22 October 2021

गणित विषयातील महत्त्वाचे मुद्दे

समसंख्या :
ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला सम संख्या म्हणतात.

विषमसंख्या :
ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही, त्या संख्येला विषमसंख्या म्हणतात.

विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात.

संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम :

सम संख्या + सम संख्या = सम संख्या
सम संख्या + विषम संख्या = विषम संख्या
विषम संख्या – विषम संख्या = सम संख्या
सम संख्या x सम संख्या = सम संख्या
विषम संख्या x विषम संख्या = विषम संख्या
सम संख्या – सम संख्या = सम संख्या
सम संख्या – विषम संख्या = विषम संख्या
विषम संख्या + विषम संख्या = सम संख्या
सम संख्या x विषम संख्या = सम संख्या

मूळ संख्या :

ज्या संख्येस फक्त त्याच संख्येने किंवा 1 नेच पूर्ण भाग जातो, त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात.

उदा. 2, 3, 5, 7, 11, 13 इत्यादी.

(फक्त 2 ही समसंख्या मूळसंख्या आहे. बाकी सर्व मूळसंख्या ह्या विषम संख्या आहेत) 1 ते 100 संख्यांचा दरम्यान एकूण 25 मूळ संख्या आहेत, त्या खाली दिल्या आहेत.

नैसर्गिक संख्यामूळसंख्या
1 ते 10 2,3,5,7
11 ते 20 11,13,17,19
21 ते 30 23,29
31  ते 40 31,37
41 ते 50 41,43,47
51 ते 60 53,59
61 ते 70 61,67 
71 ते 80 71,73,79 
81 ते 90 83,89 
91 ते 100 97

जोडमुळ संख्या :

ज्या दोन मूळ संख्यात केवळ 2 च फरक असतो  त्यास जोडमुळ संख्या म्हणतात, अशा 1 ते 100 मध्ये एकूण आठ जोडमुळ संख्यांच्या जोडया आहेत.

उदा. 3-5, 5-7, 11-13, 17-19, 29-31, 41-43, 59-61, 71-73.

संयुक्त संख्या :

मूळ संख्या नसलेल्या नैसर्गिक संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात.उदा. 4,6,8,9,12 इ.

अंकांची स्थानिक किंमत :

संख्येतील कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत काढताना त्या अंकापुढे जेवढे अंक असतील तेवढे शून्य त्या अंकापुढे देतात.
उदा. 45123 या संख्येतील 5 ची स्थानिक किंमत 5000, तर 2 ची स्थानिक किंमत 20 होय.

एक अंकी एकूण संख्या 9 आहेत. तर दोन अंकी 90, तीन अंकी 900 आणि चार अंकी एकूण संख्या 9000 आहेत.

लहानात लहान – एक अंकी संख्या 1 आहे, तर दोन अंकी संख्या 10, तीन अंकी संख्या 100 आहे. याप्रमाणे 0 वाढवीत जाणे.

मोठयात मोठी – एक अंकी संख्या 9, दोन अंकी संख्या 99, तीन अंकी संख्या 999 आहे. पुढे याचप्रमाणे 9 वाढवीत जाणे.

कोणत्याही संख्येला 0 ने गुणले असता उत्तर 0 येते.

0 ते 100 पर्यंतच्या संख्यांत –
i) 2 पासून 9 पर्यंतचे अंक प्रत्येकी 20 वेळा येतात.
ii) 1 हा अंक 21 वेळा येतो
iii) 0 हा अंक 11 वेळा येतो.

1 ते 100 पर्यंतच्या संख्यांत –
अ. 2 पासून 9 पर्यंतचे अंक असलेल्या एकूण संख्या प्रत्येकी 19 येतात.
ब. दोन अंकी संख्यात 1 ते 9 या अंकाच्या प्रत्येकी 18 संख्या असतात.

त्रिकोणी संख्या :

दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात.

