Tuesday 30 June 2020

“प्रोजेक्ट प्लॅटिना”: महाराष्ट्रात चाललेला जगातला सर्वात मोठा प्लाझ्मा थेरपी ट्रायल प्रकल्प.

L▶️कोविड-19च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर प्रभावी ठरतो. या थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्र राज्यात जगातला सर्वात मोठा प्लाझ्मा थेरपी ट्रायल प्रकल्प राबवविला जात आहे. या प्रकल्पाला “प्रोजेक्ट प्लॅटिना” असे नाव देण्यात आले आहे.

▶️नागपूरच्या शासकीय महाविद्यालयात ‘प्लॅटिना’ प्रकल्प केंद्राचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. याप्रसंगी प्लाझ्मा डोनेशन, प्लाझ्मा बॅंक, प्लाझ्मा ट्रायल आणि इर्मजन्सी ऑथराजेशन या चार सुविधांचेही उद्घाटन करण्यात आले.

▶️महाराष्ट्रात 23 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये, पालिका रुग्णालये या ठिकाणी या उपचार पद्धतीचा वापर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यापैकी 17 ठिकाणी ही उपचार पद्धती कोविड रुग्णांसाठी सुरु होत आहे. राज्यात ज्या 10 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांची सुविधा नाही, तिथे आरोग्य विभागामार्फत प्लाझ्मा संकलनासाठी लागणारे यंत्र पुरविले जाणार आहेत. हा संकलीत केलेला प्लाझ्मा वैद्यकीय महाविद्यालयात पुरविला जाणार.

🟣प्लाझ्मा थेरपीविषयी....

▶️प्लाझ्मा थेरपीमध्ये आजारातून बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोविड-19 रुग्णांवर उपचार करण्यात येतात. जे रुग्ण बरे होऊन चालले आहेत त्यांनी 10 दिवसानंतर 28 दिवसांच्या आत प्लाझ्मा दान करणे आवश्यक आहे.

▶️विकित्सक रक्तातून प्लाझ्मा स्वतंत्ररीत्या काढतात. बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तात प्रतिजैवकांचा विकास झालेला असतो. प्लाझ्मापासून ही प्रतिजैवके प्राप्त करून एखाद्या रोग्याला दिले जातात. यामुळे त्याची प्रतिरोधक शक्ती अधिक प्रभावीपणे काम करू शकते.

▶️मध्यम व तीव्र स्वरुपाची लक्षणे असलेल्या व नेहमीच्या औषध उपचारांनी बरा न होणारा, ऑक्सिजनची गरज असणारा रुग्ण यासाठी निवडला जातो.

No comments:

Post a Comment

Latest post

....𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....

◾️2024 विस्डेन क्रिकेटर्स ऑफ द इयर रिपोर्ट प्रकाशित ◾️रिपोर्ट नुसार जगातील सर्वाधिक आघाडीचे क्रिकेटपटू ⭐️पुरुष : पॅट कमिन्स (Australia) ...