राज्यसेवा प्रश्नसंच


 1) प्रधानमंत्री किसान सन्मानिधी योजना बाबत विधानांचा विचार करून अयोग्य विधान निवडा? 


अ) या योजनेची सुरवात 24 फेब्रु 2019 ला करण्यात आली

ब) पश्चिम बंगाल या राज्याने या योजने ची अंमलबजावणी केली नाही 

क) हि 100 टक्के केंद्रपुरुस्कृत योजना आहे 

ड) या योजनेअंतर्गत तीन हफ्त्यांमध्ये वर्षाकधी 9000 रु रक्कम शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात येते ✅


 👉🏻👉🏻या योजनेअंतर्गत तीन हफ्त्यांमध्ये वर्षाकधी 6000 रु रक्कम शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात येते 


 2) प्रधानमंत्री मातृवंदना योजने अंतर्गत विधानांचा विचार करून अयोग्य विधान निवडा 


अ) या योजने ची सुरवात 2017 रोजी करण्यात अली

ब) महिला व बालविकास मंत्रालयाकडून हि योजना राबवली जाते

क) या योजनेने इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेची जागा घेतलेली आहे 

ड) या योजने अंतर्गत संबंधित महिलेला एकूण 5000 रु अर्थसहाय्य देण्यात येते ✅


 👉🏻👉🏻या योजने अंतर्गत संबंधित महिलेला एकूण 6000 रु अर्थसहाय्य देण्यात येते 


 3) शिवभोजन थाळी योजनेबाबत विधानांचा विचार करून योग्य नसलेली विधान निवडा 


अ) या योजनेची सुरवात 26 जाने 2020 ला करण्यात आली

ब) या योजनेअंतर्गत राज्याच्या गरीब व गरजू जनतेला 15 रु भोजन मिळणार आहे✅

क) या योजनेअंतर्गत सुरु करण्यात आलेलीभोजनालय दुपारी 12 ते 2 या वेळेत सुरु राहणार आहेत

ड) वरील पैकी सर्व 


 👉🏻👉🏻या योजनेअंतर्गत राज्याच्या गरीब व गरजू जनतेला 10 रु भोजन मिळणार आहे 


 4 ) अटलभुजल योजनेबाबत विधानांचा विचार करून अयोग्य नसलेले विधान ओळखा 


अ) या योजनेची सुरवात 31 दिसे 2019 रोजी करण्यात आली 

ब) या योजने चा एकूण खर्च 10 हजार कोटी रु आहे

क) या योजनेच्या एकूण खर्च पैकी 50 टक्के रक्कम जागतिक बँकेकडून कर्ज स्वरूपात मिळेल✅

ड) या योजनेचा कालावधी 10 वर्ष असणार आहे 


 👉🏻👉🏻या योजनेचा कालावधी 5 वर्ष असणार आहे 

 👉🏻👉🏻या योजनेची सुरवात 25 दिसे 2019 रोजी करण्यात आली 

 👉🏻👉🏻 या योजने चा एकूण खर्च 6 हजार कोटी रु आहे 


 5) खालील विधाने अभ्यासा । 


अ) 5 जानेवारी 2020 रोजी  "उजाला" या योजनेला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत


ब) 19 फेब्रु 2020 रोजी " मृदा आरोग्य कार्ड" योजनेला 5 वर्ष पूर्ण झाले आहेत


1. विधान अ बरोबर असून ब चुकीचे आहे

2. विधान ब बरोबर असून अ चुकीचे आहे

3. दोन्ही विधाने बरोबर✅

4. दोन्ही विधाने चूक 


 6) खालील विधाने अभ्यासा . 


अ) दरवर्षी 21 फेब्रु मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो 

ब) आंतराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्याची कल्पना भारत देशाची होती 


1. विधान ब बरोबर असून अ चुकीचे आहे

2. विधान अ वरोबर असून ब चुकीचे आहे✅

3. दोन्ही विधाने बरोबर 

4. दोन्ही विधाने चूक 


 👉🏻👉🏻आतराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्याची कल्पना  बांगलादेश देशाची होती

 

 २१ फेब्रुवारी मातृभाषा दिन 

 २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन 


 ७) योग्य पर्याय ओळखा 


अ) सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना २०१९ चां डोकिन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले


ब) हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिलेच भारतीय आहेत


क) हा पुरस्कार दर दोन वर्षाने दिला जातो


ड) जुलै २०१९ पासून हा पुरस्कार centre for inquiry कडे देण्यात आला.


