कन-बेटवा नदी जोड प्रकल्पासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचा उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांसोबत करार.


🪵🍃 कन-बेटवा नदी जोड प्रकल्पासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालय, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांच्या सरकारांसोबत सामंजस्य करार झाला.


🌼कन-बेटवा नदी जोड प्रकल्प...


🪵🍃 जलसंपदा मंत्रालयाकडून तयार केलेल्या राष्ट्रीय दृष्टीकोन योजना (National Perspective Plan -NPP) अंतर्गत, राष्ट्रीय जल विकास प्राधिकरण (NWDA) कडून हिमालयीन नद्याअंतर्गत 14 आणि द्वीपकल्पाच्या नद्याअंतर्गत 16  नदी जोड प्रकल्पांना ओळखले गेले आहे. त्यापैकी, केन-बेटवा नदी जोड प्रकल्प हे प्रथम ठरले आहे. 


🪵🍃 उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या प्रदेशाअंतर्गत येणार्‍या केन-बेटवा नदी जोड प्रकल्पाला भारत सरकारने राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित केले आहे. तसेच या प्रकल्पाअंतर्गत मध्यप्रदेशामधील पन्ना व्याघ्र संवर्धन प्रकल्पाला आणल्या गेले आहे. या प्रकल्पामध्ये पन्ना व्याघ्र संरक्षण क्षेत्राचा सुमारे 8,650 हेक्टर चा भूभाग समाविष्ट आहे.


🪵🍃 बटवा ही यमुना नदीची उपनदी आहे जी, उत्तर भारताच्या प्रदेशात मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश मधून वाहते. तर केन नदी ही सुद्धा यमुना नदीची उपनदी आहे, जी मध्य भारताच्या बुंदेलखंड प्रदेशातली मोठी नदी आहे आणि मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश मधून वाहते.


🌼परकल्पाचे स्वरूप...


🪵🍃 परकल्पामध्ये 230 किलोमीटर लांबीचा कालवा आणि धरणांची मालिका आणि केन आणि बेटवा नद्यांना जोडणारेमाकोडिया आणि धौधन धरणे तयार केले जाणार आहे.यामधून मध्यप्रदेशातील3.5 लक्ष हेक्टर आणि बुलंदखंड सह उत्तर प्रदेशामधील14,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. 


🪵🍃 पर्यावरणाच्या संदर्भात, हा प्रकल्प व्याघ्रअभयारण्यात असणारा पहिला नदीचा प्रकल्प बनणार. हे मध्यप्रदेशातील पन्ना व्याघ्रअभयारण्यजे मॉडेल व्याघ्र-संवर्धन राखीव म्हणून प्रसिद्ध आहे, त्याचा सुमारे 10टक्के भाग सामावून घेईल.

No comments:

Post a Comment

Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...