उदा : 1,3,6,10,15,21,28,36,45,55,66,78,91, इत्यादी

त्रिकोणी संख्या = n x(n+1)/2 या सूत्रात n = नैसर्गिक संख्या (1,2,3,4____)

जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे

  भौगोलिक उपनाव  -  टोपणनाव

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)

2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान

3) काळे खंड - आफ्रिका

4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया

5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क

6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी

7) गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा

8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार

9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड

10) नाईलची देणगी - इजिप्त

11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन

12) पाचुचे बेट - श्रीलंका

13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान

14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर

15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे

16) गव्हाचे कोठार - युक्रेन
______________________________

भूगोल प्रश्नसंच

1) वालुकामय मातीमध्ये असणारी एकूण रंध्र पोकळी (छिद्रांनी व्यापलेली जागा) ही .........................
   1) चिकणमातीपेक्षा जास्त असते      2) चिकणमातीपेक्षा कमी असते
   3) चिकणमाती इतकीच असते      4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 2

2) व्हर्टीसोलला .......................... असे म्हणतात.
   1) ॲल्यूव्हीएम      2) चेस्टनट    3) रेगूर      4) लॅटोसॉल्स
उत्तर :- 3

3) युनायटेड स्टेटस्‍ डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर यांच्याप्रमाणे मातीमधील मध्यम वाळू कणांचा व्यास ...................... मी.मी. होय.
   1) 0.5 ते 0.25      2) 0.05 ते 0.002    3) 2.00 ते 1.00    4) 1.00 ते 0.50
उत्तर :- 1

4) खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
   अ) सतलज गंगा खो-यांमध्ये सुपीक गाळाची मृदा आढळते.
   ब) दख्खनच्या पठारावर खोल, मध्यम व उथळ थराची सुपीक काळी मृदा आढळते.
   क) पश्चिम किनारपट्टीला आर्द्र हवामानात जांभी मृदा आढळते.
   ड) व्दीपकल्पीय पठारावर लोहाचा अंश असणारी लाल, तांबूस व पिवळसर मृदा आढळते.
   1) अ आणि ब विधाने बरोबर आहेत.    2) क विधान बरोबर आहे.
   3) अ आणि क विधाने बरोबर आहेत.    4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.
उत्तर :- 4

5) खाली नमूद केल्यापैकी कोणती मृदा धुपेची कारणे संपूर्णत: मानव निर्मिती आहेत ?
   अ) भूप्रदेशाचा सर्वसाधारण उतार      ब) मृदेचे स्वरूप
   क) जंगलतोड          ड) गवताळ कुरणांचा वाजवी पेक्षा जास्त वापर
   इ) भटकी शेती
   1) वरील सर्व    2) ब, क आणि ड    3) अ, क आणि ड    4) क, ड आणि इ
उत्तर :- 4

1) खाली काही निसर्ग पर्यटन प्रकार आणि त्यांची स्थाने यांच्या जोडया दिल्या आहेत त्यातील अयोग्य जोडी ओळखा.
   1) नदी परिक्रमा – कोलाड    2) आदिवासी निवास – कडूस
   3) भू – भौतिक पर्यटन – सावंतवाडी  4) स्क्युबा ड्रायव्हिंग – तारकर्ली
उत्तर :- 3

2) महाराष्ट्र सरकारने 2006 साली पर्यटन धोरण विकसित केले. खालीलपैकी कोणते विधान या पर्यटन धोरणाचा भाग नाही ?
   अ) करमणूक करामधून सुट        ब) किनारी नियंत्रण कायद्यातून सूट
   क) पाणी आणि विजेचे दर औद्योगिक गटानुसार    ड) मालमत्ता करातून आणि अकृषि करातून सूट
   इ) अविकसित प्रदेशातून सूट
    योग्य पर्याय निवडा:
   1) अ, क आणि इ    2) ब आणि क    3) ब आणि ड    4) फक्त ब
उत्तर :- 4

3) राजीव गांधी खेळ अभियानाबाबत पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही ?
   अ) ती एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे.    ब) ती 2014 मध्ये सुरू करण्यात आली.
   क) तिने पंचायत युवा क्रिडा आणि खेळ अभियानाची जागा घेतली.
   ड) ‘युवकात खेळ आयुष्याचा एक मार्ग’ यास प्रोत्साहन देण्यास, खेळांच्या सुविधा सहज उपलब्ध करून देणे व खेळांच्या स्पर्धा
         भरविणे या बाबी सम्मीलित आहेत.
   इ) सर्वकष क्रीडा केंद्रे या योजनेत बांधली जातील.  फ) स्त्रीयांना स्वत:चे संरक्षण प्रशिक्षण यात सम्मीलित आहे.
   ग) विशेष वर्गासाठी खेळही आयोजित केले जातात असे की उत्तर – पूर्व क्षेत्र खेळ.
   1) इ      2) फ      3) ग      4) वरील तिन्हीपैकी एकही नाही
उत्तर :- 4

