Friday 6 September 2019

चंद्रावर तिरंगा फडकविण्यासाठी ‘विक्रम’ सज्ज

🛰 ‘चांद्रयान- २’पासून वेगळा झालेला ‘विक्रम’ लॅंडर चांद्रभूमीवर सुखरूप उतरण्याची इच्छा प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे.

🛰 शनिवारी पहाटे दीड ते अडीच या वेळेत ‘विक्रम’ लॅंडर ही कामगिरी करणार आहे.

🛰भारतीय अवकाश संशोधन संस्थेसाठी (इस्रो) ही ऐतिहासिक कामगिरी असणार आहे. भारताचा तिरंगा प्रथमच चंद्रावर फडकणार आहे. ही कामगिरी फत्ते होईल, याबाबत शास्त्रज्ञांनाही विश्‍वास आहे.

🛰‘‘विक्रम लॅंडर चंद्रावर उतरणे (सॉफ्ट लॅंडिंग) ही अत्यंत महत्त्वाची कामगिरी असणार आहे, त्यात १०० टक्के यश येईल,’’ असे मत ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी व्यक्त केले आहे. ‘चांद्रयान- १’ची मोहीम जी. माधवन नायर यांच्याच नेतृत्वाखाली पूर्णत्वास गेली होती.

🛰‘इस्रो’ने २२ जुलै रोजी ‘चांद्रयान- २’चे प्रक्षेपण केले होते.

🛰 सुमारे ९७८ कोटी रुपये खर्च आलेल्या या मोहिमेतील महत्त्वाचा एक टप्पा २ सप्टेंबर रोजी पार पडला. त्या वेळी चांद्रयानापासून विक्रम लॅंडर वेगळा करण्यात आला.

      🌓 असे होईल चंद्रावतरण 🌔

🛰 लँडर चंद्राभोवतीच्या कक्षेत ३० किलोमीटर उंचीवर असताना एक वाजून ४० मिनिटांनी त्याच्यावरील ८०० न्यूटन शक्तीचे पाचपैकी दोन इंजिन सुरू करण्यात येतील.

🛰६२० सेकंदांच्या या प्रक्रियेतून (रफ ब्रेकिंग फेज) लँडर ५८७ किलोमीटर अंतर कापून चंद्राच्या जमिनीपासून साडेसात किलोमीटर उंचीवर येईल.

🛰जमिनीपासून १०० मीटर उंचीवर असताना लँडर २२ सेकंदांसाठी तरंगते ठेवून उतरण्याच्या ठिकाणाची पाहणी करेल.

🛰जमिनीपासून १० मीटर उंचीवर असताना लँडरचा वेग शून्य करण्यात येईल. या स्थितीत एक वाजून ५५ मिनिटांनी विक्रम लँडर चंद्रावर उतरेल.

🛰लँडर चंद्रावर उतरल्यावर चार तासांनी त्याच्या आतील प्रग्यान रोव्हर बाहेर येऊन चांद्रभूमीवरील प्रवास सुरु करेल.

      🙇‍♀ विद्यार्थी अनुभवणार थरार🙇‍♂

🛰‘चांद्रयान- २’ मोहिमेनिमित्त ‘इस्रो’ने घेतलेल्या प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत ६० विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

🛰त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ‘चांद्रयान- २’ची कामगिरी ‘इस्रो’च्या मुख्यालयात बसून पाहता येणार आहे.

🛰प्रश्नमंजूषा स्पर्धेत वीस प्रश्‍न विचारण्यात आले होते व त्यांची उत्तरे १० मिनिटांत द्यायची होती. यात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

सहकार

   11th सहकार  :- Click Here 12th सहकार  :- Click Here