30 October 2021

पंचायत राज संदर्भातील समित्या

1) व्ही आर राव (1960)
🔴विषय - पंचायत सांख्यिकी सुसूत्रता समिती

2) एस डी मिश्रा (1961)
🔵विषय - पंचायत राज आणि सहकारी संस्था

3) व्ही ईश्वरण (1961)
🟣विषय - पंचायत राज प्रशासन

4) जी आर राजगोपाल (1962)
🟠विषय - न्याय पंचायती संदर्भात अभ्यासगट

5) आर आर दिवाकर (1963)
🟢विषय - ग्रामसभेसंदर्भात

6) एम राजा रामकृष्णय्या (1963)
🟡विषय - पंचायत राज संस्थेच्या अंदाजपत्रक संदर्भात अभ्यासगट

7) के संथानम (1963)
🟤विषय - पंचायत राज अर्थविषयक अभ्यास गट

8) के संथानम (1965)
🟣विषय - पंचायत राज निवडणूक संदर्भात

9) आर के खन्ना (1965)
⚫️विषय - पंचायत राज लेखापरीक्षणसंबंधी अभ्यासगट

10) जी रामचंद्रन (1966)
⚪️विषय - पंचायत राज प्रशिक्षण संदर्भात

11) श्रीमती दया चोबे (1976)
🔴विषय - समुदाय विकास आणि पंचायत राज

भारतीय वित्तीय व्यवस्था.


🅾 कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास त्या देशातील वित्तीय व्यवस्थेच्या विकासावर अवलंबून असतो.

🅾विकसित अर्थव्यवस्थेतील वित्तीय व्यवस्था विकसित असते. उलटपक्षी, वित्तीय व्यवस्था न्यूनविकसित असल्यास अर्थव्यवस्थेच्या विकास प्रक्रियेस मर्यादा येतात.

🧩 अर्थ -

🅾 व्यापक दृष्टीने, वित्त म्हणजे कर्जाने दिला-घेतला जाणारा पैसा होय. अशा वित्ताची गरज व्यक्ती, कुटुंबे, व्यापारी, व्यावसायिक, उद्योगपती, शेतकरी तसेच, विविध सरकारे इत्यादींना असते.

🅾उदा. व्यक्ती व कुटुंबांना वित्ताची गरज दैनंदिन गरजा भागविण्यासाठी तसेच गृह बांधणीसाठी असते.

🅾व्यापर्‍यांना वित्ताची गरज आपला माल विकत घेण्यासाठी तसेच, साठवण्यासाठी असते. तर, उद्योगपतींना आपल्या स्थिर व खेळत्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी वित्त आवश्यक असते.

🅾सरकारला सुद्धा आपला चालू खर्च भागविण्यासाठी विकासात्मक कार्यासाठी तसेच, युद्धसज्जतेसाठी पैशाची आवश्यकता असते.

🅾 अशा विविध कारणांसाठी वापरण्यात येणार्‍या वित्ताच्या देवाणघेवाणीतून निर्माण होणार्‍या व्यवस्थेस 'वित्तीय व्यवस्था' (Financial System) असे म्हणतात.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

विज्ञान प्रश्नसंच


➡️ कोणती पेशी ही फक्त वनस्पती पेशीतच आढळून येते?

👉 लवके
👉 पेशीभीतीका

➡️ पेशीअंतर्गत पेशी असे खालीलपैकी कोणाला गृहीत धरले जाते?

👉 Cloroplast

➡️ खालीलपैकी सर्वात लहान पेशी कोणती?
👉 Mycoplazma

➡️ राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था कुठे आहे?

👉 पुणे

➡️ राष्ट्रीय पेशी  विज्ञान संस्था कुठे स्थित आहे?

👉पुणे

➡️ सूक्ष्मजीवाना गिळन्यासाठी कोणत्या पेशी आपला आकार बदलतात?