4) पुढील दोनपैकी कोणते विधान योग्य आहे ?
   अ) नेलोरी, बेलरी, गुरेजी, केशरी या भारतातील मेंढीच्या जाती आहेत.
   ब) भारतीय लोकर ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत कमी प्रतीची समजली जाते व तिला जाडीभरडी कार्पेट लोकर
         म्हणतात.
   1) केवळ अ      2) केवळ ब      3) दोन्ही      4) एकही नाही
उत्तर :- 2

5) मलेरिया हा भारत तसेच महाराष्ट्रामध्ये प्रसार पावलेला रोग आहे. मलेरिया बाबत कोणते विधान असत्य आहे ?
   अ) मुंबई ही मलेरियाची राज्यातील राजधानी आहे.
   ब) गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातील दुस-या क्रमांकाचा मलेरिया ग्रस्त जिल्हा आहे.
   क) महाराष्ट्र हे देशात आठव्या क्रमांकाचे मलेरियाग्रस्त राज्य आहे.
   ड) ओरिसा हे भारतातील सर्वाधिक मलेरियाग्रस्त राज्य आहे.
   1) फक्त अ      2) अ, ब आणि ड      3) अ, ब आणि क    4) फक्त क
उत्तर :- 4

1) महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा – वेरूळ लेणी आहेत ?
   1) पुणे      2) अहमदनगर   
   3) औरंगाबाद    4) लातूर
उत्तर :- 3

2) महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.
   1) 6      2) 4     
   3) 7      4) 9
उत्तर :- 1

3) पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये ......................... चे स्थान आहे.
   1) महाड    2) वाई     
   3) महाबळेश्वर    4) नाशिक
उत्तर :- 2

4) खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते ?
   1) लोणावळा    2) चिखलदरा   
   3) महाबळेश्वर    4) माथेरान
उत्तर :- 2

5) खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही ?
   1) सांगली    2) सातारा   
   3) रायगड    4) रत्नागिरी
उत्तर :- 3

काही राष्ट्रीय महामार्ग

1)NH३ मध्य प्रदेश सीमेपासून - सांगवी - धुळे - मालेगाव - नाशिक - इगतपुरी - भिवंडी - ठाणे - मुलुंड - मुंबई ३९१

2)NH1४ ठाण्याजवळ रा.म.क्र.३शी तिठा - पनवेल - पुणे - सातारा - कोल्हापूर - कागल कर्नाटक सीमेपर्यंत ३७१

3)NH४B जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट - पळस्पे फाटाजवळ रा.म.क्र.४शी तिठा २०

4)NH ४C कळंबोलीजवळ रा.म.क्र.४ (किमी ११६)- रा.म.क्र.४ब (किमी १६.६८७) ७

5)NH ६ गुजरात सीमेपासून - विसारवाडी - धुळे - एरंडोल - जळगाव - एदलाबाद - खामगांव - अकोला - अमरावती - नागपूर - भंडारा - देवरी छत्तिसगढ सीमेपर्यंत ८१३

6) NH७ मध्य प्रदेश सीमेपासून - देवळापूर - नागपूर - हिंगणघाट - करंजी आंध्र प्रदेश सीमेपर्यंत. २३२

7)NH८ गुजरात सीमेपासून - तलासरी - बांद्रा - मुंबई १२८

8)NH१३ सोलापूर - नंदनी - कर्नाटक सीमेपर्यंत ४३

9)NH १६ आंध्र प्रदेश सीमेपासून - सिरोंचा - कोपेला छत्तिसगढ सीमेपर्यंत ३०

10)NH१७ पनवेल - पेण - महाड - पोलादपूर - खेड - आसूर्डे - चिपळूण - संगमेश्वर - रत्नागिरी - लांजा - राजापूर - कुडाळ - वेंगुर्ला गोवा सीमेपर्यंत. ४८२

