Tuesday 4 February 2020

Hobart International स्पर्धेमध्ये सानिया मिर्झाचं दणक्यात पुनरागमन, पहिल्याच प्रयत्नात पटकावलं विजेतेपद.

🔰 बाळतंपण आणि त्यानंतर आपल्या मुलाकडे लक्ष देण्यासाठी टेनिसपासून दुरावलेल्या सानिया मिर्झाने दणक्यात पुनरागमन केलं आहे. 

🔰 WTA Hobart International Tennis स्पर्धेत सानियाने आपली युक्रेनची साथीदार नादीया किचनॉकच्या साथीने दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे.

🔰 अंतिम फेरीत सानिया-नादीया जोडीने चीनच्या शुई पेंग आणि शुई झँग जोडीचा ६-४, ६-४ ने पराभव केला. अवघ्या १ तास २१ मिनीटांत सानिया मिर्झा आणि तिच्या साथीदाराने हा सामना खिशात घातला.

🔰 तब्बल दोन वर्षांनी सानिया मिर्झाने आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुनरागमन केलं आहे.

🔰 सानियाचं हे दुहेरीमधलं ४२ वं विजेतेपद ठरलं. याव्यतिरीक्त सानियाच्या नावावर २०१६ सालचं ऑस्ट्रेलियन ओपनचं महिला दुहेरी आणि २००९ साली मिश्र-दुहेरी स्पर्धेचं जेतेपदही जमा आहे. त्यामुळे आगामी काळात सानिया टेनिसमध्ये कशी प्रगती करतेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ युनायटेड नेशन्स ट्रेड अँड डेव्हलपमेंट (UNCTAD ) च्या अहवालानुसार  2023 मध्ये भारतात थेट परकीय गुंतवणुकीत 15 व्या स्थानावर आहे ◾️2023 मध...