Monday 1 January 2024

क्रियाविशेषण :-



✔️करियाचा विशेष दाखविणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण होय. 

वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांचे लिंग वचन, पुरुष बदलले असले तरी काही शब्द हे जसेच्या तसेच राहतात. अर्थात त्याचा व्यव होत नाही. अशा शब्दांना अव्यये असे म्हणता येईल. असेच शब्द विशिष्ट क्रियेच्या संदर्भात असून आणि ते कोणत्याही कर्ता, कर्मानुसार बदलत नसेल तर त्याला क्रियाविशेषण अव्यव असे म्हणता येईल. 


🔹 करियाविशेषण अव्यय याचे प्रमुख प्रकार ते पुढील प्रमाणे :-


▪️अ. अर्थावरून 

▪️आ. स्वरूपावरून


   🔹कालवाचक क्रियाविशेषण

 

▪️अव्ययांचे तीन प्रकार

▪️अ) अर्थावरून पडणारे प्रकार 


🔹कालवाचक क्रियाविशेषण अव्ययांचे तीन प्रकार पुढील प्रमाणे :


🔹१) कालदर्शक :-

वाक्यातील क्रिया केव्हा घडली आहे हे दर्शविणाऱ्या शब्दांना 'कालदर्शक' क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.


▪️उदा.

आधी, आता, सध्या, तूर्त, हल्ली, काल, उद्या, परवा, लगेच, केव्हा, जेव्हा, पूर्वी, मागे, रात्री, दिवसा इ.


१. मी काल शाळेत गेलो होतो.

२. मी उदया मुंबईला जाईन.


🔹२) सातत्यदर्शक :-

वाक्यातील क्रियेचे सातत्य दर्शविणार्‍या शब्दांना 'सातत्यदर्शक' क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.


▪️उदा.

सदा, नित्य, पुन्हा, वारंवार, दरवर्षी, दररोज, क्षणोक्षणी, दिवसेंदिवस, महिनोनमहिने इ. 


१. पाऊस सतत कोसळत होता.

२. सुरजचे आजकाल अभ्यासात लक्ष नाही.


🔹३) आवृत्तीदर्शक :-

वाक्यात घटनेची पुनरावृत्ती दर्शविणार्‍या शब्दांना 'आवृत्तीदर्शक' क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.


▪️उदा.

फिरून, वारंवार दररोज, पुन्हा पुन्हा, सालोसाल, क्षणोक्षणी, एकदा, दोनदा इ.


१. आई दररोज मंदिरात जाते.

२. जानवी वारंवार आजारी पडते.


🔹 सथलवाचक क्रियाविशेषण अव्यय :-

वाक्यातील क्रियेचे स्थळ/ठिकाण दर्शविणार्याआ शब्दांना 'स्थलवाचक' क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.


▪️याचे दोन  प्रकार पडतात.


🔹अ) स्थितीदर्शक :-

▪️उदा.

येथे, तेथे, जेथे, वर, खाली, कोठे, मध्ये, अलीकडे, मागे, पुढे, जिकडे-तिकडे, समोवताल इत्यादि.


१. मी येथे उभा होतो.

२. जिकडे-तिकडे भ्रष्टाचार सुरू आहे.


🔹२. गतिदर्शक :-

▪️उदा.

इकडून, तिकडून, मागून, पुढून, वरून, खालुन, लांबून, दुरून.


१. जंगलातून जातांना पुढून वाघ आला.

२. चेंडू दूर गेला.

३. घरी जातांना इकडून ये.


🔹  रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय :-

वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा तिची रीत दाखविण्यासाठी जे शब्द वापरतात त्यांना 'रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय' असे म्हणतात.


🔹याचे तीन प्रकार पडतात.


🔹अ) प्रकारदर्शक

▪️उदा. असे, तसे जसे, कसे, उगीच, व्यर्थ, फुकट, आपोआप, मुद्दाम, जेवी, तेवी, हळू, सावकाश, जलद इत्यादी.


१) वैभव सावकाश चालतो.

२) ती जलद धावली.

३) सूरज हळू बोलतो.


🔹आ) अनुकरणदर्शक 

▪️उदा. झटकण, पटकण, पटापट, टपटप, चमचम, बदाबद, इत्यादी.