11)NH५० नाशिक - संगमनेर - नारायणगांव - खेड - पुणे १९२

12)NH६५ पुणे - इंदापूर - सोलापूर - उमरगा कर्नाटक सीमेपर्यंत. ३३६

13)NH६९ नागपूर - सावनेर मध्य प्रदेश सीमेपर्यंत ५५

.14)NH२०४ रत्‍नागिरी - पाली - शाहूवाडी - कोल्हापूर १२६

15)...NH २११ सोलापूर - उस्मानाबाद - बीड - गेवराई - औरंगाबाद - वेरूळ - चाळीसगाव - धुळे ४००

16)NH२२२ कल्याणजवळ रा.म.३शी तिठा - अहमदनगर - पाथर्डी - परभणी - नांदेड आंध्र प्रदेश सीमेपर्यंत. 

ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प


महाराष्ट्रातला महत्त्वाचा असा एक ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प. जंगलाच्या मध्यभागी असलेले ताडोबा आणि तेलीयाचे निळेशार जलाशय, पायाखाली जाणवणारी पानगळीची रेलचेल, ठायी ठायी आढणारे वन्य प्राणी.

श्वासाला चिरत जाणारी नीरव शांतता आणि ऊंच आकाशाला आपल्या कवेत घेऊ पाहणारे आणि दाटीवाटीने उभे असलेले हिरवेगार वृक्ष.
ताडोबा-अंधारी प्रकल्प म्हणजे “जंगलच्या राजा” चे साम्राज्य. तांबड्या मातीवरून चालत जात असतांना जागोजाग जाणवणारी उत्कंठा आपल्याला शांत राहू देत नाही.

ताडोबा, ३१ मार्च १९५५ रोजी घोषित झालेले हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान. त्याचे क्षेत्रफळ ११६.५५ चौ.कि.मी. भोवताली ५०९.२७० चौ.कि.मी चे जंगल असल्याने २५ फेब्रुवारी १९८६ रोजी हा सर्व परिसर संरक्षित होऊन अंधारी प्रकल्पाची निर्मिती झाली...
येथील स्थानिक आदिवासींचा देव तारू या नावावरून या अभयारण्याला ताडोबा...

महाराष्ट्रातून धावणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वे कुठून कुठे

🚇 महाराष्ट्र एक्सप्रेस ★कोल्हापूर ते गोंदीया

🚇 हरिप्रिया एक्सप्रेस ★ कोल्हापूर ते तिरूपती

🚇 सिद्धेश्वर एक्स्प्रेस ★सोलापूर ते मुंबई

🚇 सिंहगड एक्स्प्रेस ★ पुणे ते मुंबई

🚇 तुतारी (राज्यराणी) एक्स्प्रेस ★  दादर ते सावंतवाडी

🚇 महालक्ष्मी एक्स्प्रेस ★ कोल्हापूर ते मुंबई

🚇 सह्याद्री एक्स्प्रेस ★ कोल्हापूर ते मुंबई

🚇 डेक्कन एक्स्प्रेस ★ पुणे ते मुंबई हजरत

🚇 निजामुद्दीन एक्सप्रेस ★ गोवा ते दिल्ली

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अनुशीलन समिती

अनुशीलन समिती : विसाव्या शतकाच्या प्रारंभीच पी. मित्र यांच्या नेतृत्वाखाली बंगालमध्ये कलकत्त्यास स्थापन झालेली पहिली क्रांतिकारी राजकीय संस्था. संस्थेच्या कार्याचा काही भाग उघड चाले, तर काही पूर्णपणे गुप्त असे. युवकांना शिक्षण देण्यासाठी ह्या संस्थेतर्फे मंडळे स्थापण्यात येत व त्यांत शारीरिक कवायत, हत्यारे वापरणे, घोड्यावर बसणे, पोहणे, मुष्टियुद्ध इ. प्रकार शिकवले जात. गुप्त कार्यक्रमात निवडक लोकच घेतले जात. जे प्राणार्पणाची शपथ घेत त्यांना क्रांतिकारक चळवळीचे प्रशिक्षण देण्यात येत असे.

