Friday 9 August 2019

📚 *चालू घडामोडी (09/08/2019)*📚

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *लिंगाधारित अर्थसंकल्प [Gender Budget]

- या संकल्पनेचा उद्य 90 च्या दशकात झाला.
- जागतिक महिला परिषद 1995 नंतर "युनिफेम"तर्फे 1996 मध्ये द. आफ्रिका, पूर्व आफ्रिका, दक्षिण पूर्व आशिया, मध्य अमेरिका या भागात या संकल्पनेवर काम सुरू झाले.
- ही संकल्पना सर्वप्रथम ऑस्ट्रेलियात स्विकारण्यात आली.
---------------------------------------------------
● नक्की संकल्पना काय ?

- जेंडर बजेट म्हणजे महिलांसाठी वेगळा अर्थसंकल्प नव्हे, तर अर्थसंकल्पातील विविध प्रस्तावांचे महिलाकेंद्रित विश्लेषण होय.
- थोडक्यात स्त्रियांच्या स्थितीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या वित्तीय सुधारणांचे अंतिम परिणाम मोजणे म्हणजे जेंडर बजेट.
---------------------------------------------------
● भारतात सुरूवात

- सर्वप्रथम 2001 मध्ये या संकल्पनेवर विचार होवू लागला.
- तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या 2000-2001 च्या अर्थसंकल्पीय भाषणात पहिल्यांदा जेंडर बजेटचा उल्लेख झाला.
- 2004 मध्ये केंद्र सरकारने ही संकल्पना स्विकारली तर 2005 पासून त्यावरचे परिशिष्ट हा बजेटचा भाग बनले.
- ओरिसा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार, केरळ, इ. राज्यांनी या संकल्पनेची अंमलबजावणी केली.
---------------------------------------------------
● महाराष्ट्रात सुरूवात

- राज्यात 2013 मध्ये जेंडर बजेट ही संकल्पना स्विकारण्यात आली.
- 1994, 2001 आणि 2014 अशी तीन महिला धोरणे महाराष्ट्र सरकारने तयार केली आहेत.
- 1992 पासून राज्यात नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिला व बालकल्याण समिती स्थापने बंधनकारक करण्यात आले आहे.
- महापालिकेच्या एकूण बजेटपैकी 5% रक्कम जेंडर बजेटसाठी राखून ठेवण्याचे बंधनकारक आहे.
---------------------------------------------------
● जेंडर बजेटची उद्दिष्टे

- महिलांच्या सामाजिक समानतेसाठीच्या प्रमुख गरजा ओळखून त्यांची क्रमवारी लावून, त्यासाठी सुयोग्य आर्थिक तरतूद करणे.
- सामाजिक योजना आणि आर्थिक तरतुदी यांची सांगड घालणे.
- विशेष सामाजिक योजनांवरील खर्चावर नियंत्रण ठेवणे.
-------------------------------------------------
● अर्थसंकल्पाची कार्यपद्धती

- लिंगाधारित अर्थसंकल्पासाठी स्वतंत्र आदेश जारी करणे.
- जेंडर बजेट सेल स्थापन करणे.
- जेंडर बजेट अहवाल प्रसिद्ध करणे.
-------------------------------------------------
● जेंडर बजेटसाठी प्रशिक्षण

Vaikunth Mehta National Institute of Cooperative Management [VAMNICOM] Pune या संस्थेच्या Centre for Gender Studies मार्फत जेंडर बजेट संबंधी मार्गदर्शन, जागरूकता आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *आज प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना भारतरत्न*

●माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आज (8 ऑगस्ट 2019 गुरूवार) देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान पुरस्कार 'भारत रत्न' देण्यात आला.,
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार बहाल केला.

● राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

● या पुरस्कारासाठी दि. 25 जानेवारी 2019  या तिघांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती.

प्रणव मुखर्जी

● प्रणव मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला.

● मुखर्जी हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसशी संबंधित आहेत.

● ते 1982 मध्ये वयाच्या 47 व्या वर्षी भारताचे सर्वात तरुण अर्थमंत्री झाले होते. त्यानंतर त्यांनी भारताचे अर्थमंत्री,परराष्ट्रमंत्री तसेच संरक्षणमंत्री म्हणून काम केले.

● पंतप्रधानां व्यतिरिक्त ,आठ वर्षे लोकसभेचे सभागृह नेते राहिलेले ते एकमेव व्यक्ती.

● भारतरत्न पुरस्कार मिळविणारे सहावे राष्ट्रपती आहेत. याआधी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकीर हुसेन,व्हीव्ही गिरी आणि डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला आहे.

● पद्मविभूषण:2008

● त्यांनी 25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017 पर्यंत भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून काम केले.

नानाजी देशमुख

● हिंगोली जिल्ह्य़ातील कडोली येथे 11 ऑक्टोबर 1916 रोजी त्यांचा जन्म झाला.

● नानाजी देशमुख हे सामाजिक कार्यकर्ते होते. तसेच शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण स्वावलंबन या क्षेत्रात त्यांनी काम केले.

● नानाजी देशमुख हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते होते.

● राज्यसभेचे सदस्यही होते.

● 1999 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...