👉WBC

➡️ मानवातील RBC चे  पेशीपटल हे किती टक्के प्रथिनापासून बनलेले असते?

👉52%

➡️ ........... हा  घटक ऑक्सिश्वसनाचे कार्यातमक व रचनातमक घटक म्हणून ओळखला जातो.

👉तंतुकणिका

➡️ त्वचेच्या  बाह्यतम आवरणातील पेशी या मृत असतात.  साधारणत: मानवात........ kg मृत त्वचा असते.

👉  2kg 👍🏻👍🏻

➡️ खालीलपैकी कोणत्या प्राण्यांमध्ये  गुणसूत्रांची संख्या सर्वांधिका आहे?

👉 खेकडा

👉👉मानव -46
👉👉खेकडा-200
👉👉बेडूक -26
👉👉गोलकृमी -04

➡️  केंद्रकाचा व्यास अंदाजे...... असतो.

👉6 मायक्रोमीटर

➡️ न्यूक्लिक  आम्लांचा शोध कुणी  लावला?

👉 फ्रेडरीक मिशर

➡️  RNA चे  किती प्रकार आहेत?

👉3

👉1-m-RNA- Messanger  RNA

👉2-t-RNA- Transfer  RNA

👉3-r-RNA-Ribosomal RNA

➡️  महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा लता मंगेशकर  पुरस्कार 2019 नुकताच कुणाला जाहीर झाला आहे ?

👉  उषा खन्ना

➡️ उतीचा अभास करणारा शास्त्रला काय म्हणतात?

👉 Histology

➡️ कोणत्या उतीमध्ये जिवंत पेशी असतात व केंद्रक असून याची भीतीका पातळ असते.

👉 मुल उती

➡️ कोणत्या उतीमध्ये मृत  पेशी असतात. व त्यांच्या भिंती जाड असतात.

👉 दृढ  उती

➡️ त्वचेमध्ये घाम, तैल द्रव्य इत्यादी कार्य कोणत्या उती मार्फत केले जाते.

👉 अभिस्तर उती

➡️ मानवी चेहरामध्ये जवळपास किती स्नायू असतात.

👉 30

👍 खालील वाक्यात क्रियापदाचा कोणता अर्थ आहे ?

➡️ बाहुबली मरणार असेल तर मरो .

👉 संकेतांर्थ

➡️ वाटिका  - समानार्थी शब्द सांगा .

👉 उपवन

➡️ आशा दाखविणे पण शेवटी निराशा करणे ' - यासाठी कोणता वाक्प्रचार आहे ?

👉 अंगारा लावणे

👍 खालील वाक्यात कोणते उभयान्वयी अव्यय वापरले आहे ?

➡️ मी वेळेत पोहचलो ; म्हणून ती मला भेटली .

👉 परिणामबोधक

➡️ दोन चेतापेशीमध्ये अतिशय सूक्ष्म अंतर......... असते.

👉2.20nm

➡️ कोणती  ऊती उष्णता रोधक म्हणून काम करते?

👉 चरबीयुक्त  ऊती

➡️.......... नेत्रगोलास त्या भोवतालच्या हाडाशी जोडतात.

👉 स्नायूरज्जु

➡️ खालीलपैकी कोणत्या ऊती एकाच प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या आहे?

👉सरलंस्थायी

➡️ रसवाहिनी किती प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या असतात?

👉4

➡️ अन्नाची साठवन कोणत्या ऊतीमध्ये केल्या जाते?

👉जलवाहिनी

➡️ वनस्पतीच्या  फांदयाच्या  व पानाचा तळाशी असलेल्या......  ऊतीमधील  पेशी अतिशय क्रियाशील असतात.

👉आंतरिय विभाजी

➡️ प्रकाश संशलेशन  क्रियेत  पाण्याचे  प्रकाश विघटन होते या  संशोधनाचे जनकत्व  कोणास द्यावंयास हवे?