वंगभंगाविरूद्ध झालेल्या प्रचंड चळवळीमुळे (१९०५) अनुशीलन समितीच्या कार्यास फार प्रोत्साहन मिळाले. ह्याच सुमारास अरविंद घोष, त्यांचे धाकटे बंधू बारिंद्रकुमार घोष व इतर अनेक देशाभिमानी लोक समितीच्या कार्यात सामील झाले. अध्यक्ष पी. मित्र ह्यांच्या प्रयत्नाने बंगालमध्ये समितीच्या अनेक शाखा स्यापन झाल्या. त्यातील प्रमुख शाखा डाक्का येथे पुलीनदास ह्यांच्या नेतृत्वाखाली स्थापण्यात आली. पुढे समितीत कार्यपद्धतीसंबंधी मतभेद होऊ लागले. बारिंद्रकुमार व त्यांचे तरुण सहकारी ह्यांना बाँब तयार करणे हे समितीचे आद्य कर्तव्य असावे असे वाटे, तर समितीचे अध्यक्ष पी. मित्र ह्यांचे मत तात्कालिक हिंसक क्रंतीच्या विरुद्ध होते. ह्या मतभेदांमुळे अनुशीलन समितीतच अरविंद घोषांच्या अध्यक्षतेखाली ‘युगांतर समिती’ हा स्वतंत्र गट तयार करण्यात आला.

पुढे समितीत तात्त्विक मतभेद वाढू लागले आणि त्यांतून तीन गट निर्माण झाले. डाक्का येथील पुलीनदास ह्यांचा, कलकत्त्यात पी. मित्र ह्यांचा व राशबिहारी बोस ह्यांचा असे तीन गट कार्य करू लागले; तथापि एकमेकांशी संपर्क मात्र ठेवला जात असे. आर्थिक व इतर स्वरूपाचा मदतही एकमेकांस देण्यात येई. समितीच्या शाखा सर्व बंगालभर होत्याच. त्याशिवाय आसाम, बिहार, पंजाब, संयुक्त प्रांत, मध्य प्रांत व दक्षिणेत पुण्यापर्यंतही त्या पसरलेल्या होत्या.अनुशीलन समितीच्या अंतर्गत व्यवस्थेसंबंधी फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र डाक्का येथील शाखेची माहिती मिळते व त्यावरून बरीच कल्पना येऊ शकते. या समितीच्या संपूर्ण बंगालमध्ये शाखा प्रस्थापित करण्यात आल्या होत्या. त्यांतून रशियातील क्रांतिकार्याच्या धर्तीवर शिक्षण देण्यात येई. कार्यासाठी शस्त्रास्त्रे जमा केली जात व त्यांचा वापर परक्या अंमलदारावर व आपल्यातील फितूर अधिकाऱ्यांवर करावयाचा असे. द्रव्यासाठी आवश्यक तेव्हा लूटमार करणे, हाही त्यांच्या कार्यक्रमाचा भाग असे.भारतीय स्वातंत्र्यचळवळीच्या इतिहासात ह्या समितीचे कार्य फारसे परिणामकारक झाले नसले, तरी तिच्या उद्दिष्टांची व मार्गांची दखल घेणे अगत्याचे आहे.

जगातील सर्वात मोठ्या दहा बँका

💁‍♂ कोणत्याही देशातील अर्थव्यवस्थेचा कणा असतो तो म्हणजे तेथील बँक व्यवस्था. तर आज आपण जगातील टॉप 10 बँकांची माहिती जाणून घेऊ...

1⃣ पहिल्या क्रमांकावर आहे ICBC बँक. Industrial and Commercial Bank of China ही जगातील सर्वात मोठी बँक आहे. चीनमधील सरकारी बँकांच्या यादीमध्ये ही बँक अग्रस्थानी आहे.

2⃣ दुसऱ्या क्रमांकावर आहे JPMorgan Chase बँक. ही एक अमेरिकन बँक आहे.

3⃣ तिसऱ्या क्रमांकावर आहे China Construction Bank. ही चीनमधील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक आहे. या बँकेच्या केवळ चीनमध्येच 13 हजार 629 हून अधिक शाखा आहेत.

4⃣ चौथ्या क्रमांकावर आहे Bank of America. या बँकेचे मुख्य कार्यालय नॉर्थ कॅरेलॉनामध्ये आहे.

