Sunday 6 March 2022

विषय : मराठी व्याकरण

*1】' रंगात येणे ' या वाक्प्रचारासाठी योग्य अर्थ निवडा. ?*

1) खूप मजा येणे
2) *तल्लीन होणे ☑*
3) विजय मिळवणे
4) फेर धरणे

*2】 ' बिंब ' या शब्दाला खालीलपैकी कोणते उपसर्ग जोडले असता बनणारा शब्द मूळ शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा असेल. ?*

1) गैर
2) यथा
3) *प्रति ☑*
4) बिन

*3】' कुस्ती खेळण्याची जागा ' या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. ?*

1) तट
2) *हौद ☑*
3) डोह
4) यापैकी नाही

*4】' शावक ' कोणाचे असते ?*

1) गाढवाचे
2) *हरणाचे ☑*
3) सिंहाचा
4) यापैकी नाही

*5】' भाव ' या शब्दाचा अर्थ असणारे पर्याय निवडा.  ?*

अ) भक्ती
ब) किंमत 
क) दर
ड) भावना

1) अ, ब, क
2) ब, क, ड
3) अ, क, ड
4) *अ, ब, क, ड ☑*

*6】खालीलपैकी मराठी उपसर्ग ओळखा. ?*

1) अनु
2) *अद ☑*
3) अप
4) अभि

*7】खालीलपैकी कोणत्या वाक्यात दर्शक सर्वनाम आलेले आहे. ?*

अ) ती मुलगी
ब) हा मुलगा आहे
क) ते चपळ बाळ आहे
ड) माणूस हा आळशी प्राणी आहे
इ) तो हत्ती दयाळू आहे

1) अ, ब, क
2) क, ड, इ
3) अ, क, ड
4) *ब, क, ड ☑*

*8】खालीलपैकी कोणत्या शब्दातील अंत्य 'अ' निभृत उच्चारला जातो. ?*

1) गृह
2) संत
3) *पान ☑*
4) शिस्त

*9】' आभाळगत माया तुझी आम्हांवरी राहू दे ! '  या ओळीत साधारण धर्म दर्शविणारा कोणता शब्द आला आहे ?*

1) आभाळ
2) गत
3) माया
4) *यापैकी नाही ☑*

*10】' तिचे मुख म्हणजे चंद्रबिंब होय ' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा ?*

1) *गौणी लक्षणा ☑*
2) शुद्धा लक्षणा
3) उपदान लक्षणा
4) लक्षण-लक्षणा

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...