07 February 2020

संयुक्त अरब अमिरातीमध्ये नवीन नैसर्गिक वायूचा साठा सापडला

👉2 फेब्रुवारी, 2020 रोजी, संयुक्त अरब अमिरातीने सुमारे 80 ट्रिलियन घनफूट नवीन नैसर्गिक वायूचा साठा शोधला. 

👉अबूधाबी आणि दुबई दरम्यान हे साठे अस्तित्त्वात आहेत.

✅महत्वाचे

👉नोव्हेंबर 2019 मध्ये संयुक्त अरब अमिरातीने अब्ज बॅरल तेलाच्या शोधांची घोषणा केली, त्यानंतर युएई क्रूड साठा 10 अब्ज बॅरलपर्यंत पोहोचला, युएईमध्ये जगातील सहावा सर्वात मोठा तेल साठा आहे.

👉युएईनेही 58 ट्रिलियन घनफूट वायूची घोषणा केली. यानंतर, संयुक्त अरब अमिरातीचा एकूण नैसर्गिक वायू (पारंपारिक गॅस) साठा वाढून 273 ट्रिलियन घनफूट झाला आहे.

👉 युएईचा अपारंपरिक गॅस साठा 160 ट्रिलियन घनफूट आहे.

✅संयुक्त अरब अमिराती

👉दुबई, अबू धाबी, अजमान, शारजाह, रस अल खैमाह, फुजैराह आणि उम्-कुवैन असे सात राजकीय क्षेत्र (इमिरेट्स) एकत्र करून संयुक्त अरब अमिरातीची निर्मिती झाली. 

👉संयुक्त अरब अमिरातीच्या जीडीपीपैकी 30% थेट तेल आणि वायूवर आधारित आहे.

✅भारत-संयुक्त अरब अमिराती

👉सध्या भारत आणि युएई दरम्यान द्विपक्षीय व्यापार 59.9 अब्ज डॉलर्स आहे.

👉 संयुक्त अरब अमिरातीमध्ये तिसर्या क्रमांकाची गुंतवणूक करणारा भारत आहे.

👉 2 दशलक्षाहून अधिक भारतीय संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहतात आणि काम करतात.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना ग्राम न्यायालये स्थापन करण्यास सांगितले

👉3 फेब्रुवारी 2020 रोजी, सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांत राज्यांना 'ग्राम न्यायालये' स्थापन करण्यास सांगितले. 

👉सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील उच्च न्यायालयांशी सल्लामसलत करण्यास सांगितले आहे.

✅मुख्य मुद्दे

👉ग्राउंड कोर्ट अ‍ॅक्ट 2008 भूजल स्तरावर ग्रामीण न्यायालये स्थापन करण्यासाठी पारित करण्यात आला. या न्यायालयीन संस्थेचे उद्दीष्ट ग्रामीण भागात न्याय मिळविणे हे आहे.

👉राज्यांमधील ग्राम न्यायालयांची सद्यस्थिती सुप्रीम कोर्टाचे वकील प्रशांत भूषण यांनी स्पष्ट केली.

👉प्रशांत भूषण यांनी सादर केलेल्या अहवालानुसार गोवा यांनी व्हिलेज कोर्टाच्या स्थापनेसाठी दोन अधिसूचना जारी केल्या आहेत. परंतु आतापर्यंत राज्यात कोणतेही ग्रामीण न्यायालय कार्यरत नाही. 

👉हरियाणाने व्हिलेज कोर्टासाठी तीन अधिसूचना जारी केल्या असून हरियाणामध्ये केवळ दोनच ग्राम न्यायालये कार्यरत आहेत.

👉झारखंडमध्ये 6 ग्राम न्यायालयांना अधिसूचित करण्यात आले होते, परंतु राज्यात फक्त एकच ग्रामीण न्यायालय कार्यरत आहे. 

👉उत्तर प्रदेशने 113 ग्राम न्यायालयांसाठी अधिसूचना जारी केली होती, परंतु सध्या राज्यात केवळ  14 ग्राम न्यायालये कार्यरत आहेत. 

👉राज्यांत एकूण 822 ग्राम न्यायालये स्थापन होणार आहेत.

👉सध्या केवळ 208 ग्राम न्यायालये कार्यरत आहेत, तर 12 व्या पंचवार्षिक योजनेनुसार देशात 2500 ग्राम न्यायालये आवश्यक आहेत.

तानाजी मालुसरे यांच्याविषयी जाणून घ्या 'या' गोष्टी

छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात खास व्यक्ती तानाजी मालुसरे यांची आज (4 फेब्रुवारी) पुण्यतिथी.

कोंढाणा किल्ला जिंकण्याच्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ...

एकदा कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंना दिली, तेव्हा तानाजी स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत असताना तानाजी ही तयारी अर्धवट सोडून महाराजांसमक्ष प्रस्तुत झाले.

कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंना दिल्यानंतर तानाजींनी कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला.

ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले. आधी 'लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे'. हे त्यांचे शब्द इतिहासात प्रसिद्ध पावले.

तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोहचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी द्रोणगिरीचा कडा निवडला.

रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता त्यांनी किल्ला पार केला.

अचानक हल्ला करून त्यांनी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्‍न केले.

शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागून 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलार मामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला.

गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना 4 फेब्रुवारी, 1670 रोजी घडली.

तिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसर्‍या दिवशी छत्रपती शिवाजीराजे सिंहगडावर पोहचले तेव्हा त्यांना समजले.

त्यावेळी महाराज म्हणाले "गड आला पण सिह गेला". अत्यंत दुःखी झालेल्या राजांनी तानाजीचे शव त्यांच्या उमरठे या गावी पाठवले. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा 'वीरगळ' स्थापन करुन एक सुंदर स्मारक उभे केले गेले आहे.

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली ?
🎈९ डिसेंबर १९४६.

💐 जागतिक वन दिन केव्हा साजरा केला जातो ?
🎈२१ मार्च.

💐 'संविधानाचे शिल्पकार' कोणाला म्हटले जाते ?
🎈डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.

💐 LPG चे विस्तारित रूप काय आहे ?
🎈 Liquefied Petroleum Gas.

💐 संसदेच्या दोन अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त किती कालावधीचे अंतर असते ?
🎈६ महिने.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 'द फाॅल आॅफ स्पॅरो' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
🎈डाॅ. सलीम अली.

💐 'कोलार' सोन्याची खाण कोणत्या राज्यात आहे ?
🎈कर्नाटक.

💐 'बालकवी' हे कोणाचे टोपणनाव आहे ?
🎈ञ्यंबक बापूजी ठोंबरे.

💐 भारतातील सर्वांधिक जिल्हे असलेले राज्य कोणते ?
🎈उत्तरप्रदेश.

💐 'जागतिक तंबाखूविरोधी दिन ' केव्हा साजरा करतात ?
🎈३१ मे.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 इटलीचा आक्रमक हुकूमशहा कोण होता ?
🎈मुसोलिनी.

💐 रविंद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार कधी मिळाला ?
🎈१९१३ मध्ये.

💐 रिलायंस इंडस्ट्रीजचे संस्थापक कोण होते ?
🎈धीरूभाई अंबानी.

💐 'गीत गोविंद' ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?
🎈जयदेव.

💐 आॅस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंंधित आहे ?
🎈चित्रपट.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 सेल्युलर जेल कोठे आहे ?
🎈अंदमान.

💐 शाहू महाराजांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला ?
🎈कागल. ( कोल्हापूर )

💐 'जागतिक रेडक्राॅस दिवस' कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
🎈८ मे.

