Thursday 8 August 2019

🌺🌺 प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना भारतरत्न 🌺🌺

🔰माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आज (8 ऑगस्ट 2019 गुरूवार) देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान पुरस्कार 'भारत रत्न' देण्यात आला.,
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार बहाल केला.

🔰 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

🔰 या पुरस्कारासाठी दि. 25 जानेवारी 2019  या तिघांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती.

🔴प्रणव मुखर्जी

🔰 प्रणव मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला.

🔰 ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसशी संबंधित आहेत.
त्यांनी भारताचे अर्थमंत्री,परराष्ट्रमंत्री तसेच संरक्षणमंत्री म्हणून काम केले.

🔰 भारतीय राजकारणामधील अमूल्य सेवेसाठी त्यांना भारत सरकारने इ.स. 2008 साली पद्मविभूषण पुरस्कार दिला. 

🔰 त्यांनी 25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017 पर्यंत भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून काम केले.

🔴नानाजी देशमुख

🔰 हिंगोली जिल्ह्य़ातील कडोली येथे 11 ऑक्टोबर 1916 रोजी त्यांचा जन्म झाला.

🔰 नानाजी देशमुख हे सामाजिक कार्यकर्ते होते. तसेच शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण स्वावलंबन या क्षेत्रात त्यांनी काम केले.

🔰 नानाजी देशमुख हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते होते.

🔰 राज्यसभेचे सदस्यही होते.

🔰 1999 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले

🔰 त्यांनी आणीबाणीत उजव्या आणि डाव्या पक्षांना समान राजकीय कार्यक्रम देण्यात आणि इंदिरा गांधींविरोधात संघटित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

🔰 जनता सरकारचा प्रयोग अपयशी ठरल्यानंतर मात्र राजकारणातून बाहेर पडून त्यांनी ग्रामीण भारत स्वयंपूर्ण व्हावा, यासाठी स्वत:ला झोकून दिले.

🔰 चित्रकूट येथे त्यांनी भारतीय संस्कृती आणि शिक्षण या बाबतीत मोठे कार्य केले होते.

🔰 27 फेब्रुवारी 2010 रोजी वयाच्या 95 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

🔴भूपेन हजारिका

🔰 त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1926 रोजी आसामच्या साडिया येथे झाला.

🔰 भूपेन हजारिका यांनी आसामात चित्रपट संगीतकार, गायक, गीतकार आणि दिग्दर्शक म्हणून कार्य केले.

🔰 आसामीबरोबरच हिंदी आणि बंगाली चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले होते.

🔰 चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च अशा ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने तसेच पद्म किताबानेही त्यांचा गौरव झाला होता.

🔰 ‘इप्टा’पासून कलाजीवनाचा प्रारंभ केलेले हजारिका अनेक सामाजिक आंदोलनातही सहभागी होते.

🔰 2004 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा कडून गुवाहाटीत उभे राहिले परंतु निवडून येऊ शकले नाही.

🔰 5 नोव्हेंबर 2011 रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांचे मुंबईत निधन झाले.

🍀भारत रत्न पुरस्कार

🔰 सुरुवात: 1954

🔰 राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कारची  शिफारस पंतप्रधान करतात.

🔰 पुरस्काराच्या एक बाजूला पिंपळाच्या पानावर सूर्याची प्रतिमा व देवनागरीत कोरलेला भारतरत्‍न हा शब्द तर एक बाजूला भारताचे राजचिन्ह असते.

🔰 हा पुरस्कार रोख स्वरूपात देत नाहीत..'हा पुरस्कार ज्या व्यक्तींना मिळाला आहे, त्यांच्या नावाआधी भारतरत्‍न हा शब्द उपाधीसारखा वापरायची मुभा नाही.

🔰 भारतरत्न पुरस्काराने आजवर 48 जणांना सन्मानित करण्यात आले आहे.

🔰 यापूर्वी 2015 मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

🔰 आत्तापर्यंत हजारिका आणि देशमुख यांच्यासह 14 जणांना मरणोत्तर भारतरत्नने गौरविण्यात आले आहे.

🔰 सुरुवातीला भारतरत्न मरणोत्तर देण्याची तरतूद नव्हती. मात्र, त्यानंतर 1955 पासून मरणोत्तरही या सन्मानाने सन्मानित केले जाऊ लागले.

🔰 सेवा, कला, साहित्य, विज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा पुरस्कार देतात.

🔰 2014 मध्ये वरील क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले

🔰 प्रथम पुरस्कारविजेते(1954):
1) सर्वपल्ली राधाकृष्णन
2) चक्रवर्ती राजगोपालचारी
3) डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...