Tuesday 23 March 2021

67 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर


 


• कोरोना व्हायरसने जगात घातलेल्या थैमानामुळे राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा यंदा उशिरा करण्यात आली. 

• या वर्षी कंगना रणौतने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर मनोज वाजपेयी आणि धनुषने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवला. 

• छिछोरे हा चित्रपट  सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला तर बार्डो हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. 

• बार्डो या चित्रपटातील गाण्यासाठी सावनी रविंद्रला सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला.


प्रमुख पुरस्कार्थी

• सर्वोत्कृष्ट चित्रपट : मरक्कर (मल्याळी)

• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : कंगना राणावत (मनकर्णिका आणि पंगा) 

• सर्वोत्कृष्ट अभिनेता : मनोज वाजपेयी (भोसले), धनुष (असुरन)

• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : पल्लवी जोशी (ताश्कंद फाइल्स)

• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: विजय सेतूपती (सुपर डिलक्स) 

• सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट : आनंदी गोपाळ (मराठी)

• सर्वोत्कृष्ट शोध चित्रपट : जक्कल (मराठी) 


इतर प्रमुख पुरस्कार

• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संजय पुरनसिंह चौहान (भट्टर हुरे)

• सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : सावनी रवींद्र (बार्डो)

• सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: बी. प्राक (केसरी)

• सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक : डी. इम्मन (विश्वासम)

• सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन : आनंदी गोपाळ, सुनील नागवेकर आणि नीलेश वाघ

• सर्वोत्कृष्ट बालचित्रपट : कस्तूरी

• सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय एकात्मकता चित्रपट : ताजमहाल (मराठी) 

• सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : छिछोरे

• सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : बार्डो

• सर्वोत्कृष्ट कोकणी चित्रपट : काजरो

• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (चित्रपटेतर विभाग): राजप्रितम मोरे (खिसा), मराठी


कंगना राणौत 

• कंगना राणौतला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळण्याची ही चौथी वेळ आहे. 

• सर्वात आधी 2008 साली चित्रपट 'फॅशन'साठी कंगनाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. 

• त्यानंतर 2014 साली 'क्वीन' चित्रपटासाठी तर  2015 साली 'तनू वेड्स मनु रिटर्न्स'साठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. 

• यंदा तिला 'मणिकर्णिका'चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे, या चित्रपटाचे दिग्दर्शनही तिने स्वतःच केले आहे

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...