Monday 4 October 2021

तहकुबी आणि सत्रसमाप्ती

  तहकुबी ( #adjournment )

👉🏻सभागृहाच्या एक दिवसात दोन बैठका होत असतात..
(सकाळी ११ ते १ & दुपारी २ ते ६)
👉🏻सभागृहाची बैठक संपण्याच्या घोषणेला तहकुबी म्हणतात.
👉🏻ही घोषणा पीठासीन अधिकारी मार्फत केली जाते.
👉🏻ही घोषणा निश्चित कालावधी साठी केली जाऊ शकते. उदा. काही तास, काही दिवस, काही आठवडे
👉🏻अर्थातच ही घोषणा आणि अनिश्चित काळासाठी सुद्धा केली जाऊ शकते.

थोडक्यात तहकुबी केल्यामुळे फक्त बैठका संपुष्टात येतात.

मात्र बैठक खूप केल्यामुळे प्रलंबित विधेयकावर कोणताही परिणाम होत नाही.
कारण पुन्हा बैठक काही तासांनी काही दिवसांनी किंवा काही आठवड्यांनी होणार असते...

   सत्रसमाप्ती ( #Prorogation)

👉🏻कामकाजाची पूर्तता झाल्यावर पहिल्यांदा पीठासीन अधिकाऱ्यांमार्फत अनिश्चित काळासाठी शेवटची बैठक तहकूब केली जाते.
👉🏻त्यानंतर काही कालावधीनंतर राष्ट्रपती सत्र समाप्ती साठी आधी सूचना काढतात..
👉🏻अर्थातच ते अधिवेशन चालू असताना सुद्धा अधिसूचना काढू शकतात..

थोडक्यात सत्र समाप्तीची अधिसूचना काढल्यास अधिवेशन संपुष्टात येते..

👉🏻मात्र सत्राच्या समाप्ती मुळे फक्त प्रलंबित नोटिसा रद्द होतात परंतु प्रलंबित विधेयकावर कोणताच परिणाम होत नाही.

No comments:

Post a Comment

Latest post

....𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....

◾️2024 विस्डेन क्रिकेटर्स ऑफ द इयर रिपोर्ट प्रकाशित ◾️रिपोर्ट नुसार जगातील सर्वाधिक आघाडीचे क्रिकेटपटू ⭐️पुरुष : पॅट कमिन्स (Australia) ...