Tuesday 26 October 2021

तरंगण्याचा नियम :

· पाण्याहून कमी घनता असलेला पदार्थ पाण्यावर तरंगतो.

· लाकडाचा ठोकळा पाण्यावर तरंगतो. पाण्यात जातांना तो पाणी बाजूला सारतो. सारलेल्या पाण्याचे वजन ठोकळ्याच्या वजनाएवढे होते.

या वेळी ठोकळ्याचे वजन आणि ठोकळ्यावर कार्य करणारे प्लावी बल समान असते.

· एक लोखंडी जाड पत्रा पाण्यात पडला की तो बुडतो. तथापि तोच पत्रा ठोकून घमेले केले तर ते पाण्यात तरंगते.

· अॅल्युमिनियमची फॉईल पाण्यावर तरंगते पण त्याचीच चुरगळून बनविलेली गोळी मात्र पाण्यात बुडते आणि पार्यांवर तरंगते. यांचे कारण घनतेतील बदल होय.

· पदार्थाची घनता म्हणजे त्याचे वस्तुमान व आकारमान यांचे गुणोत्तर होय. त्याचे SI पद्धतीतील एकक किलोग्रॅम/मीटर3 असे आहे.

· जर वस्तूची घनता द्रवाच्या घनतेपेक्षा अधिक असेल तर ती पाण्यात बुडते. मात्र जर वस्तूची घनता द्रवाच्या घनतेपेक्षा कमी असेल तर ती पाण्यावर तरंगते.

· पदार्थाची सापेक्षा घनता म्हणजे त्याच्या घनतेचे पाण्याच्या घनतेशी असणारे गुणोत्तर होय.

· सापेक्ष घनता = पदार्थाची घनता / पाण्याची घनता

· यालाच पदार्थाचे 'विशिष्ट गुरुत्व' म्हणतात.

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...