Saturday 19 March 2022

चीनमध्ये एका वर्षानं करोना मृत्यू ; अमेरिकेतही निर्बंध परतणार.

🔮जागतिक कोविड-19 प्रकरणांमध्ये घट झाल्याच्या काही आठवड्यांनंतर आता पुन्हा एकदा करोना महामारीने जागतिकस्तरावर डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे. चीन आणि दक्षिण कोरिया सारखे देश दररोज कोविड -19 प्रकरणांच्या बाबतीत नवीन उच्चांक गाठत आहेत, जे मुख्यतः ओमायक्रॉन व्हेरिएंटद्वारे वाढत आहेत. शिवाय अमेरिकेतही निर्बंध पुन्हा लागू केले जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

🔮२०२० मध्ये वुहानमध्ये सुरुवातीच्या उद्रेकानंतर चीन सध्या स्थानिक पातळीवर पसरलेल्या कोविड-19 प्रकरणांच्या सर्वात मोठ्या लाटेशी लढत आहे. तसेच, आज (शनिवार) चीनमध्ये दोन करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे. जानेवारी २०२१ नंतर करोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत झालेली ही पहिली वाढ आहे.

🔮चीनमध्ये शनिवारी सामुदायिक संक्रमणातून २ हजार १५७ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली, ज्यामध्ये बहुसंख्य जिलिन प्रांतात आढळले आहेत. तर जिलिन प्रांतात करोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी प्रवासावर निर्बंध लादण्यात आले आहेत आणि लोकांना प्रवास करण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे देखील आवश्यक केले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 24 एप्रिल 2024

◆ 'राष्ट्रीय पंचायती राज दिन' दरवर्षी 24 एप्रिल रोजी भारतात साजरा केला जातो. ◆ ‘प्राध्यापक नईमा खातून’ या अलीगड मुस्लिम विद्यापीठा...