Saturday 25 January 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ः शिक्षणाचा दर्जेदारपणा तपासण्याचे आदेश

◾️शासनातर्फे शाळांना अनुदान दिले जाते. मात्र, अशा शाळांमधून दर्जेदार शिक्षण दिले जाते का हे तपासण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केल्या.

◾️बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षण पद्धतीत बदल होणे आवश्‍यक असून राज्यातील सर्व शाळांमध्ये व्हर्च्युअल क्‍लासरुम' उभारण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने तातडीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी आज दिले.

◾️शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. यावेळी ते बोलत होते.

◾️ यावेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 13 JUNE 2024

1) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेल्या 'ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स' मध्ये भारत 129 व्या स्थानावर पोहोचला आहे. 2) दरवर्षी 13 जून रो...