Saturday 20 February 2021

सार्वत्रिक लसीकरणासाठी ‘सघन मिशन इंद्रधनुष 3.0’



🔰केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी 19 फेब्रुवारी 2021 रोजी ‘सघन मिशन इंद्रधनुष (IMI) 3.0’ या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा प्रारंभ केला.


🔰कद्रीय मंत्र्यांनी IMI 3.0 पोर्टल देखील सुरू केले आणि IMI 3.0 यासाठी मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली तसेच अभियानाचा एक भाग म्हणून विकसित केलेल्या जनजागृती साहित्य / IEC पॅकेजचे अनावरण केले.


🅾️ठळक बाबी


🔰अभियान दोन फेऱ्यात होणार असून, पहिली फेरी 15 दिवसांसाठी 22 फेब्रुवारी 2021 पासून सुरू होणार आणि दुसरी फेरी 22 मार्च 2021 पासून सुरू होणार आहे.


🔰दशातील 29 राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील निवडक 250 जिल्हे / शहरी भागात त्यांचे आयोजन केले जाईल.


🔰कोविड-19 महामारीच्या काळात ज्या मुले आणि गर्भवती स्त्रियाना लस घेता आली नाही त्यांच्या लसीकरणावर या कार्यक्रमामध्ये भर दिला जाणार आहे. IMI 3.0 च्या दोन फेऱ्यांमध्ये त्यांची ओळख पटवली जाईल आणि त्यांना लस दिली जाईल.


🔰सथलांतरित क्षेत्रातील लाभार्थी आणि पोहोचण्यास कठीण अशा दुर्गम भागाकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.


🅾️भारत सरकारचे मिशन इंद्रधनुष


🔰2020 सालापर्यंत देशातील सर्व बालकांना लसीकरण कार्यक्रमांतर्गत आणण्यासाठी 15 डिसेंबर 2014 रोजी ‘मिशन इंद्रधनुष’ हे अभियान आरोग्य मंत्रालयाने सुरू केले. 2018 सालापर्यंत सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाच्या अंतर्गत दोन वर्षाखालील वयोगटातली मुले आणि गर्भवती स्त्रियांना उपलब्ध सर्व लसी प्रदान करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम होता.


🔰8 ऑक्टोबर 2017 रोजी गुजरातच्या वडनगरमध्ये ‘सघन मिशन इंद्रधनुष’ (Intensified Mission Indradhanush -IMI) या अभियानाला सुरुवात करण्यात आली. हा भारत सरकारचा एक प्रमुख लसीकरण कार्यक्रम आहे. यादरम्यान निवडक शहरी क्षेत्रांमध्ये आणि अन्य ठिकाणी, जेथे लसीकरण कमी प्रमाणात केले जाते, तेथे लक्ष केंद्रित केले गेले. या विशेष अभियानांतर्गत 90 टक्के क्षेत्रांना सामील केले जाईल.


🔰“सघन मिशन इंद्रधनुष” आतापर्यंत 690 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आले आहे आणि 3 कोटी 76 लक्ष 40 हजार मुले आणि 94 लक्ष 60 हजार गर्भवती महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...