Ads

24 March 2021

फ्रान्स, बेल्जियम, ऑस्ट्रियापाठोपाठ आता स्वित्झर्लंडमध्येही ‘बुरखा बंदी’; जनमत चाचणीनंतर घेतला निर्णय


🍂सवित्झर्लंडमध्ये एका जनमत चाचणीनंतर सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वाजनिक ठिकाणी वावरताना मुस्लीम महिलांना हिजाब आणि बुरखा घालून आपला चेहरा लपवता येणार नाहीय. स्वित्झर्लंडच्या आदी फ्रान्स, बेल्जियम आणि ऑस्ट्रियामध्येही अशाप्रकारची बंदी घालण्यात आली आहे. स्वित्झर्लंडमध्ये राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या जनमत चाचणीमध्ये ५१ टक्के नागरिकांनी बुरखा आणि हिजाब सार्वजनिक ठिकाणी घालू नये या बाजूने मत दिलं आहे. म्हणजेच बुरखाबंदीला समर्थन देणाऱ्यांचे प्रमाण हे पाठिंबा देणाऱ्यांपेक्षा अधिक असल्याने बंदीचा निर्णय घेण्यात आला.


🍂जनमत चाचणीनंतर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे आता स्वित्झर्लंडमध्ये रेस्तराँ, खेळाची मैदाने आणि सर्वजनिक ठिकाणी मुस्लीम महिलांना हिजाब आणि बुरख्यामध्ये स्वत:चा चेहरा झाकून फिरता येणार नाही. मात्र स्वित्झर्लंडच्या संसदेने आणि देशातील सरकारने तयार केलेल्या सात सदस्यांचा सहभाग असणाऱ्या कार्यकारी परिषदेने या जनमत चाचणीमधील मतदानाला विरोध करत बंदीचा निर्णय अयोग्य असल्याचं मत व्यक्त केलं आहे.


🍂सवित्झर्लंडमधील नवीन प्रस्तावामध्ये धार्मिक स्थळांवर जाताना महिलांना सर्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्याची मूभा देण्यात आलीय. तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच मास्क घालणे हे फायद्याचे ठरु शकते. त्यामुळे मास्कही या नियमांमधून वगळण्यात आलं आहे. मात्र पर्यटक म्हणून आलेल्या माहिलांपासून स्थानिक मुस्लीम महिलांनाही इतर कोणत्याही कारणासाठी सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकून फिरण्याची परवानगी यापुढे नसेल.

No comments:

Post a Comment