💐 इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेची स्थापना कधी झाली ?
🎈१ सप्टेंबर २०१८. ( नवी दिल्ली )

💐 मौर्य साम्राज्याच्या राजधानीचे शहर कोणते ?
🎈पाटलीपुत्र.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 भारताच्या राष्ट्ध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण किती ?
🎈२ : ३.

💐 'पितळ' हा धातू कशापासून तयार करतात ?
🎈तांबे + जस्त.

💐 भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे उभा राहिला ?
🎈प्रवरानगर.

💐 'क' जीवनसत्वा अभावी कोणता रोग होतो ?
🎈स्कर्व्ही.

💐 कोणत्या शहराचे नाव बदलवून प्रयागराज करण्यात आले ?
🎈अलाहाबाद.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक केव्हा झाला ?
🎈६ जून १६७४.

💐 रंजन गोगाई भारताचे कितवे सरन्यायाधिश होत ?
🎈४६ वे.

💐 भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय ?
🎈राॅ. ( RAW )

💐 ओरंग व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
🎈आसाम.

💐 महाराष्ट्रात माळढोक पक्षी अभयारण्य कोठे आहे ?
🎈सोलापूर.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

06 February 2020

महाराज सयाजीराव गायकवाड

आज (6 फेब्रुवारी) महाराज सयाजीराव गायकवाड यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्या विषयी सविस्तर माहिती...

नाशिक जिल्ह्यातील कवळाणे या गावी जन्मलेले गोपाळ काशिराम गायकवाड हे बडोद्याचे महाराजा खंडेराव गायकवाड यांच्या मृत्यूनंतर बडोद्याच्या राजघराण्यात दत्तक गेले आणि ते झाले महाराजा खंडेराव गायकवाड!

सयाजीराव महाराजांनी आपल्या संस्थानात अनेक सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. पं. मदनमोहन मालवीय तर त्यांना ‘हिंदुस्थानातील एकमेव आदर्श राजा’ म्हणत.

न्यायव्यवस्थेत सुधारणा, ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन, सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय, गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण व कला शिक्षणाची सोय, हरिजनांसाठी शाळा, अस्पृश्यता निवारण.. किती किती सांगावे?

अत्यंत पुरोगामी विचारांच्या या राजाने राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षपदही भूषविले. लो. टिळक, अरविंद घोष यांच्याशी संबंध असणाऱ्या या राजाने 1886 मध्ये मुंबईत ज्योतिराव फुले यांना ‘महात्मा पदवी दिली.

सयाजीरावांनी 1882 साली हरिजनांसाठी 18 शाळा काढल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली, आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली.

महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने अनेक साहित्यिक, प्रकाशक यांनी आपली कारकीर्द घडवली. केवळ साहित्यिकच नाहीत शैक्षणिक, शेती क्षेत्र, सामाजिक सुधारणा, न्याय अशा अनेक बाबतीत त्यांनी कार्य केले.

या लोकमंगल राजाचे 6 फेब्रुवारी 1939 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वडोदरा येथे निधन झाले.

रिझर्व्ह बँकेकडून नवे पतधोरण जाहीर


चालू आर्थिक वर्षाच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांसाठी आज (दि.6) रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले आहे.

या पतधोरणात कर्जदारांना फारसा दिलासा मिळालेला नाही. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीने अपेक्षेप्रमाणेच रेपो दर कायम ठेवला आहे.

पुढील दोन महिन्यांसाठी रेपो रेट 5.15 टक्के राहणार असून, सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कायम ठेवला आहे.

पतधोरण आढावा समितीची द्विमासिक पतधोरण बैठक दोन दिवसापासून सुरू होती. पुढील महिन्यांसाठी रिझर्व्ह बँक काय धोरण अवलंबणार याकडे लक्ष लागले होते.

अखेर आज रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले. या बैठकीत पतधोरण आढावा समितीच्या सर्व सहा सदस्यांनी रेपो रेट कायम ठेवण्याची भूमिका घेतली.

