साक्षरतेमध्ये केरळचा पहिला नंबर तर महाराष्ट्र सहाव्या स्थानी✔️ देशात साक्षरतेमध्ये केरळने पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. तर आंध्र प्रदेश हे राज्य देशात साक्षरतेमध्ये सर्वात पिछाडीवर आहे.

✔️आंध्र प्रदेशात साक्षरतेचे प्रमाण 66.4 टक्के आहे. बिहारपेक्षाही आंध्र प्रदेश साक्षरतेमध्ये मागे आहे. बिहारमध्ये साक्षरतेचे प्रमाण 70.9 टक्के आहे.

🔰आकडेवारी काय सांगते?

✔️ नशनल स्टॅटिस्टिकल ऑफीसने शिक्षणासंदर्भातील रिपोर्ट जाहीर केला. त्यातून ही माहिती समोर आली आहे.

✔️साक्षर राज्यांमध्ये महाराष्ट्र सहाव्या स्थानावर आहे. महाराष्ट्रात एकूण साक्षरतेचे प्रमाण 84.8 टक्के आहे.

✔️ परुष आणि महिला साक्षरतेच्या प्रमाणात तब्बल 12.3 टक्क्यांचे अंतर आहे. पुरुष 90.4 टक्के तर महिला 78.4 टक्के साक्षर महिला आहेत.

✔️ पहिल्या पाच सर्वाधिक साक्षर राज्यांमध्ये केरळ, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांचा नंबर लागतो.

✔️ दरम्यान, साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्या शेवटच्या पाच राज्यांमध्ये उत्तर प्रदेश,तेलंगण, बिहार, राजस्थान आणि आंध्र प्रदेश ही राज्ये आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...