👉रॉबर्ट हिल

➡️  शरद जोशी यांनी कोणत्या साली महाराष्ट्रात शेतकरी संघटनेची स्थापना केली ?

👉 1978

➡️ बायनोमिअल (दोन नावे ). देण्याची वर्गीकरण पद्धती कोणी सुचविली?

👉 Kayrolas linayas

➡️ खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो?

👉 लायकेन

➡️ मानवी शरीरात अंदाजे किती किलोग्राम जिवाणू असतात?

👉 2.5 kg.

➡️ Taxonomy हा शब्द कोणी दिला.

👉 Decandol

➡️ लायकेन च्या किती प्रजाती आढळून येतात?

👉 400

➡️ कोणत्या देशामध्ये लायकेन पासून दारू बनवतात?

👉 स्विडन 
👉 रशिया

➡️ जेंव्हा मी जात चोरली होती ' हा कथासंग्रह कोणाचा आहे ?

👉 बाबूराव बागूल

👍 खालील वाक्याचे नकारार्थी वाक्य बनवा .

➡️ मला साऱ्या बहिणीच आहेत .

👉 मला एकही भाऊ नाही.

👍 प्रयोग ओळखा .

➡️ राजाने राणीस पकडले .

👉 सकर्मक भावे प्रयोग

👍विग्रहाचा योग्य शब्द  बनवा .

निसर्ग + उपचार
👉 निसर्गोपचार

➡️  ही सृष्टी एकपेशीय सजीवाची आहे,  व यात दृश्यकेंद्रकी सजीव येतात ..

👉प्रोटीस्टा

➡️ खालीलपैकी कोणता घटक साखर व अल्कोहोल शुद्धीकरणासाठी  वापरतात?

👉सोनेरी शैवाल

➡️  खालीलपैकी "लाकडाचे उत्तम विघटक" म्हणून  ओळख आहे?

👉बेसिडिओमायसेट्स

➡️  हे सजीव बहुपेशीय आहे,  प्रद्रव्यपटल हेच  पेशीचे बाह्यतम आवरण  असते.

👉सृष्टी प्राणी

➡️ ऊसाच्या मळीमध्ये कोणते आम्ल असते?

👉सायट्रिक

➡️ जगातील सर्वात पहिले सजीव कोणते?
👉सृष्टी मोनेरा

➡️  खालीलपैकी  ग्लुटामिक आम्लाचे काय कार्य आहे?

👉प्रथिन बांधणी करणे

➡️  विषाणुमध्ये  RNA असल्यास.....  म्हणतात.

👉Retrovirus

जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत


सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.

सजीवांना या पोषणतत्वाची सूक्ष्म प्रमाणात गरज असली तरी, त्याच्या अभावी होणार्‍या आजाराची परिणामता फार मोठी आहे.

आपल्याला खालील जिवनसत्वाची गरज असते.

1. सत्व – अ  

शास्त्रीय नांव – रेटीनॉल  

उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता

अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा

स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस

2. सत्व – ब1

शास्त्रीय नांव – थायमिन  

उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – बेरीबेरी

स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,

3. सत्व – ब2

शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन  

उपयोग – चयापचय क्रियेकरिता

अभावी होणारे आजार – पेलाग्रा

स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे

4. सत्व – ब3

शास्त्रीय नांव – नायसीन

उपयोग – त्वचा व केस

अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे

स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी

5. सत्व – ब6  

शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन  

उपयोग – रक्त संवर्धनाकरिता

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत व पालेभाज्या

6. सत्व – ब10  

शास्त्रीय नांव – फॉलीक  

उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत

7. सत्व – क  

शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड  

उपयोग –  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता    

अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे   

स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि

8. सत्व – ड  

शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल  

उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग

स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे

9. सत्व – इ  

शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल

उपयोग – योग्य प्रजननासाठी  

अभावी होणारे आजार – वांझपणा

स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या

10. सत्व – के  

शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान  

उपयोग – रक्त गोठण्यास मदत

अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही

स्त्रोत – पालेभाज्या व कोबी

सामान्य विज्ञान


                                                 
*१. वटवाघूळ उडत असताना _ ध्वनी निर्माण करतात.*
A) लघु वारंवारतेचा
B) उच्च वारंवारतेचा ✅
C) मध्यम वारंवारतेचा
D) यापैकी नाही