5⃣ पाचव्या क्रमांकावर आहे Bank of China. नावावरुनच ही बँक चीनमधील असल्याचं स्पष्ट होतयं. ही चीनमधील सर्वात मोठ्या सरकारी बँकांपैकी एक आहे. चीनमध्ये एकूण चार सरकारी बँका आहेत.

6⃣ Wells Fargo बँक सहाव्या क्रमांकावर आहे. ही एक अमेरिकन बँक आहे. ही अमेरिकेतील चौथी सर्वात मोठी बँक आहे.

7⃣ सातव्या क्रमांकावर आहे Citi Bank समुह. ही एक अमेरिकन बँक आहे. या बँकेच्या मुख्य कार्यालय न्यूयॉर्क शहरामध्ये आहे.

8⃣ आठव्या क्रमांकावर आहे HSBC Holdings समुह. ही एक ब्रिटीश बँक आहे.

9⃣ नवव्या क्रमांकावर आहे Banco Santander बँक. ही बँक मूळची स्पेनमधील आहे.

🔟 दहाव्या क्रमांकावर आहे BNP Paribas बँक. ही बँक मूळची फ्रान्समधील आहे. या बँकेच्या शाखा 77 देशांमध्ये आहेत.

🧐 *भारताचे स्थान?* : भारतातील एकही बँक या यादीमध्ये नाही. मात्र भारतातील सर्वात मोठ्या बँकेबद्दल बोलायचे झाल्यास HDFC ही भारतातील सर्वात मोठी खासगी बँक आहे.

जागतिकीकरण


          जागतिकीकरण म्हणजे स्थानिक वस्तूंची किंवा घडामोडींची जागतिक स्तरावर स्थानांतरणाची प्रक्रिया. ह्या संज्ञेचा उपयोग बहुधा आर्थिक जागतिकीकरणाच्या संदर्भात केला जातो. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे जगाच्या अर्थव्यवस्थेबरोबर एकत्रीकरण करणे ,२० व्या शतकाच्या शब्दकोशानुसार जागतिकीकरण म्हणजे जगभर पसरणे ,एकाच वेळी संपूर्ण जगाचा किंवा जगातील सर्व लोकांचा विचार करणे ,त्यात व्यापार, विदेशी थेट गुंतवणूक, भांडवल प्रवाह, प्रवास आणि तंत्रज्ञान यांच्या प्रसाराच्या माध्यमाने राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थांसाठी खुले केले जाते.

        विश्व बॅंकेच्या अहवालानुसार जागतिकीकरण म्हणजे-

  १) उपभोग्य वस्तुंसह सर्व वस्तुंच्या आयातीवरील नियंत्रण हळूहळू समाप्त होणे.

२) आयात शुल्काचा दर कमी करणे.

३) सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरण करणे होय. दिपक नायर यांच्या मते, देशांच्या राजकीय सीमांमध्ये आर्थिक क्रियांचा विस्तार करणे म्हणजेच जागतिकीकरण होय. डॉ. यशवंत मनोहर यांच्या मते जागतिकीकरण म्हणजे जगातील वेगवेगळ्या देशांनी परस्पर व्यापार करणे होय.

◾️जागतिकीकरण म्हणजे ◾️

१) ज्या ठिकाणी स्वस्त आणि रास्त कच्चा माल आणि इतर स्रोत उपलब्ध असतील , अशा जगातील कोणत्याही ठिकाणी उत्पादन घेणे .

२) जगातील कोणत्याही कोपऱ्यापर्यंत वस्तू आणि सेवा पुरविणे , संपूर्ण जग हीच बाजारपेठ असणे .

३)देशाच्या बृहतलक्षी घटकांपैकी 'परकीय क्षेत्र हे सर्वात महत्त्वाचे क्षेत्र असणे .

रक्तद्रव्य (Plasma)

▫️ फिकट पिवळसर रंगाचे द्रव असून रक्तामध्ये एकूण आकारमान 55% असते.

▫️यामध्ये 90% पाणी तर 10% विद्राव्य प्रथिने असतात.

▫️विद्राव्य प्रथिनांमध्ये अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन आणि फायब्रिनोजन यांचा समावेश होतो.

▫️या व्यतिरिक्त रक्तद्रव्यात ग्लुकोज, रक्त गोठविणारे घटक, सोडियम, कॅल्शियम, क्लोराईड आणि बायकार्बोनेटचे आयन विद्युत अपघटनी द्रावणाच्या स्वरूपात तसेच संप्रेरके आणि कार्बन डायॉकसाईड हे घटक असतात. अल्ब्युमिन रक्तातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवते त्यामुळे परासरण दाब (Osmotic Pressure) नियंत्रित केला जातो.

▫️ग्लोब्युलिन रोगजंतूंविरुध्द्व लढा देतात.

▫️फायब्रिनोजन आणि प्रोथ्रॉम्बिन रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात.

▫️रक्तद्रव्यामध्ये शरीरातील प्रथिनांची बचत होते.

▫️रक्तातील विद्युत अपघटनी आयन चेता आणि स्नायूंचे कार्य नियंत्रित करतात.

▫️रक्तातील बायकार्बोनेट्समुळे कार्बन डायॉकसाईड चे वहन होण्यास मदत होते.

▫️रक्तद्रव्यातील गोठविणाऱ्या घटकांव्यतिरिक्त असलेल्या भागाला ब्लड सिरम किंवा शुद्ध रक्त असे म्हणतात.

चेतासंबंधीचे रोग

● Huntingtons Chorea: मेंदूचा रोग
- कारण: जनुकीय बदल
- सरासरी वयाच्या तिशीनंतर हा रोग होतो.
- लक्षणे: अनैच्छिक नाचणे, अतिविसराळूपणा

● Alzheimers Disease
- कारण: मेंदुमध्ये विशिष्ट प्रकारच्या ताऊ प्रथिनांच्या संचयामुळे
- लक्षणे: स्मृतीभंश, संभ्रमावस्था, वागणूकीतील बदल

● Parkinson's Disease
- कारण: चेतापेशींच्या र्हासामुळे मेंदूतील चेतापारेषकांची (डोपामीन) होणारी कमतरता
- लक्षणे: स्नायूंचा कंप, हालचालींचा कमी समन्वय, चेहर्यावरील हवभावांचा र्हास.

● Meningitis
- कारण: मेनिंगोकोक्कस आणि स्ट्रेप्टोकोक्क या जीवाणूमुळे
- लक्षणे: प्रमस्तिक आवरणांचा दाह

पचन संस्था (Digestive System)

मानवी शरीरात अन्न पचनासाठी विविध अवयव मिळून पचनसंस्था तयार झालेली आहे. खालेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात.
पचन संस्थेमध्ये अन्ननलिका (Alimentary Canal) व पाचकग्रंथी (Digestive Glands) यांचा समावेश होतो.
अन्ननलिका एक लांब, स्नायुमय नलिका असून ती मुखापासून गुदद्वारापर्यंत असते.
अन्ननलिकेची लांबी 9 meter (950cm, 32 Ft.) असते.
मानवी शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी अन्ननलिकेचा व्यास वेगवेगळा असतो.

🔳अन्ननलिकेत प्रामुख्याने पुढील भागांचा समावेश होतो.

▫️मुख/ तोंड (Mouth/ Buccal Cavity)

▫️ग्रसनी (Pharynx)

▫️ग्रसिका (Esophagus)

▫️जठर/ आमाशय (Stomach)

▫️लहान आतडे (Small Intestine)

▫️मोठे आतडे (Large Intestine)

▫️मलाशय (Rectum) आणि

▫️गुदद्वार (Anus) यांचा समावेश होतो.

◾️लाळग्रंथी, यकृत, स्वादुपिंड या काही पाचकग्रंथी अन्ननलिकेशी ठराविक ठिकाणी जोडलेल्या असतात.

◾️पचनसंस्थेतील वेगवेगळी इंद्रिये अन्नपचनाचे काम पद्धतशीरपणे करत असतात.

◾️अन्नपचनाच्या क्रियांचे वेगवेगळे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यावर काम करणारे पचनेंद्रिये वेगळे आहे आणि विशिष्ट टप्प्यावरील ती ती इंद्रिये त्यांचे काम सुरळीतपणे पार पाडतात.

