१३ फेब्रुवारी २०२२

तीन वर्षांत २५ हजार आत्महत्या; २०१८ ते २० या कालावधीत कर्जबाजारीपणा, बेरोजगारीचा परिणाम

🔰एकीकडे भविष्यातील विकासाचे चित्र सरकारकडून रंगवून सांगितले जात असताना करोनापूर्व आणि उत्तर काळात आर्थिक अडचणींनी सामान्य नागरिकांचे जिणे किती अवघड झाले होते, याचे चित्रच समोर आलेल्या आत्महत्यांच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले.

🔰देशात २०१८ ते २० या तीन वर्षांत बेरोजगारीमुळे ९ हजार १४० तर, कर्जबाजारीपणामुळे १६ हजार ९१ अशा २५ हजार लोकांनी आत्महत्या केल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) दिलेल्या आकडेवारीच्या आधारे केंद्राने आत्महत्यांसंदर्भातील माहिती वरिष्ठ सभागृहात मांडली.

🔰केंद्र सरकार राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम राबवत असून त्याद्वारे देशातील ६९२  जिल्ह्यांमध्ये जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाला साह्य करत आहे. मानसिक आरोग्य सुधारणा कार्यक्रम व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून आत्महत्या रोखण्याचा केंद्र प्रयत्न करत असल्याचे राय यांनी  सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...