गुलाबबाई संगमनेरकर, मधुवंती दांडेकर यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी


📚लोककला क्षेत्रात प्रदीर्घ कामगिरीसाठी राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा मानाचा '**तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार' ज्येष्ठ कलावंत गुलाब संगमनेरकर** यांना.

📚तसेच संगीत रंगभूमीवरील प्रदीर्घ कारकिर्दीसाठी देण्यात येणारा 'संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार' ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांना  जाहीर झाला.

📚 मानपत्र, मानचिन्ह व पाच लाख रुपयेअसे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप आहे.

📚नारायणगावकर पुरस्कार २०१८-१९ या वर्षासाठीचा तर किर्लोस्कर पुरस्कार २०१९-२० या वर्षासाठीचा आहे. सरकार स्थापनेची प्रक्रिया आणि नंतर करोना संकट या कारणांमुळे पुरस्कार घोषणेची प्रक्रिया लांबली.

📚संगमनेरकर यांनी वयाच्या नवव्या वर्षांपासून तमाशा क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. त्यांनी तुकाराम खेडकर, कांताबाई सातारकर, आनंदराव जळगावकर यांच्यासोबत कामे केली. काही हिंदी चित्रपटातही त्या झळकल्या. 'रज्जो' चित्रपटात त्यांची भूमिका आहे.

📚लता मंगशेकर यांच्या 'लताबाईंच्या आजोळची गाणी' या अल्बममध्ये त्यांनी काही गाण्यांवर अदाकारी सादर केली आहे. 'गाढवाचे लग्न' या वगनाट्यात त्यांनी काम केले आहे. ८८ वर्षांच्या संगमनेरकर वयोमानामुळे आता निवडक ठिकाणी गाण्याचे सादरीकरण करतात.

📚बालगंधर्वांना आदर्श मानणाऱ्या दांडेकर यांनी संगीत रंगभूमीची दीर्घ काळ सेवा केली आहे. नाटककार विद्याधर गोखले यांच्या रंगशारदा संस्थेच्या ‘मंदारमाला’, ‘सुवर्णतुला’, ‘मदनाची मंजिरी’ आणि ‘ध्रुवतारा’ या अभिजात संगीत नाटकांमध्ये काम करून त्यांची कारकीर्द घडली. '

📚एकच प्याला', 'कृष्णार्जुनयुद्ध', 'झाला महार पंढरीनाथ', 'देव दीनाघरी धावला', 'मानापमान', 'मृच्छकटिक', 'संशयकल्लोळ', 'सौभद्र' व 'स्वयंवर' अशा गाजलेल्या संगीत नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. सत्तरी पार केलेल्या दांडेकर आजही संगीत रंगभूमीवर उत्साहाने कार्यरत आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी

प्रश्न 1:- ₹6 लाख कोटी मार्केट कॅप ओलांडणारी 8वी कंपनी कोणती आहे? उत्तर :- भारती एअरटेल. प्रश्न 2:- सियाचीनमध्ये तैनात करण्यात आलेल्या भा...