Thursday 17 March 2022

महाराष्ट्रातील १५ कर्तृत्ववान महिला


१. दुर्गाबाई कामत:-  भारतीय चित्रपट क्षेत्रातील पहिल्या अभिनेत्री. दुर्गाबाई कामत यांनी दादासाहेब फाळके यांच्या ‘मोहिनी भस्मासूर’ (१९१३) या चित्रपटात पार्वतीचे काम केले होते. त्यांची कन्या कमलाबाई कामत (विवाहोत्तर- कमलाबाई गोखले) यांनी या चित्रपटात नायिकेची भूमिका केली होती.

२. डॉ. अबन मिस्त्री:- देशातील पहिल्या महिला तबला वादक.

३. सुरेखा यादव:- पहिल्या महिला
रेल्वे चालक.

४. भाग्यश्री ठिपसे:- पाच वेळा भारतीय महिला बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेत्या.

५. हर्षिणी कण्हेकर:- पहिल्या महिला अग्निशामक अधिकारी.

६. शिला डावरे:- पहिल्या महिला ऑटोरिक्षा चालक.

७. आमदार डॉ. भारती लव्हेकर:- देशात पहिली सॅनिटरी नॅपकिन बँक सुरू केली.

८. अरुणाराजे पाटील:- भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या तंत्रज्ञ

९. डायना एडलजी:- महिला क्रिकेट एकदिवसीय संघाच्या पहिल्या कप्तान.

१०. स्नेहा कामत:- देशातील पहिली वाहन चालन प्रशिक्षण संस्था स्थापन केली.

११. रजनी पंडित:- देशातील पहिल्या नोंदणीकृत महिला खासगी गुप्तहेर.

१२. स्वाती पिरामल:- असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा.

१३. डॉ. इंदिरा हिंदुजा:- देशातील पहिल्या टेस्टटय़ूब बेबीची प्रसूती करणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञ.

१४. उपासना मकाती:- अंधांसाठी देशातील पहिले जीवनशैलीविषयक मासिक ब्रेल लिपीत प्रकाशित केले.

१५. तारा आनंद:- डिजिटल आर्टद्वारे भारतातील महिला योध्यांचा परिचय करून दिला.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...