Sunday 15 May 2022

रॉबर्ट गिल


🟢  रॉबर्ट गिल  🟢

🔺स्मृतिदिन

◾️जन्म:- 26 सप्टेंबर 1804 बिशपगेट, लंडन

◾️मृत्यू: 10 एप्रिल 1879, भुसावळ

◾️ गिल 19 व्या वर्षी पी.ग्रेलीमरच्या शिफारशीने जेम्स पॅटीसच्या आदेशानुसार मद्रास येथील इस्ट इंडिया कंपनीच्या ‘‘44 मद्रास नेटिव्ह या सैन्य दलात’’ भरती झाल्यानंतर भारतात आला

◾️ते लंडन रॉयल एशियाटिक सोसायटीचा क्वालिफाइड आर्टिस्ट होते

◾️1844 रोजी अजिंठ्यातील चित्र-शिल्पांच्या आरेखनासाठी (ड्राफ्समन) अजिंठा येथे नियुक्ती दिली

◾️1846 ला रॉबर्ट गिलने अजिंठ्याच्या आठ चित्रकृतींचा पहिला टप्पा पूर्ण केला

◾️ लंडनच्या इंडियन कोर्ट ऑफ द क्रिस्टल पॅलेस, सिडनेहॅम येथे 1851 ला त्याच्या अजिंठ्यावरील चित्रांचे प्रदर्शन भरले

◾️या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतातील हा ठेवा सर्वप्रथम जगासमोर आला

◾️फोटोग्राफीतून अजिंठा, वेरूळ, लोणार सरोवर, मुक्तगिरी, हेमाडपंती मंदिरे, किल्ले, मुस्लिम वास्तुकलांची प्रकाशचित्रे काढून भारतातील विशाल सांस्कृतिक वारसा जगासमोर आणला

◾️भुसावळच्या दवाखान्यात 10 एप्रिल 1879 रोजी निधनानंतर भुसावळ रेल्वे स्टेशनजवळ दफनभूमीत दफन करण्यात आले

माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे
History4all By Sachin Gulig

🟢  रॉबर्ट गिल  🟢 स्मृतिदिन

🔺प्रेमकथा

◾️1845 रोजी अजिंठा नियुक्ती दरम्यान स्थानिक भारतीय जमातीच्या पारो या तरुणीशी ओळख झाली या ओळखीचे रूपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले.

◾️परंतु रॉबर्ट- पारो यांचा विवाह झाल्याचे इतिहासात कोठेही नमूद नाही.

◾️1954-55 साली भारतात प्लेगची साथ आली आणि त्यात 23 मे 1856 ला पारो हिचा मृत्यू झाला. या घटनेने रॉबर्ट अत्यंत दु:खी झाला. देश, धर्म, भाषा, सामाजिक बंधने या सर्वांच्या पलीकडे जावून पारोने रॉबर्टला खूप सहकार्य केले होते

◾️पारोबद्दल असलेल्या अत्यंत प्रेमापोटी रॉबर्टने तिची कबर सिल्लोड तालुक्यात अजिंठा गावात बांधली.‘

🔺‘टू द मेमरी ऑफ माय बिलव्हड पारो हू डाईड 23 मे 1856’’ अशा ओळी तिच्या कबरीवर लिहिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ आईस्क्रीम मॅन ऑफ इंडिया' रघुनंदन कामथ यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन ◾️नॅचरल्स आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे ...