Monday 6 July 2020

बेहरामजी मलबारी

👉मेहरवानजी यांचा मलबार किनारपट्टीवरून मसाले व सुगंधी द्रव्ये आणून सुरतमध्ये विकण्याचा व्यवसाय होता; त्यामुळे त्यांना मलबारी म्हणून ओळखले जात असे.

👉बेहरामजी यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सुरतमधील आयरिश प्रेझबिटेरिअन  मिशन स्कूलमध्ये झाले. ते १८७१ मध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. मिशनरी शाळेत शिकलेल्या बेहरामजींवर रेव्हरंड डॉ. विल्सन यांच्या विचारांचा व व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव होता. बेहरामजी पुढे मुंबईला आले व होरमुसजी जहांगीर यांच्या मालकीच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले (१८७६).

👉बेहरामजी यांचा विवाह धनबाईजी यांच्याशी झाला (१८७४). त्यांना तीन मुले व दोन मुली होत्या.

👉समाजसुधारणेच्या कार्यात आयुष्यभर स्वत:स वाहून घेणारे बेहरामजी यांनी पत्रकार म्हणूनही ख्याती मिळविली. प्रसिद्ध पारशी व्यावसायिक सर कासवजी जहांगीर यांनी बेहरामजी यांची ओळख टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक मार्टीन वूड यांच्याशी करून दिली. तेव्हापासून त्यांच्या पत्रकारितेतील कार्याची सुरुवात झाली.

👉पुढे वूड यांनी बॉम्बे गॅझेट हे साप्ताहिक सुरू केले. या साप्ताहिकामधून बेहरामजी यांनी गुजरात आणि गुजरातीज  ही  लेखमाला लिहिली. तसेच इंडियन स्पेक्टॅटर या साप्ताहिकामधून त्यांनी स्तंभलेखन करण्यास सुरुवात केली. इंडियन स्पेक्टॅटर हे साप्ताहिक त्यांनी विकत घेतले (१८७९) व अखेरपर्यंत त्यांनी संपादक म्हणून काम केले.

👉दादाभाई नवरोजी व विल्यम वेडरबर्न यांनी चालविलेल्या व्हॉइस ऑफ इंडिया या नियतकालिकामध्येही त्यांनी लेखन केले. ईस्ट अँड वेस्ट या नियतकालिकाचेही ते संपादक होते (१९०१–१२).

👉बेहरामजी हे एक उत्तम गुजराती कवी होते. त्यांनी सन १८७५ मध्ये नितिविनोद हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला.

👉यात त्यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम व बालविवाहाच्या प्रथेतून महिलांवर लादले गेलेले वैधव्य यांबाबतच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. १८७६ मध्ये त्यांनी इंडियन म्यूज इन इंग्लिश गार्ब हा इंग्रजी काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. याचबरोबर गुजरात अँड गुजरातीज (१८८२), द इंडियन आय ऑन इंग्लिश लाइफ (१८९१), सोशल रिफॉर्म इन इंडिया : इट्स स्कोपॲन्ड इम्पॉर्टन्स (१८८६), ॲन अपील फ्रॉम द डॉटर्स ऑफ इंडिया (१८९०) हे त्यांचे उल्लेखनीय ग्रंथ. त्यांनी आपल्या लेखनाद्वारे भारतीय स्त्रियांचा सामाजिक दर्जा वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न केला. शिवाय त्यांनी बालविवाहाला कडाडून विरोध करत विधवांच्या पुनर्विवाहाचे जोरदार समर्थन केले. 

👉बालविवाह व महिलांवर सक्तीने लादण्यात आलेले वैधव्य – काही टिपणे (१८८४) या लेखातून त्यांनी बालवैधव्यावर प्रकाश टाकला. १८८४–१८९१ या कालखंडात बेहरामजी मलबारी यांनी चालविलेल्या व्यापक आंदोलनामुळे ब्रिटिश शासनाला संमती वयाचा कायदा (१८९१, द एज ऑफ कन्सेन्ट ॲक्ट) संमत करावा लागला.

👉जर्मन प्राच्यविद्यापंडित माक्स म्यूलर यांच्या हिबर्ट व्याख्यानमालेतील ऑरिजिन अँड ग्रोथ ऑफ रिलिजन (१८७८) या भाषणांचा बेहरामजी यांनी गुजराती भाषेत अनुवाद केला (१८८१).

👉बेहरामजी यांचा म्यूलर यांच्याशी पत्रव्यवहार होता. समाजसुधारक दयाराम गिडूमल यांच्या सहकार्याने मुंबई येथे त्यांनी ‘सेवासदनʼ ही संस्था स्थापन केली (११ जुलै १९०८).

👉 सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय सुविधांच्या माध्यमातून निराश्रित व अनाथ स्त्रियांचा विकास घडवून आणणे हे या संस्थेचे ध्येय होते. मुंबईप्रमाणेच अहमदाबाद व सुरत येथेही ‘सेवासदन’च्या शाखा स्थापन करण्यात आल्या.

👉बेहरामजी यांनी क्षयरुग्णांसाठी कन्सम्पटिव्ह होम्स सोसायटीची स्थापना केली. या सोसायटीच्या माध्यमातून १९०९ मध्ये सिमला रोडवरील धर्मपूर या ठिकाणी ‘किंग एडवर्ड सॅनिटेरियम’ सुरू केले. यामुळे अनेक रुग्णांना फायदा झाला. या सोसायटीला पतियाळा, ग्वाल्हेर आणि बिकानेर येथील राजांनी आर्थिक मदत केली होती..

👉बेहरामजी यांना मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली (१८८७), तसेच १८९६च्या दुष्काळात केलेल्या कार्याबद्दल ब्रिटिश सरकारकडून कैसर-ए-हिंद या पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले (१९००). १८८५ मध्ये मुंबई येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये ते सहभागी झाले होते.

👉सिमला येथे त्यांचे निधन झाले.

🍁☘🌷🍁☘🌷🍁☘🌷🍁🌷🍁☘🌷

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...