१) अ, ब व क

२) अ व क

३) ब व ड✅

४) अ ब क ड


 जावेद अख्तर यांना २०२०  वर्षाचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार दर वर्षी दिला जातो २०१९ पर्यंत हा पुरस्कार atheist alience of America det hoti 


 ८) खालीलपैकी अचूक पर्याय निवडा 


अ) भारतात १९७८ नंतर पहिल्यांदाच महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे

ब) २०२२ साली या स्पर्धेचे यजमान पद भारताला दिले आहे


१) अ बरोबर

२) ब बरोबर✅

३) दोन्ही बरोबर

४) दोन्ही चूक


 👉🏻👉🏻 भारतात १९७८ नंतर नव्हे तर १९७९ नंतर पहिल्यांदाच आयोजन करण्यात येत आहे 


 ९) क्रीडा विषयक क्रियांना अधिक चालना देण्याच्या उद्देशाने गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने क्रीडा क्षेत्राला आयुद्योगिक हा दर्जा देण्याची घोषणा केली 


१) मेघालय

२) मिझोरम✅

३) मणिपूर

४) नागालँड


 १०)  पद्म पुरस्कार विषयी योग्य नसलेले विधान ओळखा 


अ) यंदा १४२ पद्म पुरस्कार दिल्या गेलेत


ब) यात ७ पद्मविभूषण, १८ पद्मश्री, १६ पद्मभूषण पुसरकराचा समावेश आहे


क) विजेत्यांमधे ३४ महिला, १८ विदेशी/N R I, १२ मरणोत्तर विजेते आहेत


ड) महाराष्ट्रातली १४ जणांना पद्म पुरस्कार प्राप्त झाले आहेत


१) अ ब व ड

२) सर्व बरोबर

३) ब व c

४) अ व ड✅


 👉🏻👉🏻यदा १४१ पद्म पुरस्कार दिले गेले व महाराष्ट्रातली १२ जणांना पद्म पुरस्कार मिळाले. 


 ११) इराण ने आपले चलन रियाल बदलवून तोमान हे चलन अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे तर एका तोमन ची किंमत किती रियाल असणार आहे ? 


अ) १ हजार

ब) ५ हजार

क) १० हजार✅

ड) २० हजार


१२) इरफान खान उर्फ साहेब जादे इरफान खान यांच्या विषयी अयोग्य विधान निवडा 

अ) त्यांचा जन्म ७ जानेवारी १९६७ ला जयपूर येथे झाला होता
ब) त्यांचा पहिला चित्रपट सलाम बॉम्बे १९७७ ला आला 
क) त्यांना २०११ ला पद्मश्री पुरस्कार मिळाला
ड) त्यांना लाईफ इन मेट्रो या चित्रपटासाठी सर्वत्कृष्ट अभिनेता हा फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त आहे.

१) अ, ब, ड
२) ब आणि ड✅
३) सर्व बरोबर
४) क आणि ड

 👉🏻👉🏻तयांचा पहिला चित्रपट सलाम बॉम्बे १९८८ ला..
फिल्मफेअर - सर्वोत्तम खलनायक हासिल साठी २००३
सहायक अभिनेता लाइफ इन मेट्रो साठी २००७
सार्व. अभिनेता पान सिंग तोमार साठी २०१२ 

 १३) जियो टॅग प्राप्त सामुदायिक स्वयंपाक गृहे असणारे देशातील पहिले राज्य कोणते ? 

१) उत्तरप्रदेश✅
२) महाराष्ट्र
३) मध्यप्रदेश
४) आंध्रप्रदेश


१. पचलेल्या अन्नाचे रक्तात अवशोषन होऊन त्याचा ऊपयोग उर्जा निर्मीतीसाठी केला जातो.
 या क्रियेला काय म्हणतात?

1)पचन
2)अवशोषण  (absorption)
 *3)सात्मिकरन (Assimilation)✅* 
4)उत्सर्जन (Excretion)

5 steps of Digestion

Ingestion ➡️Digestion➡️Absorption➡️Assimilation➡️Egestion


२. आधुनिक आवर्तसारणीचे मांडणी कोणी केली?

1)डोबेरायनर
2)न्यूलँडस
3)मेंडेलिव
4)हेन्री मोस्ले✅


३. पुढीलपैकी कोणते व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मध्ये नाही?

