मूलभूत कर्तव्ये

मूलभूत कर्तव्ये


                    व्यक्तीला जेव्हा हक्क प्राप्त होतात तेव्हा त्या हक्का सोबत काही जबाबदाऱ्या ही पार पाडाव्या लागतात. भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क दिले तसे काही मुलभुत कर्तव्ये/ FUNDAMENTAL DUTIES ही सांगितलेली आहेत.

भारताच्या राज्यघटनेत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला नव्हता.मात्र १९७६ मध्ये ४२ व्या घटनादुरुस्तीने घटनेत १० मूलभूत कर्तव्य यांचा समावेश करण्यात आला. २००२ मध्ये ८६ व्या घटनादुरुस्तीने अकरावे मूलभूत कर्तव्य देण्यात आले.

भारताच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य यांची यादी सोवियत रशियाच्या राज्यघटनेवरून स्वीकारण्यात आली आहे.

अशाप्रकारची मूलभूत कर्तव्य Fundamental duties केवळ जपानच्या राज्यघटनेमध्ये दिसून येतात.


स्वर्ण सिंह समिती १९७६
आणीबाणीच्या काळातील निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भारत सरकारने १९७६ मध्ये सरदार स्वर्ण सिंह समितीची स्थापना केली. या समितीने मुलभूत कर्तव्यांचे एक स्वतंत्र प्रकरण घटनेत समाविष्ट करण्याची शिफारस केली. १९७६ मध्ये ही शिफारस मान्य करून ४२ व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये घटनेतील भाग चार A मध्ये कलम ५१ समाविष्ट करण्यात आले. यामध्ये दहा मूलभूत कर्तव्ये Fundamental Duties देण्यात आली आहेत.

महत्वाचे मुद्दे

मूलभूत कर्तव्ये कोणती आहेत? 11 fundamental duties

महत्व – Importance of fundamental duties

a. संविधानाचे पालन करणे आणि संविधानात्मक आदर्श व संस्था राष्ट्रध्वज राष्ट्रगीत यांचा आदर राखणे.
b. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात स्फूर्ती देणाऱ्या आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे.
c. भारताचे सार्वभौमत्व एकता एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे.
d. देशाचे संरक्षण करणे व आवाहन केल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे.
e. धार्मिक भाषिक प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे.
f.आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारसांचे जतन करणे.
g.वने सरोवरे नद्या वन्यजीव सृष्टी अशा नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे.
h.विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन मानवतावाद आणि शोधक बुद्धी त्यांचा विकास करणे.
i.सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा त्याग करणे.
j.राष्ट्राला प्रगतीपथावर नेणे यासाठी व्यक्तिगत व सामुदायिक कार्यामध्ये उत्तमता संपादन करणे.
k.जन्मदाता किंवा पालक आपल्या पाल्यास वयाच्या सहाव्या वर्षापासून 14 वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. (हे कर्तव्य 86 व्या घटनादुरुस्तीने 2002 मध्ये समाविष्ट करण्यात आले.)
मूलभूत कर्तव्ये – वैशिष्ट्ये

मूलभूत कर्तव्य यांच्या यादी मधील काही कर्तव्य ही नैतिकतेवर आधारित आहेत तर काही नागरिक कर्तव्य आहेत.

मूलभूत कर्तव्ये भारतीय जीवनपद्धतीचासमृद्ध वारसा जतन करण्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहेत.

मूलभूत हक्क भारतीय नागरिकांना प्राप्त होतात तसे ते अपवाद वगळता परकीयांना ही प्राप्त होतात. मूलभूत कर्तव्ये फक्त भारतीय नागरिकांना लागू होतात.

मूलभूत कर्तव्ये न्यायप्रविष्ठ नाहीत.

मूलभूत कर्तव्ये –

नागरिकांचे वर्तन कायद्याद्वारे नियंत्रित करता येते त्यामुळे मूलभूत कर्तव्य यांचा समावेश म्हणजे कायद्याविषयी दुराग्रह अशी एकटी का मूलभूत कर्तव्य यांच्याबाबतीत केली जाते.
मूलभूत कर्तव्यांची यादी पुरेशी नाही. यामध्ये कर भरणे कुटुंबनियोजन मतदान करणे यासारख्या कर्तव्यांचा समावेश नाही.

मूलभूत कर्तव्य मध्ये काही संकल्पना अस्पष्ट आहेत. स्वतंत्र लढ्यातील आदर्श, संस्कृती, उपक्रम ई.
मूलभूत कर्तव्य न्यायप्रविष्ट नसणे म्हणजे दंड सत्तेचा आधार नाही त्यामुळे ही कर्तव्य नैतिक तत्त्वे ठरतात.
मूलभूत कर्तव्य भाग-3 मध्ये असणे जास्त योग्य ठरले असते. भाग चार मध्ये चुकीच्या ठिकाणी यांचा समावेश करण्यात आला आहे.

महत्व – Importance of fundamental duties
नागरिकांना जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी मार्गदर्शक तत्वे महत्त्वाची आहेत.

मूलभूत हक्कांची बजावणी करत असताना समाजविघातक व हिंसक कृती करण्यापासून नागरिकांना अटकाव करतात.


नागरिकांमध्ये शिस्त व जबाबदारीच्या वर्तणूक इस प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी मूलभूत कर्तव्य महत्त्वाचे आहेत.

एखाद्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी न्यायालयास मूलभूत कर्तव्य यांचा आधार घेता येऊ शकतो.

मूलभूत कर्तव्य fundamental duties नुसार नागरिकाचे वर्तन नसल्यास संसद त्यावर एखादा कायदा करून शिक्षेची तरतूद करू शकते.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...