किरकोळ वाढती महागाई आणि अर्थव्यवस्थेची बिकट अवस्था या पार्श्वभूमीवर आरबीआयने रेपो रेट 5.15  टक्के कायम ठेवला आहे.

त्यामुळे कर्जदारांना आहे त्याच व्याजदराने कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. 2020-21 या वर्षात जीडीपी 6 टक्के राहणार असल्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे.

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच join करा

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था कायदा (दुरुस्ती) विधेयक, 2020 ला मंत्रिमंडळाची मंजुरी

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने पुढील गोष्टींना मान्यता दिली आहे:-
- भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था कायद (दुरुस्ती ) विधेयक, सादर करणे
- 20 आयआयआयटी (पीपीपी) मध्ये प्रत्येकी एक आणि आयआयआयटीडीएम कुरनूल (आयआयआयटी-सीएफटीआय) मध्ये एक अशा संचालकांच्या 21 पदांसाठी पूर्वप्रभावाने मंजुरी
- 20 आयआयटी (पीपीपी) मध्ये प्रत्येकी एक आणि आयआयआयटीडीएम कुरनूल (आयआयटी-सीएफटीआय) मध्ये एक, याप्रमाणे रजिस्ट्रारच्या 21 पदांसाठी पूर्वप्रभावाने मंजुरी

▪️प्रभाव:
- या विधेयकामुळे , उर्वरित 5 आयआयआय टी -पीपीपी बरोबरच  सार्वजनिक खासगी भागीदारीतील विद्यमान 15 भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थांना पदवी प्रदान करण्याच्या अधिकारांसह  ‘राष्‍ट्रीय महत्वाच्या संस्था’ म्हणून घोषित केले जाईल.

- यामुळे त्यांना विद्यापीठ किंवा राष्‍ट्रीय महत्वाच्या संस्थेप्रमाणे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक) किंवा मास्टर ऑफ टेकनॉलॉजी (एम.टेक) किंवा पीएच.डी पदवीच्या नामकरणाचा वापर करता येईल. तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देशात एक मजबूत संशोधन पाया विकसित करण्यासाठी आवश्‍यक पुरेशा विद्यार्थ्यांना आकर्षित करू शकतील.

▪️ विवरण:

- 2014 आणि 2017 च्या प्रमुख कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था कायदा (दुरुस्ती ) विधेयक, 2020 सादर करणे

- सुरत , भोपाळ , भागलपुर, अगरतला आणि रायचूर येथील सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत  5 भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थांना वैधानिक दर्जा प्रदान करणे आणि त्यांना  भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्‍था (सार्वजनिक खासगी भागीदारी ) कायदा 2017 अंतर्गत विद्यमान 15 भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थांबरोबरच राष्‍ट्रीय महत्वाच्या  संस्‍था म्हणून घोषित करणे
   
- या मंजुरीचा उद्देश सुरत, भोपाळ, भागलपूर, अगरतला आणि रायचूर येथील आयआयआयटीना अधिकृत करणे हा आहे. या आयआयआयटी यापूर्वीच सोसायटी नोंदणी कायदा 1860 अंतर्गत नोंदणीकृत संस्था म्हणून कार्यरत आहेत

- .सार्वजनिक-खासगी भागीदारी योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या इतर  15 आयआयआयटी प्रमाणेच आता आयआयआयटी (पीपीपी) कायदा 2017 अंतर्गतही त्यांचा समावेश केला जाईल. तसेच आयआयटीआयटी कायदा  2014  नुसार आयआयआयटीडीएम कुर्नूल  स्थापन करण्यात आले आहे आणि आयआयआयटी अलाहाबाद, आयआयआयटीएम ग्वाल्हेर, आयआयआयटीडीएम जबलपूर, आयआयआयटीडीएम कांचीपुरम या इतर 4 आयआयटी बरोबर कार्यरत आहेत.

