Sunday 13 February 2022

बुलडाणा जिल्हाच्या राजु केंद्रे यांचा फोर्ब्स मासिकाच्या ‘प्रभावी तरुण व्यक्तिमत्त्वांच्या’ यादीत समावेश

🏵बुलडाणा जिल्हाच्या पिंप्री खंदारे या गावातले शिक्षण क्षेत्रातले कार्यकर्ते राजु केंद्रे यांचा फोर्ब्स या मासिकानं, सामाजिक कार्य उद्यमशीलता या वर्गवारीत, भारतातल्या तीस वर्षांखालच्या ‘प्रभावी तरुण व्यक्तिमत्त्वांच्या’ यादीत समावेश केला आहे.

📝 २८ वर्ष वयाचे राजू केंद्रे हे एकलव्य फाउंडेशन या उच्च शिक्षणाशी संबंधित संस्थेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. या संस्थेच्या माध्यमातून गरजू आणि वंचित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेतांना येणाऱ्या अडचणी दूर करायचा प्रयत्न केला जातो. राजु केंद्रे यांनी टाटा इन्सिट्यूटमधून ग्रामीण विकास या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ग्रामपरिवर्तन चळवळीच्या माध्यमातून आपल्याच मूळगावी राहून सामाजिक काम सुरु केलं.

✅महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास फेलोशिप कार्यक्रमाअंतर्गतही केंद्र यांनी पारधी समाजाच्या विकासासाठीचे उपक्रम राबवले आहेत. सध्या ते लंडन इथं उच्चशिक्षण घेत आहेत. याअंतर्गत ते 'भारतातलं उच्च शिक्षण आणि असमानता' या विषयावर संशोधन करत आहेत. यासाठी त्यांना ब्रिटिन सरकारच्या वतीनं चेवनिंग स्कॉलरशिप दिली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

सहकार

   11th सहकार  :- Click Here 12th सहकार  :- Click Here