*२. कोणते पाणी सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते?*
A) विहिरीतील
B) नळाचे
C) तलावाचे
D) पावसाचे ✅

*३. कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणत्या शास्त्राज्ञाने लावला?*
A) डॉ. हॅन्सन ✅
B) डॉ. रोनॉल्ड
C) डॉ. बेरी
D) डॉ. निकेल्सनू

*४. ७ कि.मी. = डेकामीटर ?*
A) ७०
B) ७०० ✅
C) ७०००
D) ०.७००

*५. खालीलपैकी कोणते औषध क्षयरोगासाठी वापरतात?*
A) स्ट्रेप्टोमायसिन ✅
B) पेनिसिलिन
C) डेप्सॉन
D) ग्लोबुलिन

*६. कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो?*
A) कावीळ
B) विषमज्वर
C) अतिसार
D) वरील सर्व ✅

*७. देवी या रोगावर कोणत्या शास्त्रज्ञाने लस शोधून काढली?*
A) एडवर्ड जेन्नर ✅
B) लुई पाश्चर
C) श्याम विल्मुट
D) कार्ल स्टिनर

*८. विद्यूत शक्ती _ मध्ये मोजतात.*
A) वॉल्ट
B) केल्वीन
C) वॅट ✅
D) कॅलरी

*९. ढगांचा गडगडात वीज चमकल्यानंतर थोड्यावेळाने ऐकू येतो; कारण _*
A) ढग आकाशात खूप उंचावर असतात
B) प्रकाश व आवाजाची गती समान असते
C) प्रकाशाची गती ध्वनीच्या गतीपेक्षा जास्त असते ✅
D) ध्वनीची गती प्रकाशाच्या गती पेक्षा जास्त आहे

*१०. तुमच्या शरीराची स्थितिज ऊर्जा कमीत कमी असते, जेव्हा तुम्ही _*
A) खुर्चीवर बसलेले असता
B) जमिनीवर बसलेले असता
C) जमिनीवर झोपलेले असता ✅
D) जमिनीवर उभे असता

पोलीस भरतीसाठी आजचे महत्त्वाचे प्रश्न

1) 39 व्या जागतिक कवी परिषदेचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : भुवनेश्वर

2) पुर्णपणे विजेवर उडणारे NASA चे पहिले प्रायोगिक विमान कोणते?
उत्तर : X-57’s Mod II

3) ‘ईशान्य हातमाग आणि हस्तकला प्रदर्शनी 2019’ या कार्यक्रमाचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : मिझोराम

4) भारतीय रिझर्व्ह बँकेनी एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर कधीपासून बंदी घातली आहे?
उत्तर : 5 ऑक्टोबर 2019

5) जागतिक अंतराळ सप्ताह ऑक्टोबर महिन्यात कधी साजरा केला जातो?
उत्तर : 4 ते 10 ऑक्टोबर

6) ‘गृह फायनान्स’ ही गृहनिर्माण कंपनी कोणत्या बँकेत विलीन होणार आहे?
उत्तर : बंधन बँक

7) अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये होणाऱ्या पहिल्या पर्वतीय युद्ध सरावाचे नाव काय?
उत्तर : 'हिम विजय'

8) “KAZIND-2019” नावाचा लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे?
उत्तर : उत्तराखंड

9) CISF ने कोणत्या जलविद्युत प्रकल्पावर पाळत ठेवण्याची घोषणा केली आहे?
उत्तर : बागलीहार जलविद्युत प्रकल्प