- या आयआयआयटीमध्ये संचालक आणि रजिस्ट्रार हे पद आधीच अस्तित्त्वात आहे आणि सध्याचा प्रस्ताव त्यांना कोणत्याही अतिरिक्त आर्थिक भाराशिवाय केवळ औपचारिक करतो.

▪️ पार्श्वभूमी:

- माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उच्च शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे ही आयआयटीमागची कल्पना आहे.

- केंद्रीय मंत्रिमंडळाने 26 नोव्हेंबर  2010 रोजी दिलेल्या मंजुरीनुसार सार्वजनिक खासगी भागीदारी स्वरूपात  20 नवीन आयआयआयटी संस्‍था (आईआईआईटी पीपीपी) स्थापन करण्याच्या योजनेअंतर्गत आयआयआयटी  (पीपीपी) कायदा  2017 द्वारे 15 आयआयआयटी  संस्‍था समाविष्ट करण्यात आल्या आहेत. तर उर्वरित 5 संस्था समाविष्ट करायच्या आहेत.

राज्य वाङ्‌मय पुरस्कार

◾️उत्कृष्ट मराठी वाङ्‌मयनिर्मितीसाठी मराठी भाषा विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या

◾️२०१८ साठीच्या राज्य वाङ्‌मय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली.

◾️ज्येष्ठ साहित्यिक
✍नरेंद्र चपळगावकर, अजित दळवी, प्रभा गणोरकर, जयराज साळगावकर, मंगला गोडबोले, रवींद्र लाखे, प्राजक्त देशमुख

◾️यांच्यासह ३५  साहित्यिकांच्या वाङ्‌मय कलाकृतींचा सन्मान केला जाणार आहे.

◾️विशेष म्हणजे, यामध्ये ‘सकाळ प्रकाशन’च्या प्रा. डॉ. द. ता. भोसलेलिखित ‘संवाद बळिराजाशी’ या पुस्तकास वसंतराव नाईक पुरस्कार जाहीर झाला आहे.

🔰 इतर पुरस्कारविजेते -🔰

📌 रवींद्र दामोदर लाखे (अवस्थांतराच्या कविता),
📌 राही डहाके (रक्तवर्णी सूर्य),
📌अजित दळवी (समाजस्वास्थ्य),
📌 प्राजक्त देशमुख (देवबाभळी),
📌 किरण गुरव (जुगाड),
📌संग्राम गायकवाड  (आटपाट देशातल्या गोष्टी),
📌विलास सिंदगीकर (बाजार),
📌 दिनकर कुटे (कायधूळ),
📌विनया जंगले (मुक्‍या वेदना, बोलक्‍या संवेदना),
📌नीलिमा क्षत्रिय (दिवस आलापल्लीचे),
📌 ज्युनिअर ब्रह्मे (रूपेश कुडुचकर) (ब्रह्मे घोटाळा),
📌सुनीता तांबे व सागर रेड्डी (नाम तो सुना होगा),
📌गो. तु. पाटील (ओल अंतरीची...),
📌डॉ. पराग घोंगे (अभिनय चिंतन ः भरतमुनी ते बर्टोल्ट ब्रेख्त),
📌 दा. गो. काळे (आकळ),
📌मंगला गोडबोले (सती ते सरोगसी),
📌 नरेंद्र चपळगावकर (त्यांना समजून घेताना),
📌 डॉ. श्‍यामकांत मोरे (मालवणी बोली शब्दकोश),
📌डॉ. पुष्पा खरे व डॉ. अजित केंभावी (गुरुत्वीय तरंग),
📌प्रा. डॉ. द. ता. भोसले (संवाद बळिराजाशी),
📌प्रा. रूपाली अवचरे (वामन निंबाळकरांची कविता : स्वरूप आणि आकलन),
📌जयराज साळगावकर (बिटकॉइन क्रिप्टोकरन्सी),
📌डॉ. सतीश पावडे (द थिएटर ऑफ द ॲब्सडर्स),
📌डॉ. पुरुषोत्तम भापकर (शैक्षणिक षटकार),
📌डॉ. संदीप श्रोत्री (कासवांचे बेट),
📌आशा बगे (निवडक कथा ः संपादक - प्रभा गणोरकर),
📌 मेघा पानसरे (सोव्हिएत रशियन कथा),
📌संजय झेंडे (पाणीदार माणसं),
📌गणेश घुले (सुंदर माझी शाळा),
📌डॉ. व्यंकटेश जंबगी (बालमंच : बाल एकांकिका संग्रह कविता),
📌 डॉ. सुमन नवलकर (काटेरी मुकुट),
📌 मृणालिनी वनारसे (प्रश्नांचा दिवस),
📌 आनंद घैसास (ताऱ्यांचा जन्म-मृत्यू),
📌 आशा केतकर (थोर संशोधक),
📌 द. तु. पाटील (चैत).