१) त्याने झटकण काम आटोपले.

२) प्रियंका पटापट फुले वेचते.

३) त्याने जेवण पटकण आटोपले.


🔹इ) निश्चयदर्शक 

▪️उदा. खचित, खरोखर, नक्की, खुशाल, निखालस इत्यादी.


१) रमेश नक्की प्रथम क्रमांक पटकावणार.

२) तू खुशाल घरी जा.

३) तुम्ही खरोखर जाणार आहात?



🔹 सख्यावाचक/परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय :-

वाक्यातील शब्द जेव्हा क्रियेची संख्या किंवा परिमाण दाखवितो तेव्हा त्याला 'संख्यावाचक/ परिमाणवाचक' क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

▪️उदा.

कमी, जास्त, किंचित, जरा, काहीसा, थोडा, क्वचित, अत्यंत, अगदी, बिलकुल, मुळीच, भरपूर, अतिशय, मोजके, पूर्ण इत्यादी.


तुम्ही जरा शांत बसा.

सुरेश अतिशय प्रामाणिक आहे.

ती मुळीच हुशार नाही.



🔹 परश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय :-

वाक्यातील का/ना ही शब्द जेव्हा क्रियापदाला प्रश्नार्थक बनतात तेव्हा त्यांना 'प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय' असे म्हणतात.


▪️उदा.

१) तू सिनेमाला जातो का?

२) तुम्ही सिनेमाला याल ना?

३) तुम्ही अभ्यास कराल ना?



🔹निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय :-

वाक्यातील न/ना ही शब्द जेव्हा क्रियेचा निषेध किंवा नकार दर्शवतात तेव्हा त्याला 'निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय' असे म्हणतात.


▪️उदा.

१. मी न विसरता जाईन.

२. तो न चुकता आला.

३. तिने खरे सांगितले तर ना !



🔸सवरूपावरून पडणारे प्रकार


🔹सिद्ध क्रियाविशेषण अव्यय :-

काही शब्द मुळातच क्रियाविशेषण असतात त्यांना 'सिद्ध क्रियाविशेषण अव्यय' असे म्हणतात.


▪️उदा.

मागे, पुढे, येथे, तेथे, आज इत्यादी.


१) तो मागे गेला.

२) ती तेथे जाणार.



🔹 साधीत क्रियाविशेषण अव्यय :-

नाम, विशेषण, क्रियापद, शब्दयोगी अव्यय यांच्यापासून झालेल्या क्रियाविशेषणांना 'साधित क्रियाविशेषण' असे म्हणतात.


☑️याचे दोन प्रकार आहेत ते पुढीलप्रमाणे 




🔹अ) साधीत क्रियाविशेषण अव्यय :-


▪️नामसाधीत :- रात्री, दिवसा, सकाळी, व्यक्तिश:, वस्तूत:

▪️सर्वनामसाधीत :- त्यामुळे, यावरून, कित्येकदा,

▪️विशेषणसाधीत :- मोठयाने, एकदा, इतक्यात, एकत्र.

▪️धातुसाधीत :- हसू, हसत, हसतांना, पळतांना, खेळतांना

▪️अव्ययसाधीत :- कोठून, इकडून, खालून, वरून.

▪️परत्यय सधीत :- शास्त्रदृष्ट्या, मन:पूर्वक, कालानुसार.


▪️उदा.

१) तो रात्री आला.

२) मी त्यांना व्यक्तिश: भेटलो.

३) तिने सर्व रडून सांगितले.



🔹आ) सामासिक क्रियाविशेषण अव्यय :-

काही जोडशब्द किंवा सामाजिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाचे काम करतात अशा दोन शब्दांना सामासिक क्रियाविशेषण अव्यय म्हणून ओळखले जाते.


▪️उदा.

गावोगाव, गैरहजर, गैरकायदा, दररोज, प्रतिदिन, रात्रंदिवस, समोरासमोर, घरोघर, यथाशक्ती, आजन्म, हरघडी इत्यादी.


१) आज सचिन वर्गात गैर हजर आहे.

२) पाऊस दररोज पडतो.

३) विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...