Monday 1 January 2024

भूकंप लहरी :



» ज्या वेळी भूकंप होतो, त्या वेळी भूकवचात मोठय़ा प्रमाणात हालचाली होतात व मोठय़ा प्रमाणात कंप निर्माण होतात. यांनाच ‘भूकंप लहरी’ असे म्हणतात.


■ नाभी (Focus) : 

» भूकंप झाल्यावर भूकवचातील ज्या स्थानापासून उगम पावून सर्वदूर पसरतात, त्या स्थानास भूकंप केंद्र किंवा नाभी म्हणतात.


■ अधीकेंद्र (Epicentre) : 

» नाभीच्या अगदी वर क्षितिजाजवळच्या लंब रेषेवर पृथ्वीच्या पृष्ठभागावर जो िबदू मिळतो, त्याला ‘अधीकेंद्र’ असे म्हणतात. भूकंपकेंद्रापासून निघणाऱ्या भूकंप लहरींचा सर्वात अधिक प्रभाव अधीकेंद्राच्या निकट दिसून येतो. अधिकेंद्रापासून जसजसे अंतर वाढत जाते, तसेतसे भूकंपाची तीव्रता कमी कमी होत जाते.


■ भूकंप अधिलेख (Seismogram) :-  

» भूकंप लहरींचा अभ्यास भूकंप अभिलेखांवरून करता येतो. भूकंप लहरींचे तीन प्रकार पडतात-  प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, भूपृष्ठ लहरी.


भूकंप लहरींचे प्रकार :- 

■ प्राथमिक लहरी (P waves) : 

» प्राथमिक लहरींचा वेग इतर सर्व लहरींपेक्षा जास्त असतो. 

» प्राथमिक लहरी या स्थायुरूप व द्रव्यरूप पदार्थावरून प्रवेश करू शकतात. 

» प्राथमिक लहरी या ध्वनी लहरींप्रमाणे असतात. 

» यात कणांचे कंपन लहरींच्या संचरण दिशेने घडून येते.


■ दुय्यम लहरी (S waves) : 

» दुय्यम लहरी या प्रकाश लहरींप्रमाणे असून यात कणांचे कंपन संचरण दिशेशी समलंब दिशेने घडून येते. 

» दुय्यम लहरी या घनपदार्थापासून जाऊ शकतात; परंतु द्रवरूप पदार्थातून त्या जाऊ शकत नाहीत. 

» सर्व साधारणपणे त्यांचा वेग प्राथमिक लहरींच्या वेगापेक्षा निम्मा असतो.


■ भूपृष्ठ लहरी (L waves) : 

» भूपृष्ठ लहरी या भूपृष्ठांवरूनच सागरी लहरींप्रमाणे प्रवाहित होतात. 

» सर्व भूकंप लहरींमध्ये भूपृष्ठ लहरी या अधिक विनाशक असतात. 

» भूपृष्ठांवरून अधिक खोलवर या लहरी प्रवास करू शकत नाही. 

» भूपृष्ठ लहरी पृथ्वीपासून आरपार न जाता पृथ्वीगोलाला फेरी मारतात. 

» भूकंप अभिलेखावर या लहरींची नोंद सर्वात शेवटी होते.

_____________________

■ रिश्टर स्केल (Richter Scale) : 

» अमेरिकन भूकंप शास्त्रज्ञ चार्ल्स रिश्टर यांनी १९३५ साली भूकंपाच्या लहरींची तीव्रता मोजण्यासांठी रिश्टर प्रमाण शोधून काढले. याच्या साह्य़ाने भूकंपाच्या तीव्रतेची सातत्याने नोंद केली जाते. याच्या कक्षा एक ते नऊ या दरम्यान असतात.


■ भूकंपाचे जागतिक वितरण 

■पॅसिफिक महासागराचा पट्टा : 

» जगातील ६५% भूकंप प्रदेश पॅसिफिक महासागराच्या सभोवतालच्या पट्टय़ात आढळतो. 

» याला प्रशांत महासागरातील पट्टा किंवा अग्निकंकण (Rings of Fire) असे म्हणतात. 

» यात इंडोनेशिया, फिलिपाइन्स, जपानची बेटे, कामचटका द्वीपकल्प व पूर्व सबेरियातील काही भाग येतो. 

» भूकंपाचा हा पट्टा उत्तर अमेरिकेत आल्प्सपासून रॉकीज पर्वत दक्षिण अमेरिकेत अँडीज पर्वताला अनुसरून पुढे अंटाक्र्टिका खंडापर्यंत गेलेला आहे. 

» या भागातच असलेल्या जपानच्या हांशू बेटांवर जगातील सर्वात जास्त विद्धंसक भूकंप होतात.


■ मध्य अटलांटिक पट्टा  : 

» या पट्टय़ात अटलांटिक महासागरातील मध्य अटलांटिक रिझ आणि रिझजवळील काही बेटांचा समावेश होतो. 

» येथे सर्वसाधारणपणे मध्यम तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झालेली आहे.


■ भूमध्य सागरीय पट्टा : 

» या पट्टय़ाचा विस्तार अटलांटिक महासागरातील जलमग्न पर्वतरांगेपासून होऊन भूमध्य समुद्राभोवती पसरलेला आहे.


No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्त्वाची पदे

📕 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रचूड 📙 भारताचे लोकपाल - ए. एम. खानविलकर 📗भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी 📒 भारताचे महालेखाप...