Saturday 19 August 2023

भारतीय राज्यघटना प्रश्नसंच


१) खालीलपैकी कोणत्या तरतूदीव्दारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते ?

   1) अनुच्छेद 32    2) अनुच्छेद 25    3) अनुच्छेद 14    4) अनुच्छेद 30

उत्तर :- 1

२) खालीलपैकी कोणते विधान चूक आहे ?

   1) अनुच्छेद 29 च्या शिर्षकात अल्पसंख्याक शब्द आहे.

   2) अनुच्छेद 29 च्या बहुसंख्यासाठीही लागू आहेत.

   3) अल्पसंख्याकाचा निकष धर्म आणि भाषा आहे.

   4) सर्व विधाने खरी आहेत.

उत्तर :- 4

३) खालीलपैकी कोणता हक्क “सविधांनिक” आहे परंतु मूलभूत हक्क नाही ?

   1) अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क
   2) मालमत्तेविषयक हक्क
   3) संपूर्ण भारतात मुक्त संचार करण्याचा हक्क
   4) धर्म स्वातंत्र्याचा हक्क

उत्तर :- 2

४) भारतीय राज्यघटनेचे कलम 16 कशाशी संबंधित आहे ?

   1) राज्यकारभाराची मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्ये
   2) मूलभूत कर्तव्ये व अधिकार
   3) नववा परिशिष्ट व सातवा परिशिष्ट
   4) मूलभूत अधिकार

उत्तर :- 4

५) भारतीय राज्य घटनेच्या कलम 12 नुसार “राज्य” या संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था / यंत्रणा अंतर्भूत होत नाही ?

   1) विधानसभा    2) विधान परिषद    3) उच्च न्यायालय    4) जिल्हा परिषद

उत्तर :- 3

६) खालीलपैकी कोणते / कोणती विधान / ने बरोबर आहे / आहेत ?

   अ) अनिवासी भारतीय नागरिक निवडणुकीत मतदानाला पात्र असतील.

   ब) अशी व्यक्ती भारतातील कोणत्याही मतदारसंघात नाव नोंदवू शकतो.

   क) मतदार म्हणून नाव नोंदवण्याकरता अशा व्यक्तीने अशा व्यक्तीने भारतीय दूतावासात अर्ज केला पाहिजे.

   1) सर्व विधाने
   2) कोणतेही नाही
   3) फक्त अ 
   4) अ आणि ब

उत्तर :- 3

७) भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?

   1) फसवणूक करून, खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल.

   2) कृतीतून वा भाषणातून राज्य घटनेशी बेइमानी किंवा द्रोह केला असेल.

   3) भारताशी शत्रुत्व किंवा युध्द करणा-या राष्ट्राला मदत केली असेल.

   4) भारताबाहेर सलग पाच वर्षे वास्तव्य केल्यास.

उत्तर :- 4

८) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

   अ) एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर परंतु 1 जुलै 1987 पूर्वी झालेला असेल तर ती
        व्यक्ती भारतीय नागरिक असते.

   ब) एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 1 जुलै 1987 रोजी किंवा त्यानंतर झाला असेल आणि जर तिच्या जन्माच्या वेळी तिच्या आईवडिलांपैकी कोणीही एक भारताचे नागरिक असतील तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असेल.

   क) जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक अज्ञान मूलाचे भारतीय    नागरिकत्व देखील संपुष्टात येते.

   1) अ    
   2) ब  
   3) क   
  4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 4

९) भारतीय नागरिकांच्या ............ अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग 3 कलम 14 ते 18 मध्ये केला आहे.

   1) समतेचा    2) स्वातंत्र्याचा 
   3) धर्माचा    4) चौथ्या

उत्तर :- 1

१०) 44 व्या घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता अधिकार काढून टाकण्यात आला ?

   1) समानतेचा अधिकार 
    2) संपत्तीचा अधिकार
   3) स्वातंत्र्याचा अधिकार  
   4) शैक्षणीक अधिकार

उत्तर :- 2

११) मूलभूत हक्कांसदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?

   अ) मूलभूत हक्के हे अनिर्बंध आहेत.
   ब) संसद त्यामध्ये दुरुस्ती करु शकते.
   क) संसद त्यांवर मर्यादा घालू शकते.
   ड) ते समर्थनीय आहेत.

