Friday 9 August 2019

🌹🌳🌴मोदी सरकारकडून ३००० ची ‘किसान’ पेंशन योजना आज पासून सुरू🌴🌳🌹

👉केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर दिल्लीतून याची सुरुवात करणार आहेत.

👉या योजनेचा फायदा देशातील ५ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.

👉स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच वेळ आहे जेव्हा शेतकऱ्यांना पेन्शन देण्यासाठी योजना सुरू केली जाईल.

👉देशभरातील अल्पभूधारक शेतकरी (एसएमएफ) साठी एक ऐच्छिक आणि योगदान देणारी पेन्शन योजना आहे.

👉या योजनेसाठी १८ ते ४० वर्षांपर्यंतचे शेतकरी अर्ज करू शकतील.

👉योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ५० रुपयांपासून १००, १५० रुपयांपर्यंत रोख रक्कम दरमहिन्याला भरावी लागेल.

👉तसंच स्किममध्ये गुंतवणुक करणाऱ्या शेतकऱ्यांना ६० वर्षाचे झाल्यानंतर दरमहिन्याला ३००० रुपये पेंशन म्हणून मिळणार.

👉पेंशन योजनेत नाव असलेल्या शेतकऱ्यांचा मृत्य़ू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला ५० टक्के रक्कम देण्यात येईल. म्हणजे १५०० रुपये मिळतील. तसंच ही योजना जीवन विमा निगम यांच्यातर्फे चालवली जाणार आहे.

👉या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी:-
१. आधार कार्ड,
२. जमिनीचा सात-बारा,
३. बँक पासबुक,
४. राशन कार्ड,
५. २ फोटो

अशा कागदपत्रांची गरज असणार आहे.

👉या योजने अंतर्गत १२ कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा करून देणे हा उद्देश आहे.

👉तसंच किसान पेंशन योजनेता लाभ घेण्यासाठी आपण किसान कॉल सेंटरच्या १८००-१८०-१५५१ या नंबरवर फोन करून माहिती घेऊ शकता. तसंच सामान्य सेवा केंद्र आणि राज्याचे कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करू शकता.

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...