10) अमेरिकेने कोणत्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची नुकतीच चाचणी घेतली?
उत्तर : मिनिटेमन II|

1) कोणत्या विषाणूमुळे विषमज्वर होतो?
उत्तर : साल्मोनेला टायफी

2) पिण्याचे पाणी तपासण्यासाठी BISद्वारे कोणते मानक ठरवण्यात आले आहे?
उत्तर : इंडियन स्टँडर्ड 10500:2012

3) आदी महोत्सव 2019 या कार्यक्रमाचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : नवी दिल्ली

4) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशात “NISHTHA” ही राष्ट्रीय मोहीम राबवण्यात येत आहे?
उत्तर : जम्मू व काश्मीर

5) कोणत्या शहरात CPR प्रशिक्षणाच्या बाबतीत गिनीज विक्रम करण्यात आला?
उत्तर : कोची

6) कोणते राज्य 14 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत ‘वाळू आठवडा’ पाळत आहे?
उत्तर : आंध्रप्रदेश

7) ‘ब्रह्मपुत्र पुष्करम’ हा कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने आयोजित केला?
उत्तर : आसाम

8) राष्ट्रीय नदी गंगा विधेयक-2019 नुसार, गंगा नदी प्रदूषित केल्यास दंड काय असू शकतो?
उत्तर : 50 कोटी रुपये आणि 5 वर्षांचा तुरुंगवास

9) राष्ट्रीय पत्र दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 16 नोव्हेंबर

10) UNESCOच्या शिक्षण आयोगाच्या प्रमुखपदी कोणत्या देशाची निवड झाली?
उत्तर : पाकिस्तान

पोलीस भरतीचे आजचे महत्त्वाचे प्रश्न

*1)* “सुशासन पद्धतींच्या प्रतिकृती” विषयक दोन दिवसांची प्रादेशिक परिषद कोठे भरली?
उत्तर : जम्मू

*2)* 8 वी आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे?
उत्तर : भारत

*3)* कोणत्या अंतराळ संस्थेनी ‘अल्टिमा थुले’ या खगोलीय खडकाला ‘अ‍ॅरोकोथ’ असे नाव दिले?
उत्तर : NASA

*4)* कोणत्या ठिकाणी ‘आंतरराष्ट्रीय योग परिषद’ आयोजित करण्यात आली?

उत्तर : म्हैसूर

*5)* कोणत्या राज्याने 15 नोव्हेंबर रोजी आपला स्थापना दिन साजरा केला?

उत्तर : झारखंड

*6)* भारतातल्या कोणत्या राज्याने “शिशू सुरक्षा” अॅप सादर केले?

उत्तर : आसाम

*7)* कोणत्या राज्यात ‘रोसोगोल्ला दिबस’ साजरा करण्यात आला?

उत्तर : पश्चिम बंगाल

*8)* कोणत्या राज्यात “बाली जत्रा” उत्सव साजरा केला जातो?
उत्तर :  ओडिशा

*9)*  2019 सालाचा ‘BRICS-यंग इनोव्हेटर पुरस्कार’ कोणी जिंकला?

उत्तर : रवी प्रकाश

*10)* “ढाका ग्लोबल डायलॉग” हा कार्यक्रम कोणत्या देशाने आयोजित केला?

उत्तर :  बांग्लादेश

सर्वनाम

नामऐवजी वापरल्या जाणार्‍या शब्दांला सर्वनाम असे म्हणतात.

सर्वनामचे मुख्य प्रकार सहा आहेत.
1. पुरुषवाचक सर्वनाम
2. दर्शक सर्वनाम
3. संबंधी सर्वनाम
4. प्रश्नार्थक सर्वनाम
5. सामान्य / अनिश्चित सर्वनाम
6. आत्मवाचक सर्वनाम

👉. पुरुषवाचक सर्वनाम :

याचे तीन उपप्रकार पडतात.
1. प्रथम पुरुष : मी, आम्ही, आपण, स्वत: इ
  उदा. 1. मी गावाला जाणार.
        2. आपण खेळायला जावू.

