Saturday 3 August 2019

​🔹नासाने लावला तीन बाह्य ग्रहांचा शोध

नासाच्या ग्रहशोधक उपग्रहाने तीन नवीन बाह्यग्रहांचा शोध लावला असून, हे ग्रह पृथ्वीपासून 73 प्रकाशवर्षे दूर आहेत. याबाबतचा शोधनिबंध नेचर ॲस्ट्रॉनॉमी या नियतकालिकात प्रसिद्ध झाला असून, यात तीन नवीन बाह्यग्रहांपैकी एक ग्रह खडकाळ व पृथ्वीपेक्षा थोडा मोठा आहे. इतर दोन ग्रहांवर वायूचे प्रमाण जास्त असून, ते पृथ्वीपेक्षा दुप्पट आकाराचे आहेत.
टेस ऑब्जेक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजे टीओआय-270 या तारका प्रणालीभोवती हे ग्रह फिरत असून, ट्रान्झिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाइट या उपग्रहाने ज्या प्रकारचे ग्रह शोधणे अपेक्षित होते, त्याच प्रकारचे ते ग्रह आहेत, असे कॅॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे.

यातील लहान ग्रह हा मातृ तार्‍यापासून अशा अंतरावर आहे की, जिथे पाणी द्रवरूपात असू शकेल. टीओआय-270 हा मातृतारा शांत आहे. त्यावर कुठल्या ज्वाळा नाहीत, त्यामुळे तो आणि त्याभोवती फिरणार्‍या ग्रहांचे निरीक्षण करणे सोपे आहे. यात काही ग्रह तार्‍यापासून वसाहतयोग्य अंतरावर आहेत. म्हणजे, ते इतक्या अंतरावर आहेत, ज्यामुळे तिथे पाणी असू शकते, असेही संशोधकांचे मत आहे.

आपल्या सौरमालेत पृथ्वी, मंगळ, शुक्र  व बुध असे लहान ग्रह आहेत, ते खडकाळ आहेत; तर शनी, गुरू, युरेनस, नेपच्यून हे ग्र ह वायूने भरलेले आहेत. नेपच्यूनच्या निम्म्या आकाराचे ग्रह आपल्या ग्रहमालेत फार जास्त प्रमाणात नाहीत, पण ते इतर तार्‍यांभोवती आहेत. टीओआय-270 या ग्रहमालेच्या अभ्यासातून पृथ्वीसारखे खडकाळ व नेपच्यूनसारखे वायूचे ग्रह यांच्यातील दुवा साधता येणे शक्य आहे, असे एमआयटीचे संशोधक मॅक्सिमिलीयन गुंथर यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...