Tuesday 7 May 2024

चालू घडामोडी :- 07 मे 2024

◆ दरवर्षी 7 मे रोजी जागतिक ॲथलेटिक्स दिन जगभरात साजरा केला जातो.

◆ भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स नासाच्या स्टारलाइनर मोहिमेअंतर्गत तिसऱ्यांदा अंतराळात जाणार आहेत.

◆ नेपाळच्या नवीन 100 रुपयांच्या नोटेचा नकाशा भारतातील तीन प्रदेश दर्शवितो.

◆ इम्फाळ, मणिपूर येथे ‘स्कूल ऑन व्हील्स योजना’ सुरू करण्यात आली आहे.

◆ भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने दुबई येथे आयोजित 'अरेबियन ट्रॅव्हल मार्ट 2024' मध्ये भाग घेतला आहे.

◆ ‘कर्मयोगी भारत’च्या संचालक मंडळाची 12 वी बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे.

◆ सुनीता विल्यम्स ने 2006 आणि 2012 वर्षी अंतराळात प्रवेश केला होता.

◆ IIT इंदौर च्या सुवर्णा चॅटर्जी यांच्या नेतृत्वाखाली चमूने रेडिओ उत्सर्जनाचा शोध लावला आहे.

◆ माद्रिद खुली टेनिस स्पर्धेचे पुरूष एकेरीचे विजेतेपद पटकावणारा आंद्रेई रुबलेव्ह रशिया देशाचा टेनिस खेळाडू आहे.

◆ भारतीय खगोल शास्त्रज्ञांनी GMRT या दुर्बिणीच्या मदतीने रेडिओ उत्सर्जनाचा शोध लावला आहे.

◆ 2024 या वर्षाच्या जागतिक अस्थमा दिनाची(7मे) थीम "अस्थमा शिक्षा सशक्तिकरण" ही आहे.

◆ चीन ने इंडोनेशिया या देशाच्या संघाचा पराभव करून थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

◆ चीन ने अकराव्यांदा थॉमस कप पुरुष बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

◆ उबेर कप 2024 महिला बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद चीन ने सोळाव्यांदा पटकावले आहे.

◆ 26 वी भारत अशियान वरिष्ठ अधिकारी यांची बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.

◆ नॅशनल अँटी टॉपिंग एजन्सी NADA ने बजरंग पुनिया या कुस्तीपटू ला निलंबित केले आहे.

◆ जोस राउल मुलिनो यांची पनामा या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

24 मे 2024 चालू घडामोडी

प्रश्न – नुकताच आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर - 22 मे प्रश्न – उत्तर भारतातील वायू प्रदूषण आणि आरोग्यावर होण...