2 .व्दितीय पुरुष : तो, तुम्ही, आपण, स्वतः इ
     उदा. 1. आपण कोठून आलात?
            2. तुम्ही घरी कधी येणार?

3. तृतीय पुरुष  : तो, ती, ते, त्या, आपण, स्वतः इ.
    उदा. 1. त्याने माला कामाला लावले पण स्वतःमात्र आला नाही.
          2. त्या सर्वजण इथेच येत होत्या.

👉. दर्शक सर्वनाम :

कोणतीही जवळची किंवा वा दूरची वस्तु दर्शविण्यासाठी दर्शक सर्वनामाचा उपयोग करतात.
उदा. हा, ही, हे, तो, ती, ते.
उदा. 1. ही माझी वही आहे
  2. हा माझा भाऊ आहे.
3. ते माझे घर आहे.
4. तो आमचा बंगला आहे.

👉. संबंधी सर्वनाम :

वाक्यात पुढे येणार्‍या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणार्‍या सर्वनामाला संबंधी सर्वनामे असे म्हणतात.
उदा. जो, जी, जे, ज्या
ही सर्वनामे मिश्र वाक्यातच येतात.
ही सर्वनामे गौणवाक्याच्या सुरवातीलाच येतात.
असे गौण वाक्य हे गौण वाक्याचे विशेषण हे प्रकार असते.
  उदा .1. जे चकाकते ते सारेच सोने नसते.
2. जो तळे राखील तो पाणी चाखील.

👉  प्रश्नार्थक सर्वनाम :

ज्या सर्वनामांचा प्रश्न विचारण्यासाठी वापर होतो. त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात.
  उदा. कोण, कुणास, काय, कोणी, कोणाला
  उदा. 1. तुझे नाव काय?
2. तुला कोणी संगितले.
3. कोण आहे तिकडे.

👉सामान्य / अनिश्चित सर्वनाम :

कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला, ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहे ते निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे म्हणतात.
  उदा. 1. त्या पेटीत काय आहे ते सांग.
2. कोणी कोणास हसू नये.
3. कोण ही गर्दी !

👉 आत्मवाचक सर्वनाम :

आपण व स्वतःह्यांना आत्मवाचक सर्वनामे म्हणतात. हे सर्वनाम वाक्याच्या सुरवातीला कधीच येत नाही.
  उदा. 1. मी स्वतःत्याला पहीले.
2. तू स्वतः मोटर चालवशील का?
3. तो आपण होवून माझ्याकडे आला.
4. तुम्ही स्वतःला काय समजतात.

मराठीत मूळ 9 सर्वनाम

मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतःया मूळ सर्वनामापैकी लिंगानुसार बदलणारी तीन सर्वनाम आहेत - तो, हा, जो.
1. तो- तो, ती, ते
2. हा- हा, ही, हे
3. जो-जो, जी, जे
वचनानुसार बदलणारी पाच सर्वनामे :

मूल सर्वनामापैकी वचनानुसार बदलणारी पाच सर्वनामे आहेत. - मी, तू, तो, हा, जो इ
1. मी- आम्ही
2. तू- तुम्ही
3. तो- तो, ती, ते (एकवचनी) ते, त्या, ती (अनेकवचनी)
4. हा- हा, ही, हे (एकवचनी) हे, ह्या, ही (अनेकवचनी)
5. जो- जो, जी, जे (एकवचनी) जे, ज्या, जी (अनेकवचनी)

