Thursday 17 March 2022

तुषार सिंचन पद्धत

ही ॲल्युमिनीयम किंवी पीव्हीसी पाईपला जोडलेल्या बारीक भोक असलेल्या तोटीद्वारे (स्प्रिंकलर नोझल) पाण्याच्या दाबाचा वापर करून पाणी पावसाप्रमाणे पिकावर सर्व ठिकाणी सारखे फवारले जाण्याची पद्धत होय. यात जास्तीत जास्त नोझल ठराविक वेगाने कायम वर्तुळाकाररीत्या फिरवण्याची सोय असते.

✳️ तुषार सिंचनाचे फायदे ✳️

१) तुषार पद्धतीत पाण्याचा नाश होत नाही.

२) प्रवाही सिंचनापेक्षा सिंचन क्षमता जास्त मिळते.

३) तुषार सिंचन पद्धत जवळजवळ सर्व पिकांच्या सिंचनासाठी वापरता येते.

४) पाण्याची २५ ते ३५% बचत होते

५) पाणी सर्व ठिकाणी ठिकाणी समप्रमाणात पाहिजे तेवढे देता येते.

६) पाण्याचा प्रवाह कमी असतानासुद्धा पाहिजे तेवढे पाणी देता येते.

७) पावसासारखे पाणी पिकांवर पडते त्यामुळे काही किडी-रोग धुऊन जातात.

८) पाने आणि ताटे स्वच्छ राहतात.

९) द्रवरूप रासायनिक खाते तुषार-सिंचनाद्वारे देता येतात. खाते पिकाच्या मुळाशी पडतात. त्यामुळे खताचा कार्यक्षम वापर होऊन बचत होते.

१०) ठिबक सिंचन पद्धतीपेक्षा दरएकरी खर्च कमी येतो..

११) जमीन सपाट करण्याची अगर रानबांधणीची गरज नसते.

१२) मजुरीवरचा खर्च कमी येतो.

१३) पीक उत्पादनात १२ ते २०%वाढ होते.

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प

🔶मचकुंदी प्रकल्प  मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मि...