◾️मुख/ तोंड (Mouth/ Buccal Cavity)
 
◾️तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्याच्या पचनक्रियेला सुरुवात होते तोंडातील अन्न दातांनी चावले जाते. त्याचे बारीक बारीक तुकडे होतात.
आपण जे अन्न खातो ते जटील स्वरूपात असते. त्या अन्नाचे अमायलेज/ टायलिन या जैविक उत्प्रेरकांच्या म्हणजेच विकरांच्या साहाय्याने सध्या पदार्थांमध्ये रूपांतर केले जाते. त्यामुळेच पचनाची सुरुवात मुखापासून होते असे म्हणतात.

◾️ग्रासिका  (Pharynx)

अन्ननलिकेचे व श्वसननलिकेचे तोंड म्हणजेच ग्रसनीमध्ये उघडते.
श्वसननलिकेच्या तोंडावर एपीग्लॉटिस (Epiglottus) नावाचा पडदा असतो त्यामुळे गिळलेले अन्न श्वसननलिकेत.

◾️ जठर/अमाशय (Stomach)

जठरातील जाठरग्रंथींमधून जाठररस स्रवताे. जठरात आलेले हे अन्न घुसळले जाते.
हायड्रोक्लोरिक आम्ल (HCL), पेप्सिन(Pepsin), म्यूकस (श्लेष्म)(Mucous) हे जाठररसाचे तीन घटक मिसळून अन्न आम्लधर्मी होते.
जठरात मुख्यतः प्रथिनांचे विघटन होते. खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचकरस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले

◾️लहान आतडे (Small Intestine)

लहान आतडे सुमारे 6 मीटर लांब (20-25 फूट) असते व तो अन्ननलिकेचा सर्वात मोठा भाग आहे.
अन्नाचे मुख्यत्वे पचन इथे होते.

जठरात पचलेल्या अन्नाचे शोषण इथे होते.
लहान आतड्यात अन्नामध्ये तीन पाचकरस मिसळतात. अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यामध्ये होते.

लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला आद्यांत्र (Duodenum) असे म्हणतात. आद्यांत्र्यामध्ये स्वादुपिंड रस (Pancreatic Juice) आणि पित्तरस (Bile) मिसळले जातात.

◾️स्वादुपिंड रस (Pancreatic Juice)

स्वादुपिंडातून स्त्रवतो व तो आद्यांत्रात येऊन मिसळतो. यामध्ये Trypsin, Amylase व Lypase अशी ३ विकरे असतात.

◾️पित्तरस (Bile)◾️

पित्तरस यकृतातून स्त्रवतो व तो आद्यांत्रात येऊन मिळतो.

स्निग्ध पदार्थांचे Emulsification घडवून आणण्यात पित्तरस (Bile Juice) मदत करतो.

लहान आतडे सुमारे 6 मीटर लांब (20-25 फूट) असते व तो अन्ननलिकेचा सर्वात मोठा भाग आहे.

अन्नाचे मुख्यत्वे पचन इथे होते.
जठरात पचलेल्या अन्नाचे शोषण इथे होते.
लहान आतड्यात अन्नामध्ये तीन पाचकरस मिसळतात. अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यामध्ये होते.

लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला आद्यांत्र (Duodenum) असे . आद्यांत्र्यामध्ये स्वादुपिंड रस (Pancreatic Juice) आणि पित्तरस (Bile) मिसळले जातात.


◾️मोठे आतडे (Large Intestine)◾️

 मोठ्या आतड्याची लांबी सुमारे 1.5 मीटर असते.

येथे फक्त पाण्याचे शोषण होते.

मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला ‘ॲपेंडिक्स’ हा छोटा भाग जोडलेला असतो.

लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यात येतो.

पचनक्रियेनंतर उरलेले पदार्थ गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात.

◾️यकृत

यकृत ही शरीरातील सर्वांत मोठी ग्रंथी आहे.
यकृताला भरपूर रक्तपुरवठा हाेत असतो.
यकृताचे मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा करणे.
यकृताच्या खालच्या बाजूस पित्ताशय असते. यामध्ये यकृताने स्रवलेला पित्तरस साठवला जातो.
हा पित्तरस लहान आतड्यात पाेहोचला, की तेथील अन्नात मिसळतो व पचन सुलभ होते.
स्निग्धपदार्थांच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते. पित्तरसात क्षार असतात.