समानार्थी शब्द


▪️निफड - गरज, जरूरी, लकडा
 
▪️निका - चांगला, पवित्र, योग्य, शुद्ध
 
▪️निमंत्रण - अवतण, आमंत्रण, बोलावण
 
▪️पंगत - भोजन, रांग, ओळ
 
▪️पत्नी - भार्या, बायको, अर्धांगी, अस्तुरी
 
▪️पान - पर्ण, पत्र, दल
 
▪️परंपरा - प्रथा, पद्धत, चाल, रीत
 
▪️प्रभात - उषा, पहाट, प्रात:काल
 
▪️पाठ - नियम, धडा, पुन्हा-पुन्हा म्हणने, पार्श्वभाग
 
▪️पार्वती - उमा, दुर्गा, गौरी, भवानी
 
▪️पुष्प - कुसुम, सुमन, फूल
 
▪️पिता - जनक, तीर्थरुप, बाप, वडील
 
▪️प्रताप - शौर्य, बहादुरी, पराक्रम, सामर्थ्य
 
▪️पुरुष - मर्द, नर, मनुष्य
 
▪️पाखरू - पक्षी, खग, द्विज, विहंग
 
▪️पुरातन - जुनाट, प्राचीन, पूर्वीचा
 
▪️प्रख्यात - ख्यातनाम, प्रसिद्ध, नामांकित
 
▪️पाय - चरण, पाऊल, पद
 
▪️पोपट - शुक, रावा, राघू, कीर
 
▪️प्रौढ - प्रगल्भ, घीट, शहाणा
 
▪️प्रवाह - पाझर, धार, प्रस्त्रव
 
▪️फाकडा - माणीदार, हुशार, ऐटबाज, रुबाबदार
 
▪️फट - चीर, खाच, भेग
 
▪️फोड - सूज, फुगलेला भाग, फुगारा
 
▪️फरक - अंतर,

संपूर्ण मराठी व्याकरण महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द:

