स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
08 May 2024
अंतनिर्मित (intrusive/plutonic) अग्निजन्य खडकांचे प्रकार
१) डाईक (dyke)
-भूगर्भातील तप्त लाव्हारस भूकवचामध्ये असलेल्या उभ्या भेगांमध्ये साचतो व तो थंड होऊन लांबवत खडकांची निर्मिती होते त्यास डाईक असे म्हणतात
-उदाहरणार्थ इंग्लंडच्या उत्तर भागात क्लिवलँड डाईक ज्याची उंची सुमारे दीडशे मीटर आहे
२) सिल (sill )व शीट
-जलजन्य किंवा रूपांतरित खडकांच्या आडव्या भेगेत लावारस येऊन साचतो व कालांतराने थंड होऊन खडकाची निर्मिती होते ते त्यास सील असे म्हणतात
-याच पातळ किंवा कमी जाडीच्या खडकास शीट असे म्हणतात
३) लॅकोलिथ(lacolith)
-भूगर्भातील तप्त लावारस भूपृष्ठाकडे येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काही ठिकाणी खडक घुमटासारखे वर उचलले जातात आणि निर्माण होणाऱ्या पोकळीमध्ये हे लाव्हारसाचे निक्षेपण होते हे आणि त्यापासून घुमटाकार खडक तयार होतात त्यास लकोलिथ असे म्हणतात
-याची निर्मिती ती जलजन्य खडकांमध्ये होते
-संयुक्त संस्थानातील उटाह राज्यातील लासाल पर्वत आणि हेनरी पर्वत ही प्रमुख उदाहरणे आहेत
४) लोपोलीथ
-जेव्हा लाव्हारस खोलगट किंवा उथळ भागात साचतो आणि कालांतराने थंड होऊन बशीच्या(saucer shaped) आकारासारखा आकार निर्माण होतो त्यास लोपोलिथ असे म्हणतात
५) फेकोलिथ(phacolith)
-भूगर्भातील खडकांना जेव्हा घडीचा आकार प्राप्त होतो तेव्हा अशा खडकांमध्ये अपनती आणि अभिनती असतात . तेथे लाव्हारसाचे निक्षेपण होऊन वलयाकार भूआकार निर्माण होतो त्यास फेकोलीथ असे म्हणतात
६) बेथोलिथ (batholith)
-पृथ्वीच्या भूगर्भामध्ये तप्त लावारस वर येण्याचा प्रयत्न करतो , तेव्हा भूकवचामधील विस्तीर्ण व खोलगट पोकळीमध्ये लाव्हारसाचे निक्षेपण होते, येथे तयार होणाऱ्या विस्तीर्ण खडकाला batholith असे म्हणतात
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
महत्त्वाचे ऑपरेशन 2025
1. 'ऑपरेशन नादेर' :- भारतीय लष्कर जम्मू काश्मीर लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी - 2. ऑपरेशन टू प्रॉमिस ३:- इराण इस्राईल देश...
-
वाक्प्रचार मराठी व्याकरण |vakyaprachar वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करणे. (१) हात दाखवून अवलक्षण करणे. अर्थ - आपणहून संक...
-
1) अलीपूर कट:- 1908 🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) नाशिक कट:- 1910 🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबारा...
-
◾️ स्पष्ट दिसणारे केंद्रक व पेशीअंगके नसतात त्यांना आदिकेंद्रकी पेशी असते म्हणतात ◾️ आदिकेंद्रकी पेशी आकाराने खूप लहान असतात ◾️या पेशीतील क...
No comments:
Post a Comment