Tuesday 26 October 2021

अंधार कोठडीची घटना

◆ कलकत्ता (विद्यमान कोलकाता) येथील फोर्ट विल्यम किल्ल्यातील कैद्यांना ठेवण्याची एक खोली.

◆ १७५६ मधील एका घटनेमुळे ती अंधारकोठडी म्हणून इतिहासात महत्त्व पावली.

◆ सिराजउद्दोला बंगालचा नबाब असताना बंगालचा इंग्रज गव्हर्नर ड्रेक याने नबाबाच्या शत्रूंना आश्रय दिला.

◆ इंग्रजांनी नबाबाची परवानगी न घेता कलकत्त्यात तटबंदी बांधण्याचे काम सुरू केले.

◆ नबाबाने हरकत घेऊनही ड्रेकने बांधकाम थांबविले नाही. त्या वेळी नबाबाने फोर्ट विल्यमवर हल्ला करून इंग्रजांकडून किल्ला घेतला.

◆ गव्हर्नर ड्रेक बायकामुलांसह पळाला. सिराजउद्दोला याने सेनाधिकारी हालविले व आणखी १४५ इंग्रजांना किल्ल्याच्या पूर्व दरवाज्याच्या दक्षिणेस तीस मी. अंतरावर असलेल्या ५·५ × ४·२५ × ३ घ.मी. च्या खोलीत डांबले.

◆ खोली कोंदट होती व तीत हवा येण्यास दोनच लहान झरोके होते. अशा ह्या कोठडीत १४५ माणसे दहा तास होती. त्यांपैकी १२३ गुदमरून मृत्यूमुखी पडली.

◆ काही इतिहासकार अंधारकोठडीची कथा कपोलकल्पित समजतात, तर काहींच्या मते ती मुळात सत्यच आहे; फक्त अतिरंजित करून वर्णिली गेली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...