Wednesday 7 October 2020

अलिप्ततावादी चळवळी’ची (नाम) आभासी शिखर परिषद 2020

 

📚‘अलिप्ततावादी चळवळी’ची (NAM : Non-Alignment Movement) ‘आभासी शिखर परिषद’  ४ मे २०२० रोजी पार पडली.


📚कोव्हिड-१९’च्या पार्श्वभूमीवर ‘अलिप्ततावादी चळवळी’ची (नाम) आभासी शिखर परिषद पार पडली.‘पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी प्रथमच ‘नाम’च्या परिषदेत भाग घेतला.


📚 ‘कोव्हिड-१९’ महामारीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली. 


📚 संकल्पना: ‘कोव्हिड-१९ विरोधात एकजूट’


📚 ‘अलिप्ततावादी चळवळी’चे सध्याचे अध्यक्ष व अझरबैझानचे राष्ट्राध्यक्ष इलहाम अलीयेव  यांनी या परिषदेचे आयोजन केले. 


📚 परिषदेची उद्दिष्टे : 


•‘कोव्हिड-१९’ विरोधातल्या लढ्यात आंतरराष्ट्रीय ऐक्याला प्रोत्साहन देणे


•या महामारीचा सामना करण्यासाठीच्या राष्ट्रांच्या आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रयत्नांना गती देणे. 


•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका, कॅरेबिया आणि युरोपातील ‘नाम’चे सदस्य राष्ट्रांचे प्रमुख आणि इतर नेते या परिषदेत सहभागी झाले. 


•नाम’च्या नेत्यांनी ‘कोव्हिड-१९’ महामारीच्या परिणामाचे मूल्यांकन करून त्यावरच्या उपायांसाठीच्या आवश्यकता आणि गरजा निश्चित केल्या आणि यावर पाठपुरावा करणार्‍या कृतीशील उपाययोजनांचे आवाहन केले. 


•‘कोव्हिड-१९’ विरोधातल्या लढ्यात आंतरराष्ट्रीय ऐक्याचे महत्त्व अधोरेखित करणार्‍या जाहीरनाम्याचा या नेत्यांनी यावेळी स्वीकार केला. 


•यावेळी सदस्य राष्ट्रांनी एका कृती दलाची स्थापना करत असल्याची घोषणा केली.


‘•कोव्हिड-१९’ विरोधातल्या लढ्यात मूलभूत वैद्यकीय, सामाजिक आणि मानवी गरजांची प्रतिबिंबित होणारी आकडेवारी आणि माहिती देणारी सामायिक प्रणाली निर्माण करून त्याद्वारे सदस्य राष्ट्रांच्या आवश्यकता आणि गरजा, हे कृती दल निश्चित करणार. 


📚 अलिप्ततावादी चळवळ (Non-alignment Movement : NAM) :


• स्थापना : १९६१ मध्ये ‘बेलग्रेड’ (तत्कालीन युगोस्लोव्हिया) परिषदेत या चळवळीची स्थापना भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्दुल नासेर व युगोस्लाव्हियाचे माजी राष्ट्राध्यक्ष जोसेफ टिटो यांनी केली.


• या चळवळीमध्ये १२० सदस्य राष्ट्र असून, १७ राष्ट्रे व १० आंतरराष्ट्रीय संस्थांना निरीक्षक दर्जा आहे. 


•१९५५ मध्ये झालेल्या ‘आफ्रो-आशियाई’ राष्ट्रांच्या परिषदेत स्वीकारलेल्या ‘बांडुंग तत्त्वावर’ या चळवळीची स्थापना.


‘नाम’च्या अलीकडे  झालेल्या परिषदा :


■ १६ वी- तेहरान -(Tehran)- इराण (Iran) २०१२


 ■१७ वी- पोर्लमार (Porlamar)- व्हेनेझुएला (Venezuela) २०१६ 


■१८ वी -बाकु (Baku) -अझरबैझान (Azerbaijan)- २०19

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...