    1) अ 
    2) ब   
   3) क  
   4) ड

उत्तर :- 1

१२) भारतीय घटनेनी प्रदान केलेल्या हक्कांमधील “धर्मस्वातंत्र्याचा हक्क” यामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही ?

   1) एखाद्या धर्माविषयी प्रवचन करण्याचा हक्क

   2) एखाद्या धर्माचे पालन करण्याचा हक्क

   3) एखाद्या धर्माचा प्रसार करणेविषयी हक्क

   4) सक्तीचे धर्मांतर करण्याचा हक्क

उत्तर :- 4

१३) मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे  ?

   1) कायदेमंडळ 
   2) कार्यकारी मंडळ
   3) राजकीय पक्ष 
   4) न्यायमंडळ

उत्तर :- 4

१४) भारतीय राज्यघटनेत समानतेचा हक्क पाच कलमांमध्ये मान्य केलेला आहे ती कलमे कोणती ?

   1) कलम 13 ते 17 
  2) कलम 14 ते 18 
  3) कलम 15 ते 19   
4) कलम 16 ते 20

उत्तर :- 2

१५) घटनेच्या कलम 16 संदर्भात खालील विधाने तपासा आणि उत्तराचा योग्य पर्याय निवडा.

   अ) पोटकलम 4-A चा 77 व्या घटनादुरुस्तीव्दारे समावेश केला गेला.

   ब) पोटकलम 4-A हे पदोन्नतीमध्ये आरक्षणासंदर्भात आहे.

   क) पोटकलम 4-A हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग यांच्या हिताकरता, पदोन्नतीमधील    आरक्षणासंदर्भात आहे.

   1) अ आणि ब बरोबर, तर क चूक आहे.

   2) अ आणि क बरोबर, तर ब चूक आहे.

   3) सर्व बरोबर आहेत

   4) अ बरोबर, तर ब आणि क चूक आहेत.

उत्तर :- 1

१६) भारतीय संविधानाच्या 19 (1) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही ?

   1) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य 

    2) मुद्रण स्वातंत्र्य

   3) बिनाशस्त्र व शांततेने  एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य

4) भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य

उत्तर :- 2

१७) घटनेच्या 19 (1) (अ) व्या कलमामध्ये मान्य केलेल्या नागरिकांच्या खालील कारणांमुळे वाजवी बंधने येऊ शकतात.

   अ) देशाचे सार्वभौमत्व 
   ब) देशाची एकता   
   क) प्रांताची सुरक्षितता  
   ड) सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी

   1) अ, क    2) ब, ड    
  3) अ, ब      4) ड

उत्तर :- 3

१८) खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मुलभूत हक्कात नाही  ?

   1) समतेचा हक्क   
   2) स्वातंत्र्याचा हक्क 
   3) धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क 
  4) मालमत्तेचा हक्क

उत्तर :- 4

१९) सहा ते 14 वर्षे वय गटातील मुलांना मोफत व अनिवार्य शिक्षणाचा अधिकार संविधानांत संशोधन करून भाग III मध्ये एक अनुच्छेद समाविष्ट करुन प्रदान केला आहे. कितवे संशोधन व कोणता अनुच्छेद ? एक जोडी निवडा. 

   1) 86 वे संशोधन – अनुच्छेद 19 (फ)
   2) 93 वे संशोधन – अनुच्छेद 21 (अ)
   3) 86 वे संशोधन – अनुच्छेद 21 (अ)
   4) 93 वे संशोधन – अनुच्छेद 19 (फ)

उत्तर :- 3

२०) ‘बंदीप्रत्यक्षीकरण’ आज्ञेबाबतच्या विधानांचा विचार करा:

   अ) मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी अशी आज्ञा काढली जाते.

   ब) अशी आज्ञा काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना दिला आहे.

   क) व्यक्तीला न्यायालयापुढे हजर करुन बंदी करण्याचा कारणाचे समर्थन करण्याची आज्ञा न्यायालय बंदी करणा-या   अधिका-याला देऊ शकते.

   ड) न्यायालयाने फौजदारी गुन्ह्याबद्दल तुरुंगवास दिलेल्या व्यक्तीची सुटका मिळविण्यासाठी देखील अशी आज्ञा काढता येते.

         वरील ‍विधानांपैकी कोणते बरोबर आहे / आहेत ?

   1) केवळ अ  
2) केवळ ब आणि क   
3) केवळ अ आणि क   
4) केवळ अ, ब आणि क

उत्तर :- 4

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...