उदय × अस्त
आदी × अनादी
किंकर,चाकर × मालक,धनी
मर्त्य × अमर
सकाम × निकाम
धुरीण × अनुयायी
रंक × राव,धनाढ्य
दीप्ती × अंधःकार
दुभती × भाकड
दैववाद × प्रयत्नवाद
तम,तिमिर × प्रकाश,उजेड
विनंती × ताकीद
जागृत × निद्रिस्त
तृप्त × अतृप्त
तजेलदार × कोमेजलेले
झकास × निकृष्ट
औत्सुक्य × औदासीन्य
आसक्ती × विरक्ती
औधत्य × नम्रता
कुकर्म × सत्कर्म
साव × चोर
अशांत × प्रशांत
दुष्ट × सुष्ट
सधवा × विधवा
सुलभ × दुर्लभ
सुवर्णयुग × तमोयुग
गद्य × पद्य
सक्षम × अक्षम
राजमार्ग × आडमार्ग
खोल × उथळ
आपुलकी × परकेपणा
आहेरे × नाहिरे
कुलटा × घरंदाज
कृपा × अवकृपा
प्रशंसा × कुचाळी
खम्बीर × डळमळीत
औरस × अनौरस
श्राव्य × अश्राव्य
नीटनेटका × गबाळयंत्री
टंचाई × रेलचेल
इष्टाग्रह × दुराग्रह
साकल्य × वैफल्य
साकार × निराकार
तारतम्य × अविवेक
आठवण × विसर, विस्मरण
उघड × गुप्त
सुविचार × अविचार
उद्योगी × आळशी
एकमत × दुमत
आक्षेप × निरसन
गुंता × उकल
संक्षिप्त,त्रोटक × इत्यंभूत
विन्मुख × उन्मुखी
खंडन × मंडन
सामूहिक × वैयक्तिक
वस्तुस्थिती × आभास
क्षणभंगुर × चिरकलीन
माजी × आजी,विद्यमान
श्रमजीवी × बुद्धिजीवी
स्वस्ताई × महागाई
गर्विष्ठ × निगर्वी
विधायक × विध्वंसक
भरती × ओहोटी
हर्ष × खेद
साकार × निराकार
सकाम × निष्काम
चढाई × माघार
खंडित × अव्याहत
परिक्ष × अपरिक्ष
आडकाठी × मोकळी
सत्य × मिथ्या, मिथ्य
छाया × पडछाया
ग्राह्य × त्याज्य
हीन × दर्जेदार
राग × अनुराग
आमंत्रित × अनाहूत,आंगतूक
सह्य × असह्य
बंडखोर × शांत
कीर्ती × अपकीर्ती
इच्छा × अनिच्छा
सदाचरण × दुराचरण
उपलब्ध × अनुपलब्ध
इप्सित × अवांच्छित
उत्तेजन × खच्चीकरण
प्रसन्न × उद्विग्न
उल्लड × पोक्त
कृष्ण × धवल
अर्थ × अर्थहीन
अंतरंग × बहिरंग
इहलोक × परलोक
उदार × अनुदार
तन्मय × द्विधा
समदर्शी × पक्षपाती
कळस × पाया, पायरी
ओवळा × सोहळा
गच्च × सैल,विरळ
उपाय × निरुपाय
गतकाल × भविष्यकाळ
शंका × कुशंका
विवाद × निर्विवाद
वेध × निर्वेध
सुबोध ×  दुर्बोध
वियोग × संयोग,मिलन
सन्मार्ग × कुमार्ग
लौकिक × दुलौकीक
रुकार × नकार
ऐलतीर × पैलतीर
भोग × त्याग
आवक × जावक
हलकी × अवजड
कुचकामी × फलदाई
उदंड × कमी
स्वार्थ × परमार्थ
क्षम्य × अक्षम्य
संकुचित × व्यापक
श्रुत × अश्रुत
स्मृती × विस्मृती
सनातनी × सुधारक
सक्ती × खुषी
क्षेम × धोका
क्षर × अक्षर
स्वतंत्र × परतंत्र्य
स्वातंत्र्य × पारतंत्र्य
सुरस × नीरस
स्थूल × सूक्ष्म,कृश
पौर्वात्य × पाश्चात्य, पाश्चिमात्य
तारक × मारक
अवधान × अनावधान
अजस्त्र × चिमुकले
स्वीकार × अव्हेर
याचित × आयाचित
उत्कर्ष × अपकर्ष
कला × पांढरा, गोरा
नक्कल × अस्सल
गंभीर × अवखळ
प्रगती × अधोगती
उताणा × पालथा
उंच × ठेंगणा, बुटका,सखल
कोवळे × जून,राठ, निबर
अब्रू × बेअब्रू
उतार × चढाव
एकमत × दुमत
उन्नत × अवनत
उदार × कंजूस, अनुदार
उच्च × नीच
अंध × डोळस
अर्वाचीन × प्राचीन
उष्ण × थंड,गार, शीतल
एक × अनेक
ओली × कोरडी,सुकी
उन्नती × अवनती,अधोगती
आधुनिक × सनातनी
अकलवन्त × अकलशून्य,अकलमंद
अमृत,सुधा × विष,जहर,गरळ
आय × व्यय
इमानी × बेइमानी
आरोहण × अवरोहण
अभिमान × दुराभिमान
घट्ट × सैल,भोंगळ
कोवळा × जून,कडक,निबर
गती × अधोगती,परागती
जनता × नेणता
जेता × जित
जाड्या × रोड्या
चवदार × सपक
चेतन × जड
जणता × अजाण,अडाणी
आमंत्रित × आंगतुक
कालिक × कालातीत
कृतज्ञ × कृतघ्न
मोद × खन्त
रनशूर × रनभीरु
रुचकर × बेचव,सपक,रुचीहीन
राव × रंक
लठ्ठ × कृश
वंद्य × निंद्य
शाश्वत × अशाश्वत,क्षणभंगूर
शंका × खात्री