1)थायमिन 
2)रायबोफ्लेविन
3)फॉलिक ऍसिड 
4)एस्कॉर्बिक ऍसिड✅
5)वरीलपैकी सर्व येतात.

व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये खालील 8 जीवनसत्त्वे असतात.

व्हिटॅमिन बी 1 थायामिन
बी 2 रिबोफ्लेविन
बी 3 नियासिन 
बी 5 पँटोथेनिक ऍसिड
बी 6 पायरिडॉक्साइन 
बी 7 बायोटिन 
बी 9 फॉलिक ऍसिड 
बी 12 सायनोकोबालामिन

एस्कॉर्बिक ऍसिड =व्हिटामीन C 


४. मुलद्रव्याच्या अणूमध्ये बाहेरच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात तेव्हा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत नाही?

1)12
2)6
3)7
4)8✅५.खालील विधानांचा विचार करा.व योग्य विधाने निवडा

1)अणुमधील प्रोटोन्स व न्युट्रोन्स ची संख्या म्हणजे अणु अंक होय.
2)कोणत्याही मुलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म अणुअंकानुसार नियंत्रीत होतात.
3)अणुअन्काला मुलद्रव्याचे रासायनिक ओळख म्हणतात. 

A)1 व 2
B)2 व 3✅
C) फक्त 1
D)1,2 व 3

अणुमधील प्रोटोन्स व न्युट्रोन्स ची संख्या म्हणजे अणु वस्तुमान अंक(Mass Number)होय.

अणुमधील प्रोटोन्स ची संख्या म्हणजे अणुअंक होय.


६. 1803 मध्ये कोणत्या शास्त्रज्ञाने अणुसिध्दंत मांडला ?

1)चांडविक
2)रुदरफोर्ड
3)डाल्टन✅
4)थॉमसन


७. 1911 मध्ये कोणत्या शास्त्रज्ञाने सोन्याच्या पत्र्याचा वापर केला आणी अणुमध्ये एक अतिशय लहान भरीव असे अणुकेंद्रक असते हे सिध्द केले?

1)चांडविक
2)रुदरफोर्ड✅
3)डाल्टन
4)थॉमसन


८. न्युट्रोन चा शोध कोणी लावला?

1)चांडविक✅
2)रुदरफोर्ड
3)कणाद
4)थॉमसन

इलेक्ट्रॉन=थॉमसन
प्रॉटोन=गोल्डस्टीन


९. खालील विधाने पाहा..

*1)पाणी हे मिश्रण आहे.*
*2)हायड्रोजन व ओक्सिजन चे 1:2 प्रमाणात संयोग होऊन पाणी बनते*

A)दोन्ही विधाने चूक✅
B)दोन्ही विधाने अचुक
C)फक्त विधान 1 चूक
D )फक्त विधान 2 चूक

*पाणी हे संयुग आहे.
*हायड्रोजन व ओक्सिजन चे 2:1 प्रमाणात संयोग होऊन पाणी बनते*


१० *खालीलपैकी संप्लवनशील पदार्थ कोणते?
1)नवसागर  व कापूर 
2)कोळसा व शिसे
3)हिरा व चुना


A)1 व 2
B)2 व 3
C) फक्त 1✅
D)1,2 व 3


११. *अर्सेनीक ,सिलिकॉन व सेलेनियम ही कोणती उदाहरणे आहेत?*

1)धातू
2)अधातू
3)धातूसदृश्य ✅
4)वरीलपैकी सर्व


१२. *पाणी किती फरनहेट( °f) ला गोठते?*

1)31°f 
2)0°f
3)32°f✅
4]37°f१३. *खालीलपैकी सत्य विधान ओळखा.*

1)इलेक्ट्रॉन धन प्रभारित असतात.
2)न्युट्रोन ऋन प्रभारित असतात.
3)प्रोटोन्स प्रभार रहित असतात.

A)1 व 2
B)1,2 व 3
C) फक्त 1
D)यापैकी एकही नाही✅

1)इलेक्ट्रॉन ~धन~ ऋण प्रभारित असतात.
2)न्युट्रोन ~ऋन~ प्रभार रहित असतात.
3)प्रोटोन्स ~प्रभार रहित~ धन प्रभारित असतात.

No comments:

Post a Comment

Latest post

ZP पद भरती Strategy

📌📌 Strategy📌📌                मागचे तीन दिवस आयबीपीएस(IBPS) ने पशुसंवर्धन विभागासाठी परीक्षा घेतल्या. या परीक्षांमधील मराठी आणि इंग्लिश...