General Knowledge

▪ कोणत्या शहरात 36 व्या राष्ट्रीय खेळांच्या अधिकृत शुभंकराचे अनावरण केले गेले?
उत्तर : पणजी

▪ IBM कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणत्या व्यक्तीची निवड झाली?
उत्तर : अरविंद कृष्ण

▪ ऑस्कर पुरस्काराच्या सोहळ्यात ऑर्केस्ट्राची जबाबदारी स्वीकारणारी प्रथम महिला कोण ठरल्या?
उत्तर : एमियर नून

▪ कोणत्या राज्याने देशाची पहिली ‘फ्रूट ट्रेन’ रवाना केली?
उत्तर : आंध्रप्रदेश

▪ कोणत्या राष्ट्राध्यक्षाने ‘अमेरिका-मेक्सिको-कॅनडा करार’ या नव्या त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली?
उत्तर : डोनाल्ड ट्रम्प

▪ भारतात कोणत्या दिवशी जागतिक कुष्ठरोग दिन पाळला जातो?
उत्तर : 30 जानेवारी

▪ कोणता खेळाडू ‘वर्ल्ड गेम्स सर्वोत्तम अ‍ॅथलीट’चा पुरस्कार जिंकणारा प्रथम हॉकीपटू ठरला?
उत्तर : राणी रामपाल

▪ ‘संप्रीती’ हा कोणत्या दोन देशांदरम्यानचा युद्ध सराव आहे?
उत्तर : भारत आणि बांग्लादेश

▪ कोणत्या जिल्ह्यात 34 वा ‘सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळावा 2020’ भरणार आहे?
उत्तर : फरीदाबाद

▪ कोणत्या राज्यात जगातल्या सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे उद्घाटन झाले?
उत्तर : तेलंगणा

👌

भारत आणि श्रीलंका दरम्यान आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यासाठी अलायन्स एअरला मंत्रिमंडळाची मंजुरी.


 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि श्रीलंका दरम्यान आंतरराष्ट्रीय क्षेत्रात उड्डाण करण्यासाठी अलायन्स एअर कंपनीला पूर्वप्रभावाने मंजुरी दिली आहे. अलायन्स एअर ही एअर इंडियाची 100% सहाय्यक कंपनी आहे. अंतरिम कालावधीसाठी विशेष परवानगी देण्यात आली असून  देशांतर्गत परिचालनासाठी अलायन्स एअरच्या ताफ्यात किमान 20 विमाने किंवा एकूण क्षमतेच्या 20% विमाने, यापैकी जे अधिक असेल ते होईपर्यंत ही व्यवस्था करण्यात आली आहे.

भारताचे श्रीलंकेबरोबर अतिशय जवळचे द्विपक्षीय संबंध असून दोन्ही देशांदरम्यान संपर्क वाढवण्यासाठी तसेच दोन्ही देशातील जनतेमध्ये संवाद वाढवण्याच्या दृष्टीने संपर्क विस्तार करणे हा यामागचा उद्देश आहे. या मंजुरीपूर्वी पालाली आणि बट्टीकलोवा विमानतळावरून कुठल्याही प्रकारची व्यावसायिक उड्डाणे होत नव्हती.

