकलेल्या १५ हजार भारतीयांना परत आणण्यात येणार आहे.

_______________________________________

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...