Thursday 8 August 2019

✅✅एका ओळीत सारांश,9 ऑगस्ट 2019✅✅

🌹🌳🌴दिनविशेष🌴🌳🌹

👉8 ऑगस्ट रोजी भारताने या दिनाचा 77 वा वर्धापन दिन साजरा केला - ऑगस्ट क्रांती दिन.

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉RBIचा नवा रेपो दर - 5.40%.

👉RBIचा नवा रिव्हर्स रेपो दर - 5.15%.

👉RBIचा नवा बँक दर - 5.65%.

👉RBIचा नवा मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (MSF) दर - 5.65%.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉8 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (NISE) आणि या जागतिक संघटनेच्या दरम्यान कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यासंदर्भात करार झाला - संयुक्त राष्ट्रसंघ औद्योगिक विकास संस्था (UNIDO).

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉“भारतरत्न” हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेले भारताचे तेरावे राष्ट्रपती - प्रणव मुखर्जी.

👉7 ऑगस्ट रोजी निधन झालेले ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेता - जे. ओम प्रकाश.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉‘फोर्ब्ज’च्या सर्वाधिक कमाई करणार्‍या जगभरातल्या महिला खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवणारी एकमेव भारतीय महिला खेळाडू - बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू(55 लाख डॉलरसह तेराव्या स्थानी).

👉‘फोर्ब्ज’च्या सर्वाधिक कमाई करणार्‍या जगभरातल्या महिला खेळाडूंच्या यादीत प्रथम स्थान - टेनिसपटूसेरेना विल्यम्स (अमेरीका).

👉24 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात होणार्‍या ‘AASF एशियन एज ग्रुप चँपियनशिप 2019’ या स्पर्धेचे ठिकाण - बेंगळुरू (कर्नाटक).

👉दोन समांतर संस्थांची निवड करून दिशानिर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल 8 ऑगस्ट रोजी या जागतिक संस्थेनी भारतीय तिरंदाजी संघाची (AAI) सदस्यता निलंबित केली – वर्ल्ड आर्चरी.

🌹🌳🌴राज्य विशेष🌴🌳🌹

👉महाराष्ट्रासाठी असलेल्या मुख्य निवडणूक अध‍िकारी कार्यालयाऐवजी हा स्वतंत्र विभाग निर्माण करण्यास आणि त्यासाठी नवीन 128 पदे निर्माण करण्यास 7 ऑगस्टला झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली - राज्य निवडणूक विभाग.

🌹🌳🌴विज्ञान व तंत्रज्ञान🌴🌳🌹

👉ब्रिटनच्या या विद्यापीठातल्या वैज्ञानिकांनी जगातले जाडीने सर्वात पातळ (0.47 नॅनोमीटर) सोने (2-डी पदार्थ) तयार केले आहे जे मानवी बोटाच्या नखापेक्षा दहा लक्ष पटीने कमी जाडीचे किंवा फक्त दोन अणूच्या जाडीचे आहे – लीड्स विद्यापीठ.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉ज्या दराने बँकांना RBIकडून कर्ज दिले जाते - रेपो दर.

👉विविध बँकांच्या RBIमध्ये जमा असलेल्या पैश्यावर बँकांना मिळणारा व्याज दर - रिव्हर्स रेपो दर.

👉भारतीय जलतरण महासंघ (SFI) याचे स्थापना वर्ष – सन 1948.

👉अखिल भारतीय काँग्रेस परिषदेच्या मुंबई अधिवेशनात 'भारत छोडो' हा ठराव संमत झाला तो दिवस - 8 ऑगस्ट 1942.

👉संयुक्त राष्ट्रसंघ औद्योगिक विकास संस्था (UNIDO) – स्थापना वर्ष: 1966 (17 नोव्हेंबर); मुख्यालय: व्हिएन्ना, ऑस्ट्रिया.

👉आशिया जलतरण महासंघ (AASF) – स्थापना वर्ष: 1978; मुख्यालय: मस्कट, ओमान.

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...