भारताने ‘हार्मुझ शांती पुढाकार’मध्ये भाग घेतला

​​

◾️भारताने ‘हार्मुझ शांती पुढाकार’ यात भाग घेतला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश्य जगातल्या सर्वात व्यस्त आणि मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जलवाहतुकीच्या मार्गामध्ये शांती प्रस्थापित करून ते क्षेत्र स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणे हा आहे.

◾️या प्रदेशातल्या देशांमधली प्रादेशिक अखंडता आणि राजकीय स्वातंत्र्य याची हमी देणारा हा उपक्रम देशांमधली एकता, परस्पर समन्वय तसेच शांततापूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंध वाढविण्यासाठी आहे.

✍होर्मुज समुद्रधुनी: जागतिक तेलाची एक महत्त्वाची वाहिनी

◾️पर्शियन खाडीमध्ये होर्मुज समुद्रधुनी आहे.

◾️होर्मुज समुद्रधुनीच्या क्षेत्रातून जगातले एक पंचमांश तेल वाहून नेल्या जाते. ही समुद्रधुनी ओमान आणि इराण या देशांच्या दरम्यान आहे.

◾️ही समुद्रधुनी उत्तर आखाती प्रदेशाला जोडते आणि दक्षिणेकडे ओमानची खाडी आणि त्यापलीकडे अरबी समुद्र आहे. ही समुद्रधुनी 21 मैल (33 किमी) अंतरावर पसरलेली आहे.

◾️या मार्गे OPECचे सदस्य असलेले सौदी अरब, इराण, संयुक्त अरब अमीरात (UAE), कुवैत आणि इराक बहुतांश तेल निर्यात करीत आहेत.

◾️कतार हा जगातला सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा (LNG) निर्यातदार देश आहे आणि जवळपास सर्व LNG या मार्गे पाठवते

महाभियोग खटल्यात डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय

◾️ अमेरिकनं सिनेटनं ट्रम्प यांच्याविरोधातील आरोप फेटाळून लावले आहे.

◾️सिनेटनं आरोपातून निर्दोष मुक्तता केली असून, ट्रम्प यांचा विजय झाला आहे.

◾️ रिपब्लिकन पक्षाने ५२-४८ च्या अंतराने ट्रम्प यांच्यावरील आरोप फेटाळून लावले.

◾️ काँग्रेसच्या कामात अडथळे आणण्याच्या आरोपातून ५३-४७ मतांनी ट्रम्प यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं.

◾️अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीला अवघे दहा महिने उरलेले असताना तेथे हे राजकीय नाटय़ सुरू आहे.

◾️ सत्तेचा गैरवापर करणे आणि काँग्रेसच्या कामात अडथळे आणणे, असे दोन आरोप डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर होते.

◾️या सुनावणीच्या अध्यक्षस्थानी सरन्यायाधीश जॉन रॉबर्टस होते.

◾️अमेरिकी लोकशाहीच्या इतिहासात आतापर्यंत महाभियोगाची कारवाई अध्यक्षांवर होण्याची ही तिसरी वेळ आहे.

 

किसान रेलच्या निर्मितीचे कार्य सुरु.

🎆 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केंद्रीय अर्थसकल्पात घोषित केलेल्या तरतुदीनुसार शेतकऱ्यांसाठी किसान रेलची निर्मिती करण्याकरता साचेबद्ध रीतीने कार्य सुरु आहे, असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. 

🎆 किसान रेलची व्याप्ती संपूर्ण देशभर करावी या हेतुने नियोजन सुरु असल्याचे रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी आज वार्ताहारांशी बोलताना सांगितले.

🎆 रेल्वेला देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचं इंजिन बनवण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे असेही ते म्हणाले.