Tuesday 26 October 2021

समास

🌷बर्या्चदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो.

🌷जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच ‘समास’ असे म्हणतात. अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात.

🌷 उदा. वडापाव – वडाघालून तयार केलेला पाव. पोळपाट – पोळी करण्यासाठी लागणारे पाट कांदेपोहे – कांदे घालून केलेले पोहे.

🌷 पंचवटी – पाच वडांचा समूह समासाचे मुख्य 4 पडतात.
1. अव्ययीभाव समास
2. रुष समास
3. समास
4. बहु समास

🌷1) अव्ययीभाव समास : ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास ‘अव्ययीभाव समास’ असे म्हणतात.

अव्ययीभाव समासात आपल्याला खालील भाषेतील उदाहरणे पहावयास मिळतात.
अ) मराठी भाषेतीलगाव– गावात गल्लोगल्ली – प्रत्येक गल्लीत दारोदारी – प्रत्येक दारी घरोघरी – प्रत्येक घरी मराठी भाषेतील व्दिरुक्ती (पहिल्या शब्दांचीच पुनरावृत्ती) होऊन तयार झालेले शब्द हे क्रियाविशेषणा प्रमाणे वापरले जातात म्हणून ही उदाहरणे अव्ययीभाव समासाची आहेत.
ब) संस्कृत भाषेतील शब्द उदा. प्रती (प्रत्येक)– प्रतिमास, प्रतिक्षण, प्रतिदिन आ (पर्यत) – आमरण आ (पासून) – आजन्म, आजीवन यथा (प्रमाण) – यथाविधी, यथामती, यथाशक्ती.

वरील उदाहरणात प्रति, आ, यथा हे संस्कृत भाषेतील उपस्वर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...