Tuesday 4 February 2020

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोडला 17 वर्षांपूर्वीचा विक्रम


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज वर्ष 2020-21 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर एकीकडे विविध प्रतिक्रिया येत आहेत.

तर दुसरीकडे हा अर्थसंकल्प काही वेगळ्या कारणांमुळे विशेष देखील ठरला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज या अर्थसंकल्पाद्वारे 17 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.

अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्याच्या वेळेच्यानुसार सर्वात प्रदीर्घ असे भाषण केले आहे. त्यांचे भाषण 2 तास 40 मिनिटं चालले.

तर या अगोदर माजी अर्थमंत्री जसवंतसिंह यांच्या नावावर सर्वात प्रदीर्घ भाषणाचा विक्रम आहे. त्यांनी 2 तास 13 मिनिटं भाषण केले होते.

तसेच त्यांच्या खालोखाल दिवगंत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचा क्रमांक येतो. त्यांनी 2 तास 10 मिनिटं भाषण केले होते. तर, 2019 मध्ये निर्मला सीतारामन यांनी 2 तास 5 मिनिटं भाषण केलेलं आहे.

याशिवाय निर्मला सीतारामन या दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री देखील ठरल्या आहेत.

या अगोदर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देखील दोनवेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. मात्र, तेव्हा त्यांच्याकडे अर्थमंत्रालयाशिवाय अन्य खात्यांची देखील अतिरिक्त जबाबदारी होती.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना

👉 1. महंमद गझनवी :- अकराव्या शतकापासून भारतावर तुर्काची आक्रमणे होण्यास सुरुवात झाली. गझनीचा तुर्क सत्ताधीश सबक्तगीन याने भारतावर स्वार्‍या...