Saturday 20 February 2021

नर्चरिंग नेबरहुड्स चॅलेंज’ जाहीर.



💫18 फेब्रुवारी 2021 रोजी केंद्रीय 

गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या स्मार्ट सिटीज अभियानाने ‘नर्चरिंग नेबरहुड्स चॅलेंज’ समूहासाठी (आपल्या आजूबाजूचा परिसर विकास आव्हान) अंतर्गत 25 शहरांची अंतिम यादी जाहीर केली आहे.


💫‘नर्चरिंग नेबरहुड्स चॅलेंज’ समूहासाठी पुढील शहरे निवडली आहेत - आगरतळा, बंगळूरू, कोइंबतूर, धर्मशाला, इरोडे, हुबळी-धारवाड, हैदराबाद, इंदूर, जबलपूर, काकीनाडा, कोची, कोहिमा, कोटा, नागपूर, राजकोट, रांची, रोहतक, राउरकेला, सालेम, सूरत, तिरुवनंतपुरम, तिरुपुर, उज्जैन, वडोदरा आणि वरंगल.


💫तीन महिन्यांच्या अर्जाच्या कालावधीत, नर्चरिंग नेबरहुड्स चॅलेंज अंतर्गत 100 पेक्षा जास्त शहरे दूरस्थ किंवा वैयक्तिक चर्चा आणि ऑनलाइन क्षमता-निर्माण कार्यशाळांमध्ये सहभागी झाली. एकत्रितपणे, संपूर्ण देशभरात 300 पेक्षा जास्त पायलट प्रकल्प प्रस्तावित आहेत जे 0-5 वर्षे वयोगटातील 12 लाख मुलांचे जीवनमान सुधारतील.


🌈कार्यक्रमाविषयी.....


💫4 नोव्हेंबर 2020 रोजी सुरू करण्यात आलेल्या नर्चरिंग नेबरहुड्स चॅलेंजने सर्व स्मार्ट शहरे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची राजधानी आणि 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांना यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले. 


💫या उपक्रमात, निवडलेल्या शहरांना त्यांचा प्रस्ताव, सज्जता आणि वचनबद्धतेच्या आधारे-लहान मुलांचे जीवनमान सुधारणारे प्रायोगिक प्रकल्प आणि स्थानिक समाधान विकसित करण्यासाठी आवश्यक ती तांत्रिक मदत आणि क्षमता-निर्मिती उपलब्ध करून दिली जाईल.


💫सर्वसमावेशक विकासाच्या मुख्य उद्देशांतर्गत, केंद्र सरकार सर्व असुरक्षित नागरिकांसाठी, विशेषत: लहान मुलांसाठी शहरी भागात संधी वाढविण्यासाठी वचनबद्ध आहे.


💫हा तीन वर्षात राबविला जाणारा उपक्रम आहे, सरकारच्या स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत मुलांचे बालपण केंद्रस्थानी ठेवून शेजारील परिसराचा विकास करण्यास मदत करणे हे याचे उद्दिष्ट आहे.

बर्नार्ड व्हॅन लीअर फाऊंडेशन आणि तांत्रिक भागीदार WRI इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


💫लहान मुलांच्या समृद्ध बालपणासाठी आरोग्यदायी शहरी वातावरण निर्माण करण्यासाठी शहरांना सहभागी करून या आव्हानाने स्थानिक पातळीवरील शेजारील परिसर विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. नागरिकांची गुणवत्ता वाढविणार्‍या स्थानिक क्षेत्रात सुटसुटीत, सर्वसमावेशक, लोकाभिमुख विकासासाठी शहर-व्यापी उपाययोजना वाढविण्यासाठी स्मार्ट सिटीज अभियानाच्या धोरणाशी हा दृष्टिकोन सुसंगत आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

WORLD AIR QUALITY REPORT 2023

🔶जागतिक हवा गुणवत्ता अहवाल २०२३ • अहवाल जाहीर करणारी संस्था : IQAIR स्वित्झर्लंड (स्थापना 1963) • एकूण देश : 134 ☑️या अहवालानुसार 👇👇 ...