Monday 1 January 2024

राज्यसेवा पूर्वसाठी असलेल्या कम्बाईन पूर्वपेक्षा वेगळ्या घटकांचा अभ्यास कसा करावा?

१. प्राचीन आणि मध्ययुगीन भारत.

हा घटक संपूर्णपणे राज्यसेवा पूर्व साठी आयोग विचारतो. यावर येणाऱ्या प्रश्नांची संख्या निश्चित नसते. सर्वसामान्यपणे दोन ते सात प्रश्न या घटकावर विचारले जातात. संपूर्ण प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास करणे शक्य नसल्यास त्यातील काही महत्त्वाचे घटक करून जाणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ... हडप्पा संस्कृती, वैदिक संस्कृती, महाजनपदे, मौर्य कालखंड, गुप्त कालखंड भारतातील विविध घराणे इत्यादी.  या घटकांचा अभ्यास करण्यासाठी तामिळनाडू state board book किंवा लुसेंट सामान्य ज्ञान चे पुस्तक वापरावे. महाराष्ट्रातील अकरावीचे स्टेट बोर्ड देखील चांगला सोर्स आहे.

२. पर्यावरण-

या घटकावर आयोग राज्यसेवा पूर्व साठी आतापर्यंत पाच प्रश्न विचारत होता. पर्यावरणाचे प्रश्न हे बहुतांशी भूगोलाच्या दृष्टीने विचारले जातात. त्यामुळे त्यातील साधारणता निम्मे प्रश्न हे भूगोलाच्या अभ्यासक्रमामध्ये कव्हर होतात. पर्यावरणामध्ये -
1) मूलभूत संकल्पना (जसे की परिसंस्था, पर्यावरणीय परिस्थितीकी, नॅशनल पार्क इ.),
2) जैवविविधता (Biodiversity Hotspot, IUCN Redlist इ.),
3) हवामान बदल (UNFCC, UNCBD, UNCCD, Kyoto Protocol यांचेसारख्या आधुनिक जागतिक करार)
या घटकांवर आयोगाचे विशेष लक्ष आहे.
यांची तयारी करण्यासाठी बाजारातील कोणतेही एक संदर्भ पुस्तक वापरावे.

3) भूगोल-

यामध्ये पहिला मुख्य मुद्दा म्हणजे राज्यसेवा पूर्वसाठी आयोग प्रामुख्याने प्राकृतिक भूगोलावरती भर देते. यामध्ये भूरूपशास्त्र (geomorphology), जलावरण (oceanography) आणि वातावरण (climatology) या तीन उपघटकांवर आयोग सर्वसामान्यपणे सहा ते नऊ प्रश्न विचारते. खरंतर राज्यसेवा पूर्व जवळपास 70 टक्के भूगोल या तीन घटकांवर आधारित आहे. त्यामुळे या तीन घटकांमधूनच सुरुवात करावी. त्यांची तयारी करण्यासाठी इयत्ता अकरावी ची फिजिकल भूगोलाची Fundamentals of Physical Geography ही एनसीईआरटी वापरावी.
यातील दुसरा मुद्दा म्हणजे भारताच्या भूगोलाचा अभ्यास. यावर आयोग दोन ते तीन प्रश्न विचारतो. त्यांचा अभ्यास करण्यासाठी अकरावीची ncert - India Physical Environment हा पुरेसा संदर्भ आहे.
भूगोलाच्या बाबतीत शेवटचा मुद्दा सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीवर आयोग साधारणतः दोन ते तीन प्रश्न विचारतो. त्यासाठी सौदी सरांचे महाराष्ट्र भूगोल अथवा अन्य कोणतेही बाजारातील एखादे पुस्तक आपण संदर्भासाठी घेऊ शकतो.

4) Economy

संयुक्त पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा यांमध्ये इकॉनोमी मध्ये बराच फरक जाणवतो. राज्यसेवा पूर्व मध्ये आयोग संकल्पनात्मक प्रश्न विचारतो तर संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये आयोग factual data विचारतो.
राज्यसेवा पूर्व परीक्षा मध्ये समावेशन, लोकसंख्या, शाश्वत विकास, पंचवार्षिक योजना या घटकांवय प्रामुख्याने प्रश्न विचारला जातो. या घटकांवर तयारी कशी करावी याबाबत आपण चॅनलवरती जुन्या पोस्ट केलेले आहेत. त्या एकदा वाचून घ्या.

5) Polity-

यासाठी लक्ष्मीकांत सरांचे पुस्तक अत्यंत उत्तम संदर्भ पुस्तक आहे. या विषयाचे प्रश्न राज्यसेवा पूर्वचा अभ्यास करत असताना थोडेसे राष्ट्रीय पातळीकडे झुकलेले दिसतात. तसेच चालू घडामोडींच्या अनुषंगाने देखील राज्यसेवा पूर्वला. पॉलिटीचे प्रश्न विचारतात. याव्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व चे प्रश्न हे Multiple Choice Questions असतात.

बाकी General Science आणि Current Affairs साठी तुम्ही कंबाईन पूर्व साठी जसा अभ्यास केला होता तसाच करा. फक्त General Science साठी प्रश्नांची संख्या जास्त, वैज्ञानिक गणितांचा समावेश एवढाच काय तो फरक.

विज्ञानाच्या अभ्यासासाठी लुसेंट हा सर्वोत्तम source वाटतो.
तर चालू घडामोडी साठी बाजारातील कोणतेही एका प्रकाशनाचे पुस्तक वापरावे.

राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा. 💐💐

No comments:

Post a Comment

Latest post

हिमालयातील 8000 मी.उंचीपेक्षा जास्त उंची असणारी शिखरे..

-----------------======---------------------- शिखर               उंची(मी)             स्थान ---------------------------------------------...